मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
अवबाहुक

मज्जवहस्त्रोतस - अवबाहुक

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


``सिरा श्चाकुञ्च्य तत्रस्थो जनयेदवबाहुकम् । अवबाहु
कमाह - सिराश्चेत्यादिना । तत्रस्थोंऽसदेशस्थ: सिरा
आकुरञ्च्यावबाहुकं जनयेत् । अयं वातकफज: । अन्ये तु
मिलित्वाऽव बाहुक लक्षणमाहु:, तन्न, यत: सुश्रुतेनोक्तम्
अंसशोषावहबाहुकयोर्बाहुमध्यें सिराव्यध:'' (सु. शा.
स्था. अ. ८) इति ।
एतदनन्तरं सुश्रुतेन बाधिर्यं पठितं `यदा शब्दवह वायु:
(सु. नि. स्था. अ. १)''
इत्यादिना, माधवेन तु प्रकरणानुरोधं मन्यमानेन कर्ण
रोग एव तत् पठितं, सुश्रुतेन वातव्याधौ बाधीर्य
रुक्तमिति चेत्:, न, संप्राप्तिभेदाभिन्नत्वात्; वात
व्याधौ शब्दवहमित्यनेन कर्णशष्कुल्यवच्छिन्ननभोदेश
उक्त:, शालाक्ये च शब्दवहा: सिरा इत्युक्तम् । माधवेन
तु कर्ण रोगे शब्दा श्रवणत्वविशेषादेतदेव तत्र पठित-
मित्यविरोध: ॥६५॥
मा. नि. वातव्याधी ६५ म. टीकेसह पान २०९

`अंसमूलस्थितो वायु: सिरा: संकोच्य तत्रगा:
बाहु प्रस्पन्दितहरं जनयत्यवबाहुकम् ॥४३॥
वा. नि. १५/४१ पान ५३४

वायु प्रकुपित होऊन अंसातील धमनींना दुष्ट करुन तेथील स्नायूंचा शोष व संकोच करतो. त्यामुळें हाताच्या हालचाली प्रतिबद्ध होतात. विशेषत: हात वरती करणें वा पाठीमागें नेणें अतिशय वेदनायुक्त असते. बाहूंतील कफाचा शोथ होतो हें या लक्षणांचें कारण आहे. अंसशोष व अवबाहुक मिळून एकच व्याधी असल्याचें कांहीं ग्रंथकारांनीं म्हटलें आहे. सुश्रुताच्या वचनावरुन दोन्ही मिळून एकच व्याधी असल्याचे दिसतें. (सु. नि. १-८२०) परंतु तेथेंही टीकाकारानें वाक्यें तोडून हे दोन वेगवेगळ्या रोगांचें वर्णन आहे असें सांगितलें आहे. सुश्रुतानेंच एके ठिकाणीं असंशोष व अवबाहुक यांचा एकत्र उल्लेख केला आहे, त्यावरुन हे रोग वेगवेगळे असल्याचें त्यासही अभिप्रेत आहे असें वाटतें.

N/A

References : N/A
Last Updated : August 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP