Dictionaries | References

करार

ना.  कायम , निश्चय , मुक्रर , शाश्वती ;
ना.  कबुली , ठराव , बोली , वचन , वायदा ;
ना.  कंत्राट , ठेका .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A promise, engagement, agreement. 2 A determination, resolution, fixed purpose. कराराचा Faithful of promise. 2 Firm of determination.

 पु. १ ठराव ; वचन ; बोली ; कबुली . ' मन्सबा करार केला .' - सभासद ३० . ' समीनचा देवास कराक करुन दिल्ही पाहिजे .' - मसाप २ . ३९५ . २ निश्चय ; शाश्वति ; ठाम मत . ' तुका म्हणे एका क्षणाचा करार । पाईक अपार सुख भोगी । ' - तुआ ३७३ . ' राजश्री नारायणराव घोरपडे आंस पाठवणार म्हणतात . करारांत नाहीं .' - ख ११ . ५६६६ . ३ ( कायदा ) कायद्यानें अमल बजावणी करतां येईल अशी कबुलायत . ( इं .) काँटॅक्ट ; ' दोन इसमांमध्यें एकमेकांस ववंत देऊन जेव्हा एखादी गोष्ट ठरते तेव्हां अशा वचनाला संगनमत म्हणतात व तें संगनमत कायद्यानें अमलांत आणतां येण्यासारखें असेल तर त्यास करार म्हणतात ' - वका ९२ .- वि . मुक्र ; कायम ; निश्चित . ( अर . करार् )
 पु. ( स्त्रि .) देवाची मनुष्यजातीसंबंधी केलेली योजना ( हिब्रू भाषेत करार या शब्दाचा अर्थवाचक जो शब्द आहे त्याचा अर्थ कापणें ; अथवा बंधन असा आहे .) ' मी मेघांत धनुष्य ठेविलें आहे तें तुमच्या माझ्य मधल्या करारचें चिन्ह समजावें .' - उत्प ९ . १३ . ख्रिस्ती करार दोन आहेत ; १ जुना करार - पु . ( ख्रि ) ओल्ड टेस्टामेंट या इंग्रजी शब्दाचा पर्याय ; परमेश्वरानें इस्रायल लोकांशी मोशें याच्यातर्फे जो करार केला होता तो . त्यांत नेमश स्त्रासंबंधी ब्राह्मविधि व नियम लाविलें होते . ' कारण जुना करार वाचितात तेव्हां तेंच आच्छादन तसेंच न काढिलेंले राहतें .' - करिंथ ३ . १४ . - इब्री ८ . ७ . १३ . २ ख्रिस्ती पवित्रशास्त्र या ग्रंथाचा पूर्वार्ध . नवा करार - पु . १ ( ख्रि ) न्यू टेस्टामेट या इंग्रजी शब्दाचा पर्याय ; भविष्यवादामध्यें ईश्वर व मानवजाति यांमधील ज्या नैतिक संबंधाविषयीं . भविष्य वर्तविलें आहे तो संबंध . ' मी इस्त्राएलाच्या घराण्याशीं ... नवा करार करीन . '- इब्री ८ . ८ . २ येशू ख्रिस्तानें मनुष्यांशी कंलेला करार . त्यानें कुसावर आपलें रक्त सांडून त्यावर आपला छाप मारिला . त्यायोगें ख्रिस्तावर भाव ठेवणारास तारण प्राप्त होतें . ३ पवित्रशस्त्र या ग्रंथाचा उत्तरार्ध .
०दाद  पु. ठराव ; लेखी वचन ; करारमदार . ( फा . करादांद )
०नामा  पु. ठरावपत्र ; कराआचा कागद ; करारलेख . ( फा . करार + नामह )
०मदार  पु. १ वचन ; बोली ; कागद लिहून देणें ; अनुपति वगैरे बद्दल व्यापक संज्ञा . ( अर . करार + मदार ) २ ( मदाखर जोर देऊन योजितात ) खात्रीचें अभिवचन , जाणभाक ; वेलभंडारा .
०वाकई   वाके , वाकै - घडल्याप्रमाणें ; बरोबर ; अचुकपणें . ' करारवाकई हकीकत .' - रा . १८ . ५१ . ' त्यासी माली - मामलतीचा इतका करारवाकै देऊं ' - रा . ६ . ६१२ . ( फा . करारवाकिई )

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A promise, agreement. A resolution.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP