बृहज्जातक - अध्याय २७

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


मेषगत द्रेष्काणांची लक्षणें

अर्थ -- मेषराशीच्या द्रेष्काणांचीं स्वरुपे.

प्रश्न -- कमरेस शुभ्र वस्त्र वेष्टित; कुष्णवर्ण, रक्षणसमर्थ, भयंकर, परशु उगारलेला; आरक्तनेत्र असा पुरुष.

द्वितीय -- तांबडे वस्त्र नेसलेली, भूषणे व भक्ष्यामध्ये चित्त, कुंभाकृति, अश्वमुखी, तृषित; एकपादा, अशी स्त्री, असे यवनाचार्य यांही सांगितलें आहे.

तृतीय -- क्रूर, कलाकुशल, पिंगट, कार्योत्सूक, व्रतभग्न, दंश उभारलेला, रक्तवस्त्रधारी, क्रोधी, असा पुरुष.

वृषबगत द्रेष्काणांची लक्षणें.

अर्थ -- वृषभराशीच्या द्रेष्काणांची स्वरुपे.

प्रश्न -- कुटिल व कापलेले असें केश, कुंभाकुति; दग्धवस्त्रा, तृषिता, भक्षयतत्पर, भूषणेच्छु, अशी स्त्री,

द्वितीय -- क्षेत्र, धान्य, गृह, गाई, नांगर, गाडें आणि कला, ज्ञान यांत प्रवीण व बैलासारिखें खांद्यावर ओझें, क्षुधित, बोकडासारिखें तोंड, मळकी वस्त्रें असा पुरुष.

तृतीय -- हत्तीसारिखें शरीर स्थूल, श्वेतदंत, स्थूलपाद, पिंगट, एकके, मृग यांचें प्राप्तीविषयीं उत्सुक, असा पुरुष.

मिथुनगत द्रेष्काणांची लक्षणे.

अर्थ -- मिथुनराशीच्या द्रेंष्काणाची स्वरुपे.

प्रश्न -- सुईने शिवणकाम करण्याची प्रीति ( कशिदा इ. ) स्वरुपवान; भूषणें मिळण्याविषयी आर्जवी प्रजाहीन, हात वर केलेली ऋतुमति अशी स्त्री, हे असें स्वरुप होराशास्त्र सांगतात.

द्वि० -- बागेमध्ये राहाणारा; कवच, धनुष्य धारण केलेला, शूर, शस्त्रधारी गरुडमुख, क्रीडा, धन, भूषणें, मुलें याची चिंता, असा पुरुष.

तृ० -- वरुणासारिखा बहुरत्न भूषित, भाता, धनुष्य, कवच. बाण अशीं धारण केलेला, नृत्य, वाद्य, कला यामध्ये कुशल, काव्यकर्ता, विद्वान असा पुरुष

कर्कगत द्रेंष्काणांची लक्षणें

अर्थ -- कर्क राशीच्या द्रेष्काणांची स्वरुपे.

प्र० -- पानें, फळें, मुलें ही धारण केलेला, हत्तीसारखें शरीर, मलयवनामध्ये गेलेला, शरभासमान पाय, डुकरासारखे तोंड, घोड्यासारखें मान असा पुरुष.

द्वि० -- शिरावर कमळें वाहिलेलीं, सर्पयुक्ता, कर्कशा, अरण्यामध्ये आक्रोश करणारी, पळसाचे खांदीचे आश्रयाने असलेलीं अशीं स्त्री.

तृ० -- स्त्रियेच्या अलंकार प्राप्तीस्तव समुद्रांत नौकेमध्ये जाणारा, सर्पवेष्टित, सुवर्णालकारांनी युक्त, चिपिटमुख असा पुरुष.

सिंहगत द्रेंष्काणांची लक्षणें.

अर्थ -- सिंहराशीच्या द्रेष्काणांची स्वरुपें.

प्र० -- सांवरीचे वृक्षावर गृध्र, जंबुक, श्वान यांसह वर्तमान; मळकी वस्त्रें; मातापित्याचें वियोगानें आक्रोश करणारा असा पुरुष.

द्वि० -- अश्वाकृति, शिरावर पांढरे पुष्प, कृष्णाजिन, कांबळ अशी घेतलेला; सिंहासारखा भयंकर, धनुषयुक्त. नाकाचा शेंडा वाकडा लवलेला असा पुरुष.

तृ० -- माकडतोंड्या, वानरासारिखें चाळे, मांस, दंड, फळें अशी धारण केलेला, कूर्ची ( मुखावरील केश दीर्घ व कुटिल ) असा पुरुष.

कन्यागत द्रेष्काणांचीं लक्षणें

अर्थ -- कन्याराशीच्या द्रेष्काणांची स्वरुपे.

प्र० -- पुष्पयुक्त घटासह, मळकी वस्त्रें शरीरास आच्छादून, वस्त्रें व धन यास्तव गुरुकडेच जाणारी अशी कुमारीका.

द्वि० -- हातीं लेखणी, डोक्यास वस्त्र गुंडाळलेलें, पुष्कळ देवघेव करणारा, धनुष्याधारी शरीर केसाळ असा पुरुष.

तृ० -- गौरवर्ण, सुंदर, धौतवस्त्रामध्ये झांकलेलीं, उंच बांध्याची, हातांत कुंभ व पळी घेतलेली, स्त्रियांसह देवालयास जाण्यास उद्युक्त अशी स्त्री.

तुलायत द्रेष्काणांची लक्षणें

अर्थ० -- तूळराशीच्या द्रेष्काणाची स्वरुपे.

प्र० -- वाजारचे मार्गानें जाणारा, तुळायुक्त, हिशेवामध्ये प्रवीण, किंमतीचा पदार्थ हातांत घेऊन याची किंमत इतकी अशी कल्पना करतो आहे असा पुरुष.

द्वि० -- गृध्रमुख, कलश घेऊ कांही पडलें काय ? अशा संशयांत, क्षुधित व तृपित. स्त्री - पुत्रांचे स्मरण करीत होत्साता, गमन करतो आहे असा पुरुष.

तृ० -- रत्नांनी सुशोभित. सुवर्णमय भाता, कवच धारण करणारा, वनामध्ये मृगास भिववीत उभा. वानररुप, फळें व मांस घेतलेला असा पुरुष असे स्वरुप यवनाचार्य सांगतात

वृश्चिक द्रेष्काणांची लक्षणें.

अर्थ -- वृश्चिक राशीच्या द्रेष्काणांची स्वरुपे.

प्र० -- वस्त्राभरणांनीं हीन, महासागरांतून तिरी येत आहे. स्थानभ्रष्ट पायांस सर्प वेष्टन, मनोहर अशी स्त्री.

द्वि० -- पतिस्तव स्थान व सुख यांची प्राष्ति इच्छिये, शरीरास भुजंगवेष्टन कासव व कुंभासारखें शरीर अशी स्त्री.

तृ० -- पसरट चपटें, कासवासारखें असे मुख, श्वान, मृग, कोल्हे, डूकरे यांस भयंकर, मलयचंदनाचा प्रदेश रक्षिता असा सिंह.

धनुर्गत द्रेष्काणांचीं लक्षणे.

अर्थ० -- धनराशीच्या द्रेष्काणांची स्वरुपे.

प्र० -- मनुष्यमुख, अश्वसमान शरीर, दीर्घ धनुष्य घेऊन स्वस्थानीं यज्ञाची योजना व तपस्व्याचें रक्षणी तत्पर असा पुरुष

द्वि० -- मनोहर, सुवर्ण चंपकासारखा वर्ण, श्रेष्ठासनीं बसलेली, मध्यमरुचा, समुद्रांतील रत्ने गुंफिते अशी स्त्री.

तृ० -- दीर्घश्मश्रु, सोनचाफ्याचें पुष्पासारखा वर्ण, श्रेष्ठासनस्थ, दंडधारी रेशमी वस्त्रें व कृष्णाजिन धारण केलेला असा पुरुष.

मकरस्य द्रेष्कारणांची लक्षणें

अर्थ -- मकरराशीच्या द्रेष्काणांची स्वरुपे.

प्र० -- शरीर केसाळ, मषरिसारखें दांत, डुकरासारखें शरीर, बैल बांधण्याची रखंडें, जाळीं, बंधनें, इत्यादिक धारण केलेला, भयंकर सुख असलेला पुरुष.

द्वि० -- कलाभिज्ञ, कमळ पत्रासारखें विशाल नेत्र, श्यामवर्ण, विचित्र वस्तूची याचना करणारी, भूषणें धारण केलेले लोहयुक्त कर्ण अशी स्त्री.

तृ० -- अश्वमुख, कांबळी, भाता, धनुष्य, कवच याहीं युक्त, रत्नखचित कुंभ खांद्यावर घेतलेला असा पुरुष.

अर्थ -- कुभराशीच्या द्रेष्काणांची स्वरुपे

प्र० -- तैल, मद्य, जल, भोजन ही प्राप्त होण्यासाठीं चित्त व्याकुळ, कांबळी, रेखी वस्त्रे, कृष्णाजिन बाहीं युक्त, गुलावासारिखें मुख असा पुरुष

द्वि० -- शाल्मलि वृक्षाचें ठायीं क्षग्ध शकटासह वनामध्ये लोखंड गोळा करते. मलिन वस्त्र वेष्टित, मस्तकांवर भांडें घेतलेली अशी स्त्री.

तृ० -- श्यामकर्ण, कानावर केस, मुगुटधारी, दालचिनी, लवंगा, फळें यांसह लोखंडी भांडी यांची ने - आण करणारा असा पुरुष.

अर्थ -- मीनराशिस्थ द्रेष्काणांची स्वरुपे.

प्र० -- यज्ञांतील भांडीं. मोत्ये, शंख इत्यादि मिश्र असे पदार्थ हातामध्ये असून कळ लागलेला, स्त्री, भूषणे, मिळण्यास्तव समुद्रामध्ये नीकेते बसून जात आहे असा पुरुष.

द्वि० -- अति उंच असे शीड उभारलेल्या गलबतामध्ये बसून समुद्राचें तिराशीं येत आहे परिवारयुक्त, चंपकासारखें मुख व वर्ण अशी स्त्री

तृ० -- बिळापाशी सर्व वेष्टित, वस्त्रहीन, वनामध्ये चोर व अग्नि याहीं करुन अंतरात्मा व्याकुळ होत्साता आक्रोश करत आहे असा पुरुष.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP