दहा अक्षरीं वृत्तें - पंक्ति

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


मयूरसारिणी : -
( जौं र्गौ मयूरसारिणी ) : - राज्रगीं मयूरसारिणी ।
राधिका जशीतरा न नारी ।
तीस आज भोग पूतनारी ॥
वाकडी दुजी विषाद देते ।
जाण कीं मयूरसारिणी ते ॥४३॥
राघवें जयार्थ राक्षसांतें ।
मारिलें अनेक ने क्षयातें ॥
मारुती तयासवें मणी तो ।
पन्नगा मयूरसा रणी तो ॥४४॥
==
मत्ता: -
( ज्ञेया मत्ता मभसगयुक्ता. ) : जाणा मत्ता मभसगयुक्ता ।
माध्वी कुंभातुनि सखि घेते ।
क्रीडास्थाना डुलत निघे ते ॥
कामग्रीची लहरि शमाया ।
मत्ता गोपी हरिसि रमाया ॥४५॥
मृव्दीका भोकर समयासी ।
स्वेच्छेनें जें मिळल तयासीं ॥
भक्षूनिया हरिपद पूजी ।
त्याला मत्ता युवति रिपू जी ॥४६॥
==
उपस्थिता : -
( स्जौ ज गुरुणेयमुस्थिता. ) : - ताजाजगिं होइ उपस्थिता ।
तो कृष्ण जसा व्रजि जन्मला ।
लक्ष्मीहि तिथें दिसती मला ॥
छायातरुचेपरि ऐक्यता ।
सोडी न तया तदुपस्थिता ॥४७॥
तो श्रीभजनास जरी करी ।
भूषादिसमस्ताहि लौकरी ।
लाभार्थ तया स्वविती अतां ।
येवोनि सदैव उपस्थिता ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP