मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
विनंती अर्ज

सगनभाऊ - विनंती अर्ज

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


चित्तापासुनि प्राण सख्याला आर्ज विनंती माझी ॥

रसातळी बसविले आझुन का पाठ पुरविली माझी ॥ध्रु०॥

तुम्ही कुटुंबवत्सल तुम्हासी प्रीत करू नये केली ॥

कसे पुढे होईल कळेना ठाई गोष्टहि गेली ॥

रात्रंदिवस घोर पतीचा कधि तरी जाइन मेली ॥

माझ्यावरच्या वाट साखरा होईन ख्याली खुषाली ॥

वेल मांडवावर जाईचा जाई गुंतल वेली ॥

जाणून बुजून कळी तोडिता गळून भूमीवर पडली ॥

आकल गुंग कशास्तव जाहाली का बोलाना दाजी ॥

बरे दिसल ते करा ज्यामधी पंढरीनाथ राजी ॥

चित्तापासुनी प्राण ॥१॥

कथा किर्तनी नित्य जाता सारसारल्या गोष्टी ॥

अर्थ करून सांगते उभयताची होते संतुष्टी ॥

शब्द कसे मुक्ताफळ केवळ होती अमृतवृष्टी ॥

मुळमाया सोडून बरळता दाविता कड आष्टी ॥

ब्रह्मज्ञान कथुन काही जोत पडेना दृष्टी ॥

नाव ठेवाया जागा नाही वेडी मी होते कष्टी ॥

कर्णे प्राप्त तुझा आम्हासी प्रितराव ऐकोजी ॥

घरकुटुंब सांभाळुन क्षणभर बसवेना बसले जी ॥२॥

वजनदार भार न सुद उत्तर केले धरून फुगाई ॥

ज्वारि बाजरी रोगी गव्हाची जाहाली नाही सुगाई ॥

गुजराथ कि हो हिंदुस्थानापासुनि आणली लुगाई ॥

अलंकारभूषणे दिल्यावर ठेवलेनाव नगाई ॥

जडाव नग तेजी म्हणता पैसा करित उगाई ॥

पाक स्नेहाचा पैका आम्हावर नाहि घेतला करजी ॥

कसा देईल देणार आमुची प्रित आहे बिनव्याजी ॥३॥

देयाघेयाचा उदिम झाला लज्जा का वेव्हारी ॥

ते काही घडले नाही बबरा केला मोठा भारी ॥

डोळ्याने पाहिले पदर पसरून मागितली वारी ॥

नाही करूना आलि परंतु भाषण एक जिव्हारी ॥

न्हाण आल्यास चवथे वर्ष नाही कर्ण कुवारी ॥

लेकुरवाळी दिले दाखले खोवले बोल जिव्हारी ॥

आंधळे मुके बहिरे त्याजमधि संतध्वनीची वाजी ॥

सगनभाऊ म्हणे नका करू फळ नाही बिघडल मर्जी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP