एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यत्र यत्र मनो देही धारयेत्सकलं धिया ।

स्नेहाद् द्वेषाद् भयाद् वापि याति तत्तत्स्वरूपताम् ॥२२॥

काया वाचा आणि मन । पुरुषें एकाग्र करून ।

जे जे वस्तूचें करी ध्यान । तद्‌रूप जाण तो तो होय ॥३६॥

स्नेहें द्वेषें अथवा भयें । दृढ ध्यान जेणें होये ।

तेणेंचि तद्‌रूपता लाहे । उभवूनि बाहे सांगतू ॥३७॥

देह गेलिया तद्‌रूपता । होईल हें वचन वृथा ।

येणेंचि देहें येथ असतां । तद्‌रूपता पाविजे ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP