आठ अक्षरी वृत्तें - अनुष्टुप्

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


माणवकक्रीडितं -
( माणवकं भात्तलगा: ) भातलगीं माणवकम्‍ ।
भोगुनि तापा बहुता ।
येउनि लोकीं बसतां ॥
वृध्दपणा नासवितें ।
माणवका ! क्रीडित तें ॥१६॥
==
चित्रपदा : -
( भौगिति चित्रपदा ग: ): - चित्रपदा व्दिभगांनीं ।
भारति भामिनि नाचे ।
शांतवि काम मनाचे ॥
पाहति कामुक दाते ।
यास्तव चित्रपदातें ॥१७॥
भामिनि भोग कराया ।
तापसपुण्य हराया ॥
तो तिस पाहि न कांही ।
नाचत चित्र पदांहीं ॥१८॥
==
विद्युन्माला -
( मो मो गो गो विद्युन्माला ) : - मानीं गांनीं विद्युन्माला.
मेघश्यामा गौळी मानी ।
इन्द्र स्वर्गैश्वर्यें मानीं ॥
चिंती गोपघ्रा कामाला ।
सोडो मेघा विद्युन्माला ॥१९॥
मत्स्या वामाची जो सोंगें ।
घेतो भक्तासाठीं वेगें ॥
त्या चांचल्यातें पाहाती ।
विद्युन्मा लाजोनी जाती ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP