बृहज्जातक - अध्याय १८

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


सूर्यराशिंशील ( औपच्छंदसिका )

अर्थ -- सूर्य द्वादशराशिस्थित फलें.

मेष -- प्रख्यात, चतुर, हिंडणारा, अल्पद्रव्य शस्त्रधारी - सूर्य परमोच्च फलें अति उत्तम असें जाणावें.

वृषभ -- वस्त्रें, सुगंधीं द्रव्ये यांच्या विक्रयानें जीवन, स्त्रियांचा द्वेष्टवान गीतवाद्य कुशल.

मिथुन -- विद्वान, ज्योर्तिषी धनवान

कर्क -- तामसी, निर्धन, परकार्यतत्पर, श्रम, मागं; क्लेश याहीं युक्त

सिंह -- अरण्य, पर्वत, गुरांचे कळप या स्थळीं प्रीति, बलिष्ट, अज्ञ

कन्या -- लिहिणे, चित्रें, कवित्व, गणित, यांत कुशल, स्त्रीसदृशदेह

तूळ -- मद्यकार, सूवर्णकार, हिंडणारा, अनुचित कर्मा

वृश्चिक -- क्रूर, साहसी, विषार्जितधनी, शस्त्रपरीक्षक

धनु -- श्रेष्ठास पूज्य, धनवान, तीव्र; वैद्य शिल्पज्ञाता

मकर -- नीच, अज्ञ, दुर्व्यापार, अल्पद्रव्य, लोभी, परभाग्यासक्त

कुंभ -- नीच, पुत्र व भाग्य ही नष्ट निर्धन

मीन -- जलोत्पन्न पदार्थविक्रयानें संपन्न, स्त्रियास पूज्य

( राशिचक्राचें कालांगावर जेथें सूर्य व चन्द्र असतील तेथें लक्ष्म चिन्ह सांगावें. )

मंगळराशिशील

अर्थ -- मंगळ द्वादशराशिस्थित फले.

स्वगृहीं -- राजपूज्य, भ्रमणशील, सेनाधीप, वणिक्, सधन, शरीरव्रणांकित शरीर, अनेकविषय.

शुक्रगृहीं -- स्त्रीवश, मित्राशीं विषम, परदारासक्त, इंद्रजाली ( गारुडी ) विष, भिरु, कर्कश.

बुधगृहीं -- तेजस्वी, पुत्रवान, मित्रवर्ज्यं, परोपकारी, गीत, वाद्य, युद्ध, यालांमध्ये कुशल, कृपण, निर्भय, याचक.

चन्द्रगृहीं -- द्रव्यवान, नाकेत द्रव्य संपादन, शाहाणा, व्यंग व खाष्ट असा.

सिंहेस -- निर्धन क्लेश सोसणारा, अरण्यवासी, स्त्रीपुत्र हें अल्प.

गुरुगृहीं -- बहुशत्रू, राजमंत्री, विख्यात, निर्भय, अल्पपुत्र.

मकरेस -- बहुधन, पूत्रयुक्त, राजा किंवा राजतूल्य.

कुंभेस -- दुःखी, दरिद्री, भ्रमणशील, असत्यवचन, तामसी.

बुधराशिस्वरुप

अर्थ -- बुध द्वादशराशीस्थित फलें.

मंगळगृहीं -- जुगार, कर्ज, मद्यपान यांत निमग्न, नास्तिक. चोर, निर्षद, दुष्ट स्त्री, कपटी, असत्यवचनी.

शुक्रगृहीं -- गुरुश्रेष्ठ, पुत्र, स्त्री, धनार्जन ही बहुत, दाता व गुरुभक्तिभिपरायण.

मिथुनेस - वाचाळ, शास्त्रकलाप्रवीण, सुखासक्त, प्रियभाषिणी.

कर्केस -- जलापासून द्रव्योपार्जन, स्वजनाचा वैरी.

सिंहेस -- स्त्रीद्वेष्टा, धन, पुत्र, सुख याहीं हीन भ्रमणशील, मूर्ख, स्त्रियाचा अर्भिलाषी, स्वजनापासून अनादर.

कन्येस -- उदार, ज्ञानी, बहुगुणी, सुखी, क्षमावान, युक्तिवान निर्भय.

शनिगृहीं -- परकीय कार्य करणारा, निर्धन, शिल्पबुद्धी, ऋणी, आज्ञा करणारा.

धनेस -- राजपूज्य, पंडित, युक्तवचन ( हजरबाबी )

मीनेस -- सेवाकुशल, अत्यंत शिल्पकुशल

गुरुराशिशील

अर्थ -- गुरु द्वादशराशिस्थित फलें.

मंगळगृहीं -- सेनापती, धन, स्त्रीं, पुत्र यांचें विशेष ( बहुत ) सौख्य, उदार, उत्तम, सेवक, क्षमा - शील, तेजस्वी, स्त्रीसौख्य, विख्यात.

शुक्रगृहीं -- दृढ़ शरीर, धन, अर्थ, मित्र, पुत्र यांही युक्त उदार प्रिय

बुधगृहीं -- आच्छादकवस्त्रें ( कनाती, चांदण्या इत्यादि ) बहुपुत्र, बहुमित्र सचिवपणा आणि सुखी.

कर्केस -- रत्नें, संतति, धन, स्त्री, वैभव ज्ञान, सुख यांही युक्त.

सिंहेस -- सेनापती, ( बाकी सर्व कर्कराशीप्रमाणें म्हणजे वरप्रमाणें )

मकरेस -- नीच, अल्पधन व असुखी

कुंभेस -- कर्केस सांगितल्याप्रमाणे

स्वगृही -- मांडलिक, राजमंत्री सेनापति किंवा धनवान.

शुक्रराशिस्वरुप

अर्थ -- शुक्र द्वादश राशिस्थित फलें.

मंगळगृहीं -- परदारासक्त, त्यास्तव वैभवाचा नाश आणि कुलास हीनत्व.

स्वगृही - स्वबलानें व स्वबुद्धीनें धनार्जन, राजपूज्य, स्वजनप्रमुख, प्रख्यांत निर्भय.

मिथुनेंस -- राजकार्य करणारा, धनवान, कलानिपुण

कन्येस -- अति नीच कर्म कर्ता

शनिगृहीं -- स्वरुपवान, स्त्रीवश अनिष्ट दुष्ट व कुस्त्रियांशी रत.

कर्केस -- द्विभायी, याचक, भीरु, अतिगर्वी अति दुःखी

सिंहेस -- स्त्रीकडून धन प्राप्त, स्त्रीप्रावल्य अल्पपुत्र

धनेंस -- सर्वमान्य. सध

मीनेस -- विद्वान, धनाढ्य, राजपूज्य अतिप्रिय

शनिरशिशील

अर्थ -- शनिद्वादशराशिस्थित फलें.

मेषस -- मूर्ख, भ्रमणशील कपटी मित्रहीन

वृश्चिकेस -- वध, बंधनशील चपल, निर्दय

बुधगृही -- लज्जा, सुख धन पुत्र याहीं करुन हीन, लिहितांना मध्ये गुंतणारा, रक्षणकर्ता. मुख्यांचा मुख्य.

वृषभेस -- अगम्य स्त्रियांचा अभिलाषी, अल्प वैभव बहुभार्या

तूळेस -- विख्यात, समुदाय, नगर ग्राम यामध्ये श्रेष्ट व द्रव्यवान

कर्केस -- दरिद्री. विकलहंत पुत्रमातृहीन, अज्ञ

सिंहेस -- असज्जन सुखहीन पुत्रहीन विष्टिकर्ता ( ओझी वहाणारा )

गुरुगृहीं -- अन्तकाळी शुभ, राजगृहीं विश्वासू, पुत्र, स्त्री, धन, हीं उत्तम, नगर, सैन्य, ग्राम, यांच्या मुख्यांचा मुख्य.

स्वगृहीं -- परधन, परस्त्री याही संयुक्त, पूर, बल, ग्राम यांचा मुख्य मंद दृष्टी, मलिन, स्थिरधन, स्थिर वैभव, भोक्ता ( असंचयशील )

लग्नराशिशील

अर्थ -- चन्द्रयुक्त राशीच्या ( श्लोक १ ते १३ ) व चन्द्र दृष्टींच्या ( पुढील अध्याय ) फलासारखेंच लग्नयुक्त राशींची ही फलें धेण्यास पूर्व मुनि विशेषत्वेंकरुन सांगतात -- आणि कोणत्याहि स्थानापासून त्याचा स्वामी ज्या भावी ( स्थानीं ) असेल, त्या भावाचें व त्याचें स्वामीचे गुणाप्रमाणे ( बळाप्रमाणे ) त्यांचे फलांची योजना करावी ( पुष्टि किंवा हानी ) हे इतके मात्र अधिक आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP