बृहज्जातक - अध्याय २

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.


कालारुपी पुरुषाच्या देहांतील तत्त्वांची विभागणी येणेंप्रमाणे -

कालरुपी पुरुषाचा सूर्य हा आत्म; चंद्र - मन, मंगळ - सत्त्व, सामर्थ्य, तेंज; बुध - वाणी ( बोलणें ); गुरु - ज्ञान ( अंतर्ज्ञान ) आणि सुख; शुक्र - मदन - काम - रति आणि शनि - दुःख.

सूर्य - राजा, चंद्र - महाराणी, मंगळ - सेनाप्रमुख - मुख्याधिकारी, बुध - युवराज, गुरु आणि शुक्र - मंत्री, तज्ज्ञ सल्लागार; शनि - जासूद, सेवक. याप्रमाणें ग्रहांची अधिकार. विभागणी आहे.

( कालरुपी पुरुषाच्या देहावयवस्थानांची विभागणी व मांडणी ज्याप्रमाणे व्यक्तीच्या आयुष्यांतील सुखदुःखात्मक स्थितीच्या निदर्शनास निसर्णसिद्धत्वाजें उपयोगी आहे त्याप्रमाणेंच राष्ट्राच्या किंवा समाजाच्या व्यवहारांतही याचा फार उपयोग आहे. राष्ट्राच्या कुंडलींत जे स्थान गोचर - प्रहपरिमाणानें बिघडलेले असतें त्या स्थानासंबंधीं फले अनिष्ट होतात. )

सूर्यास - हेलि; चंद्रास - शीतकिरण; बुधास - हेम्न, वित्, ज्ञ, बोधन आणि चंद्रपुत्र; मंगळास - भ्रार, वक्र, करुरदृष्टि व भूमिपुत्र आणि शनीस - कोण, मंद, असित व सूर्यपुत्र अशा संज्ञा शास्त्रकारांनीं दिल्या आहेत.

बृहस्पतीस - जीव, अंगिरा, सुरगुरु, वाक्यति, ईज्य; शुक्रास - भृगु, भृगुपुत्र, सित, आस्फुजित्; राहूस - तम, अगु, असुर; आणि केतूस - शीखी ह्या संज्ञा आहेत. याखेरीज दुसर्‍या संज्ञा अन्य शास्त्रोपलब्ध अगर लोकव्यवहार यावरुन घ्याव्या.

सूर्य काळसर तांबडा, चंद्र गोरा, मंगळ साधारण तांबडा - गोरा, बुध - दूर्वासारखा हिरवा, सांवळा, गुरु - गोरा, शुक्र - सांवळा, आणि शनि काळा, याप्रमाणें ग्रहांचे रंग असून मंगळ फार उंच नाहीं व फार ठेंगणा नाहीं अशा देहाचा आहे.

 

राहूची दिशा नैऋत्य आहे. पापग्रहाशी युक्त असेल तेव्हां बुध पापग्रह समजावा. तसेच क्षीण असणारा चंद्र पापग्रहच समजावा. हे दोघे शुभग्रह असतांही पापग्रहयुक्ततेच्या योगानें पापग्रह समजले जातात व त्यांची फलेंही पापग्रहयुक्ततेच्या तशी स्थिति असतां मिळतात, असा शास्त्रकारांचा आशय आहे.

सूर्य आणि चंद्र यांचे स्वरूप व लक्षणे

मधासारखे पिंगट नेत्र, चतुरस्त्र देहाकृति, पित्तप्रकृति, थोडे केश असें सूर्याचें लक्षण आहे.

वर्तुळ आकृति, वातकफप्रधान प्रकृति, ज्ञानी, कोमल व मधुर भाषण, सुंदर नेत्र असें चंद्राचें लक्षण आहे.

मंगळ व बुधाचें स्वरुप व लक्षणें.

क्रुर दृष्टि, तरुण देह, स्वभावानें उदार, पित्तप्रकृति, विशेष चपल, सूक्ष्मकटी, जाडजूड नव्हे असा, हीं मंगळाची लक्षणें जाणावी.

बडबड्या, भाषणांत गांभीर्याचा अभाव, नेहमीं हास्याची आवड, कफवात आणि पित्त यांनीं मिश्र हीं बुधाची लक्षणे समजावी.

गुरु - शुक्राचें स्वरुप व लक्षणें.

शरीर स्थूल, पिंगट केश, उत्कृष्ट पिंगट डोळे, बुद्धि श्रेष्ठ आणि कफप्रकृति, हे गुरुचे; व सुखी, कांतिमान् शरीर, उत्तम पाणीदार डोळे, कफवातात्मक प्रकृति, कुरळे काळे केश हीं शुक्राची लक्षणे जाणावी.

शनीचे स्वरूप -लक्षणे व शरीरातील सप्तधातूचे कारक

आळशी स्वभाव, घारे, मिश्र, पिंगट, तिरवे डोळे, कृश, उंच असा देह, मोठे दांत, केंस रांठ व अंगावर लव, मोठे अवयव, वातप्रकृति ही शनींची लक्षणें आहेत.

शनि शरिरांतील स्नायु ( शिरा ), सूर्य - अस्थि ( हाडें ), चंद्र - रक्त, बुध - त्वचा शुक्र - रेत, गुरु - वसा आणि मंगळ - मज्जा. याप्रमाणे ग्रहांचे कारकत्व आहे.

सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि

स्थानें- देवता जल अग्नि क्रीडा भांडार शयन उक्रिरडा

गृह वि. देवालय विहीर नदी पाकगृह शयनस्थान द्रव्य कोठार निद्रास्थान गलिच्छ जागा.

वस्त्रें- स्थूल कोरें जळकें अनेकवस्त्राचे मध्यम दृढ जीर्ण

वस्त्रें- जाडेंभरडें तलम फाटकें ठिगळाचे पद्धतशीर बांधेसूद विरविरीत

धातु - ताम्र मणि सुवर्ण युक्ति (कांसें इ.) रौप्य मोती लोह

ऋतु- .... वर्षा ग्रीष्म शरत् हेमंत वसंत शिशिर

 

हे ऋतु ग्रहांच्या द्रेष्काणावरुन जाणावें.

याप्रमाणें हे ऋतु, चैत्र, वैशाख व वसंतऋतु या मानामें असावेसें दिसतें.

ज्या ग्रहाचा द्रेष्काण असेल त्या ग्रहाचा जो ऋतु तो त्या द्रेष्काणाचा ऋतु होय. सूर्याचा ऋतु ग्रीष्म घ्यावा, असें केचिन्मत आहे. कारण मंगळ व सूर्य सामान्यतः समान गुणधर्मी आहेत.

( कुंडलींत जो ग्रह अधिक बलवान् व प्रभावी असतो त्या त्या ऋतूमध्ये त्या व्यक्तीस कांहीं विशेष प्रकारचीं शुभ फलें प्राप्त व्हावयाचीं असा ह्या ऋतुनिदर्शनांचा हेतु दिसतो. आरोग्याच्या व प्रकृतीच्या बाबतींत याचा अनुभव पाहण्यासारखा आहे )

ग्रहांच्या दृष्टी

ज्या स्थानांत कुंडलींत ग्रह असेल तेथपासून, तृतीय व दशम स्थानीं शनीची पूर्ण व इतर ग्रहांची १।४ दृष्टि असते. नवम व पंचम स्थानीं गुरुची पूर्ण व इतरांची १।२ दृष्टि असते. चतुर्थाष्टम स्थानीं मंगळाची पूर्ण व इतरांची ३।४ दृष्टि, आणि सप्तम स्थानी सर्व ग्रहांचीं पूर्ण दृष्टि. विशेषतः सूर्य - चंद्र - बुध व शुक्र या ग्रहांची स्वस्थानापासून ७ वें स्थानीं बलसंपन्न पूर्ण दृष्टि असते.

ग्रहांचे कालमान विभाग व रस पदार्थ विभाग पुढील प्रमाणें -

सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि

कालमानः- अयन क्षण दिवस ऋतु मास पक्ष वर्ष

रसः- तिखट खारट कडू मिश्र मधुर आम्ल तुरट

( कालाचे निरनिराळे जे विभाग त्यावर कोणाचा अंमल चालतो किंवा कोणत्या कालाचा निदर्शक ग्रह कोणता हें यांत दिले असल्यानें फलनिर्णयाचे प्रसंगी या काळदिग्दर्शनाचा उपयोग करावा. )

सूर्यादि ग्रहांचे मित्र, सम आणि शत्रु

अर्थ - सूर्याचा मित्र - गुरु; चंद्राचे मित्र - बुध व गुरु; मंगळाचे मित्र - शुक्र व बुध; बुधाचे मित्र - सूर्याखेरीज बाकीचे पांच; गुरुचे मित्र - मंगळाशिवाय इतर पांच ग्रह; शुक्राचे मित्र - मंगळ, बुध, गुरु, शनि आणि शनीचे मित्र - बुध, गुरु. आणि शुक्र याप्रमाणें केचिन्मतानें ग्रहमैत्री जाणावी. ( याप्रमाणे शत्र - मित्र पाहुण्याचा प्रचार नाही. )

ग्रहांचे शत्रु - मित्र.

मित्र सम शत्रु

सूर्याचे- चंद्र, मंगळ, गुरु. बुध. शनि, शुक्र.

चंद्राचे- सूर्य, बुध. मंगळ, गुरु, शुक्र, शनि. ... ... ...

मंगळाचे- गुरु, चंद्र, सूर्य. शुक्र, शनि. बुध.

बुधाचे- सूर्य, शुक्र. मंगळ, गुरु, शनि. चंद्र.

गुरुचे- सूर्य, चंद्र, मंगळ. शनि. बुध, शुक्र.

शुक्राचे- बुध, शनि. मंगळ, गुरु. सूर्य, चंद्र.

शनीचे- शुक्र, बुध. गुरु. सूर्य, चंद्र, मंगळ.

सत्याचार्य यांच्या मतानें प्रत्येक ग्रहाच्या स्वतःच्या मूल त्रिकोणाच्या राशीपासून द्वितीय, चतुर्थ, पंचम, अष्टम, नवम, आणि द्वादश, या स्थानांचे अधिपति, तसेंच त्यांच्या उच्वराशीचा अधिपति हे त्या ग्रहाचे मित्र होतात. त्याशिवाय बाकीच्या स्थानांचे अधिपति हे त्या ग्रहाचे शत्रु समजावे.

[ रवि व चंद्र यांच्या वांचून बाकीचे पांच ग्रह दोन दोन राशींचे अधिपति असतात. ( जसें - मंगळ मेष राशीचा व वृश्चिक राशीचा अधिपति आहे ) म्हणून ते एका राशींच्या अधिपगित्वामुळें एका ग्रहाचे वर सांगितल्याप्रमाणें मित्र होतात, तथापि दुसर्‍या राशीच्या आधिपत्यामुळें त्या ग्रहाचे ते शत्रु होऊं शकतात. यासाठीं याचा निर्णय हा कीं, जो ग्रह एका राशीच्या आधिपत्यामुळें कोणत्याही ग्रहाचा मित्र, पण दुसर्‍या ग्रहाशी मैत्री किंवा शत्रुत्व न स्वीकारितां केवळ समत्व धारण करतो. अशा ग्रहास सम '' तटस्थ '' अशी संज्ञा आहे. ]

एक ग्रह दुसर्‍या ग्रहाचा अनुक्रमें मित्र, शत्रु किंवा सम असेल तर तो दुसरा ग्रह त्या पहिल्या ग्रहाचा अनुक्रमें मित्र, शत्रु किंवा समच असेल असें नाहीं.

उदाहरणार्थ - बुधाचा मंगळ सम आहे, पण मंगळाचा बुध केवळ शत्रु आहे.

अर्थ - ग्रह परस्परांपासुन द्वितीय, द्वादश, तृतीर्यकादश, आणि, चतुर्थदशम असे असतील, तर ते तेवढ्या कळेपुरतें परस्परांचे मित्र, एरवी शत्रू. असे कित्येक आचार्याचें नत आहे. कित्येक आचार्य पुन्हां असे म्हणतात कीं, अन्य ग्रहांच्या उच्चराशिस्थित ग्रहसुद्धां त्या ग्रहांचे तात्कालिक मित्र होतात.

एकच राशीचें अधिपत्य असणारे सूर्य व चंद्र हे दोन ग्रह व दोन दोन राशीचे अधिपत्य बाळगणारे भौमादि पांच ग्रह, आणि ज्यास अधिपत्याचा मुळीच अधिकार नाहीं असे राहु व केतु हे दोन ग्रह, हे परस्पराचें तात्कालिक मित्र -- शत्रु -- किंवा सम असतील. त्यापेक्षां सत्याचार्याचे मतानेम निराळ्या प्रकारचें होतील व केचिन्मताने त्यापेक्षाहि निराळ्या तर्‍हेचें होतील, तर या तिन्ही पक्षांची सरासरी काढून त्यास '' अधिमित्र '' '' अधिशत्रू '' '' सामान्य शत्रु '' इत्यादि आपल्या समजुतीस पटतील अशा संज्ञा कल्पनेनें योजून, ग्रहांचे अयोग्य भावांचे बारीक भेद शुभाशुभ वर्तविणाराने चांगलें ध्यानांत वागवावें.

स्थानबल व दिशाबल ( दोधक )

अर्थ - ग्रह आपल्या उच्च राशीस, मित्र क्षेत्री, मूळ त्रिकोण राशीस, आपल्या नवाशी, किंवा स्वक्षेत्री असल्यास तो स्थानतः बलिष्ठ होतो आणि पूर्व दिशेस बुध आणि गुरु, दक्षिण दिशेस सूर्य व मंगळ, पश्चिम दिशेस शनि आणि उत्तरेस चन्द्र व शुक्र असले म्हणजे तें दिग्बली होतात. ( मित्रदोधक ) ( राशिकुंडली पाहा )

चेष्टाबळ

अर्थ - सूर्य चन्द्र उत्तरायणांत ( मकरादि राशिषट्कांत ) असतां व इतर सर्व भौमादि ग्रह वक्र अगर चन्द्राशी संयुक्त किंवा पुष्कळ तेजाने युक्त असतां किंवा ग्रहयुद्धांत दुसर्‍या ग्रहांच्या उत्तरेस असतां, ते चेष्टाबली होतात, जो ग्रह ज्या स्थानी बलिष्ठ होतो, तोच ग्रह त्यापासून सप्तम स्थानी निर्बली होतो.

कालबल व नैसर्गिक बळ

अर्थ - चन्द्र, मंगळ आणि शनि हे रात्री बळी, बुध दिवारात्री सारखा बळी आणि सूर्य, चन्द्र व शुक्र हें दिवसा बळी जाणावें. क्रूर ग्रह कृष्णपक्षी आणि सौम्य ग्रह शुक्लपक्षी बलिष्ट होतात. वर्ष, मास, दिवस आणि होरा यांचे स्वामी आपआपल्या कालावधींत बलिष्ठ असतात. ( कृष्णपक्षांत चन्द्र क्रूर होतो, तरी शुभ ग्रहाने दुष्ट असेल तर बलवान असतो )

शनि मंगळ, बुध, गुरु, शुक्र, चन्द्र आणि सूर्य, हें स्वभावतः उत्तरोत्तर जास्त बलवत्तर जाणावे.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP