बृहज्जातक - अध्याय २८

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


अध्यायांचा उल्लेख

अर्थ -- १ राशिप्रभेद, २ ग्रहयोनिभेद, ३ वियोनि जन्म, ४ निषेककाल, ५ जन्म, ६ रिष्ट, ७ आयुर्दाय, ८ दशाविपाक, ९ अष्टकवर्ग, १० कर्माजीव, ११ राजयोग, १२ नाभसयोग, १३ चंद्रयोग, १४ द्विग्रहयोग, १५ प्रव्रज्या, १६ राशीशिल, १७ दृष्टिफल, १८ भावफल, १९ आश्रययोग, २० प्रकीर्णयोग, २१ अनिष्टयोग, २२ स्त्रीजातक, २३ निर्यांण, २४ नष्टजन्म, २५ द्रेष्काणस्वरुप, यांप्रकारे पंचवीस अध्याय या जातकाचें आहेत. आतां यात्रिकाचे सांगतो.

यात्रिक

अर्थ -- १ प्रश्न, २ तिथि, ३ नक्षत्र, ४ दिवस, ५ क्षण, ६ चंद्र, ७ लग्न, ८ लग्नभेद, ९ ग्रहशुद्धि, १० अपवाद, ११ मिश्रक, १२ देहस्फुरण, १३ गुह्यकपूजन, १४ स्वप्न, १५ स्नानविधी, १६ ग्रहयज्ञ, १७ निर्गम, १८ शकुनोपदेश असे कमेकरुन अध्याय आहेत.

अर्थ -- विवाहपटल व ग्रहांचा करणग्रंथ ( पंचसिद्धांत ) यांचें अव्याय बहुत आहेत. यास्तव त्यांत सांगितलेलें आहेत. याप्रकारे मी त्रिस्कंच ज्योतिषाचा संग्रह दैवज्ञ जे त्यांचे हितास्तव केला आहे.

सज्जन प्रार्थना

अर्थ -- अन्य आचार्यांनी हे शास्त्र सर्व प्रकारे विस्तारे करुन रचिलेंलें आहे. त्या विस्तृत अशा शास्त्राचें ज्ञानास्तव व बुद्धीच्या शृंगात निर्मलत्व आणण्यास थोडक्यांत समर्थ असे हे जातक मी केलें आहे. यामध्ये जे जे अयुक्त सांगितलेलें असेल त्याची सज्जनांही क्षमा करावी.

अर्थ -- या ग्रथाच्या प्रचारे करुन ह्यांतील लेख्यसंबंधाने जे कांही नष्ट होईल; ते बहुश्रुत अशांचे मुखापासून क्रमानें समजून घ्यावें. तसेच मजकडून वाईट किंवा अल्प किंवा इच्छित असे झालेलें असेल, तेही विद्वानांनी मत्सरभाव सोडून तेंच चांगले व पूर्ण असे करावें.

अर्थ -- कापित्याख्य ( काल्पी ) ग्रामी आदित्यदासाचा मी पुत्र, त्याजपासून ज्ञानप्राप्ति करुन श्री सूर्यनारायणाचा वरप्रसाद प्राप्त होत्साता, अवंखिकस्थ ( उज्जयनीस्थ ) असा मुनीची मतें अवलोकन करुन हे श्रेष्ठ जातक ( बृहज्जातक ) मी वराहमिहीर शोभायमान असे करतां झाली.

अर्थ -- श्रीदिनकर, मुनि, गुरु यांचें चरणी नमस्कार करुन त्यांच्या अनुग्रहबुद्धीने हे शास्त्रसंग्रहण मी केले. तस्मात त्यां पूर्व शास्त्रकारागही माझे नमन असो.

॥ इति श्रीवराहमिहिराचार्यकृत बृहज्जातक समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP