मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
माझ्या हरा

सगनभाऊ - माझ्या हरा

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


ग्रहि चला जरा मज कमलणिच्या हरा ॥

मज गरिबासी तारा अथवा मारा ॥ध्रु०॥

खुरबान तुला प्राण हवाला केला ॥

या पलंगी बसा धावुन धरिते शेला ॥

सिकविले तुला हा पण सिद्धीस नेला ॥

राजेंद्र धनी शब्द सुखाचा बोला ॥

स्वप्नात मला मदनबाण चेतला ॥

दचकुन उठले द्वारी आले पाह्याला ॥

तुज वाचुन मजला नाही कोणाचा थारा ॥१॥

लावुनि माया भोगा कवळी काया ॥

कोण्या गोष्टीचा आंतर पडले पाया ॥

चंचल चर्या आज दिसली गुणिराया ॥

मि कुळिवंताची काया तुमची जाया ॥

मुखडा पाह्या उभी राहते धाउनि या ॥

आज कृपा करा चला महाली लवलाह्या ॥

नको देउ दगा आज दिसला चित्त चोरा ॥२॥

मुठ भ्रमाची बाही फोडित लाखाची ॥

मी जोड केली सजनाच्या पायाची ॥

लई मर्जीची कोण सवत मायेची ॥

तिचे वेड लागले आण माझ्या रक्ताची ॥

या चित्ताचि सोड कल्पना मनिची ॥

आज कृपा करा आण राधासखयाची ॥

सिरदान तुला आज चरा मोत्याचा चारा ॥३॥

रंगित माहाली झटपट मैना गेली ॥

तीन सजन भोगिला अशा प्रितीच्या चाली ॥

लइ मर्जि मिळाली विषयलंपट झाली ॥

अशी प्रीत चालवा आण रक्ताची घाली ॥

ऐकुन चाली जोतिसी जोत मिळाली ॥

गुणी सगन भाउच्या चरणाला मिठि घाली ॥

नित्य गाई रागा जसा पट्ट्याचा मोहरा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP