मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ७ व ८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


इदं गुणमयं विद्धि, त्रिविधं मायया कृतम् ॥७॥

एतद्विद्वान्मदुदितं, ज्ञानविज्ञाननैपुणम् ।

न निन्दति न च स्तौति, लोके चरति सूर्यवत् ॥८॥

अध्यात्म अधिदैव अधिभूत । हें त्रिविध जग मायाकृत ।

नसतें मजमाजीं आभासत । जाण निश्चित त्रिगुणात्मक ॥४॥

उद्धवा मिथ्या म्हणोनि तूं एथ । झणें होशी उपेक्षायुक्त ।

येणें मद्वाक्यें साधुसंत । ज्ञानविज्ञानार्थ पावले ॥५॥

प्रपंचाचें मिथ्या भान । तेंचि ज्ञानाचें मुख्य ज्ञान ।

येणें ज्ञानें जो सज्ञान । तोचि समान सर्वांभूतीं ॥६॥

यालागीं भूतांचे गुणागुण । कदा न वदे निंदास्तवन ।

सूर्याचे परी जाण । विचरे आपण समसाम्यें ॥७॥

बदरिकाश्रम उत्तरदेशीं । सेतुबंध दक्षिणेसी ।

सूर्य संमुख सर्वांसी । विमुखता त्यासी असेना ॥८॥

सूर्य संमुख पूर्वेच्यांसी । तोचि विमुख पचिमेच्यांसी ।

नाहीं, तेवीं मी सर्वत्र सर्वांसी । विमुखता मजसी असेना ॥९॥

सामर्थ्यें तम दवडूनि जाण । भूतांसी सूर्य भेटे आपण ।

तेविं जगाचे दवडूनि दोषगुण । साधुसज्जन विचरती ॥११०॥

जें हें बोलिलें ज्ञानलक्षण । तेंचि सिद्धांचें पूर्णपण ।

मुमुक्षीं हें अनुसंधान । सावधान साधावें ॥११॥

हेंचि पाविजे निजज्ञान । तेचि अर्थींचें साधन ।

उद्धवालागीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP