वीस अक्षरी वृत्ते - कृति

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


सुवदना:
( ज्ञेया: सप्ताश्वषड् भिर्मरभनययुता भ्लै ग: सुवदना )
जाणावी हो मराभानयभलगगणांनीं ती सुवदना ।
माथातें राखडी भास्वर नगचय ते रंभेपरि सती ।
वेणी तेही प्रलंबा असितसि गमते शोभाच दिसती ॥
पीनोत्तुम्गस्तनानें हृदय विलसतें येईल सदना ।
जेणें देह प्रयागीं क्रकचिं वधियला त्याच्या सुवदना ॥१४३॥
==
वृत्तम्‍ : -
( त्री रजौ गलौ भवेदिहेदृशेन लक्षणेन वृत्तनाम ) : -
राजराजराज यांनीं वृत्तनाम छंद तो घडेल सत्य ।
देवधर्म शुध्दकर्म मुख्य वेद्शास्त्र पाठ नित्य नेम ।
कीर्तनादि साधुपादवंदनक्रिया सुआचरीत होम ॥
त्या पतीस देव मानि अन्य तो पिता म्हणे असीच नीत ।
त्या सतीस हें सुवृत्त जी पतीस आनुकूल श्रेष्ठरीत ॥१४४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP