मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
पादहर्ष

मज्जवहस्त्रोतस - पादहर्ष

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


``हृष्येते चरणौ यस्य भवेतां चापि सुप्तकौ ॥
पादहर्ष: स विज्ञेय: कफवात प्रकोपत: ॥
मा.नि. वातव्याधी म.टीकेसह -

पाद हर्षमाह --, हृष्येत इत्यादि । हृष्येते हर्षयुक्तौ भवत:
हर्षश्च रोमञ्च प्रायोऽन्त: शीतो झिणिझिणिवद्वेदनाविशेष
झिणि झिणि तु न चिरानुबन्धिनो केवलवातजेति भेद: ॥
मा. नि. वा. ६३ पान २०८,९

वातकफाच्या प्रकोपानें पायामधील वातवह धमन्या दुष्ट होऊन पायास सारख्या झिणझिण्या येतात. पायास मुंग्या आल्यासारखें वाटतें. पायाचें स्पर्शज्ञान कमी होतें वा नष्ट होतें. त्यामुळें चालतांना पाय जड होतो व जमिनीवरुन चाललें असतांनाही गादीवरुन चालल्याप्रमाणें वाटतें. कांही वेळां हा विकार हातामध्येंही उत्पन्न होतो.

N/A

References : N/A
Last Updated : August 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP