मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


न यत्पुरस्तादुत यन्न पश्चान्मध्ये च तत्तद्व्यपदेशमात्रम् ।

भूतं प्रसिद्धं च परेण यद्यत्तदेव तस्यादिति मे मनीषा ॥२१॥

जागृतीमाजीं जें जें दिसे। तें तें जागृतीसवें नासे ।

स्वप्नीं जें जें आभासे । तें स्वप्नासरिसें मावळे ॥८१॥

जागृती स्वप्न निजकार्येंसीं । दोनी हारपती सुषुप्तीपाशीं ।

सुषुप्ति हारपे जागृतीसीं । यापरी प्रपंचासी सत्यत्व नाहीं ॥८२॥

प्रपंच सृष्टीपूर्वीं नाहीं । प्रळयानंतर नुरेचि कांहीं ।

मध्येंचि आभासे जें कांहीं । तें मिथ्या पाहीं असंत ॥८३॥

प्रपंचाचें वोडंबर । नामरुपाचे उभारी भार ।

तें प्रत्यक्ष देखों नश्वर । गंधर्वनगर तत्प्राय ॥८४॥

पित्यादेखतां पुत्र मरे । पुत्रादेखतां पिता झुरे ।

काळें काळ अवघेंचि सरे । कोणीही नुरे क्रियेसी ॥८५॥

सागरीं जे लहरी उसासे । उसासली ते स्वयेंचि नासे ।

तेवीं नामरुपा आलें दिसे । तें अनायासें नश्वर ॥८६॥

प्रपंच हें नाममात्र । येरवीं परमात्मा मी स्वतंत्र ।

एवं संसाराचें जन्मपत्र । नेणोनि दुस्तर मानिती जीव ॥८७॥

प्रपंच ज्यापासूनि झाला । जेणें सर्वार्थीं प्रकाशिला ।

अंतीं ज्यामाजीं सामावला । तो तद्रूप संचला निजात्मा ॥८८॥

शुक्तिकारजतन्यायें जाण । प्रपंच ब्रह्मेंसीं अभिन्न ।

जें प्रपंचाचें स्फुरे स्फुरण । तें ब्रह्मचि पूर्ण उद्धवा ॥८९॥

त्या माझेनि सत्य श्रुतिस्मृती । तो मी सत्यप्रतिज्ञ श्रीपती ।

त्रिसत्य सत्य तुजप्रती । सांगितला निश्चितीं निजभावार्थ ॥२९०॥

ऐकोन देवाचें वचन । उद्धव आशंकी आपण ।

एकाचेनि मतें जाण । प्रपंच भिन्न मानिती ॥९१॥

प्रपंचासी देवो कांहीं । निजांगीं आतळला नाहीं ।

ऐसें तूं कल्पिसी कांहीं । ऐक तेविषयीं सांगेन ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP