अकरा अक्षरी वृत्तें - त्रिष्टुप्

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


स्वागताः
( स्वागतेति रनभाद्‍गुरुयुग्मम्‍ ): -
स्वागता रनभगागगणांनीं ।
राधिका नयनभाव हरीस ।
पाहुनीच आणिताति हरीस ॥
ये तिच्या सदनिं वंद्य संताही ।
खागतादि वचनें नसतां ही ॥७०॥
राधिके निघ नर्भी विधु पाहे ।
कृष्ण हाटकि करोतिकृपा हे ।
राहिले गणि तयांप्रति तोकी ।
स्वागताप चढला मज तो कीं ॥७१॥
राघवा नमिति भाव धरुनी ।
ते घरास अण यत्न करोनी ।
क्षुद्र जें धन तयांस नको तें ।
स्वागतादि वचनें सुख होतें ॥७२॥
==
वृत्ता : -
( ननसगगुरुचिता वृत्ता ) : - ननसगगगणिं घडे वृत्ता
निजधन जरि समजेना कीं ।
वसति हि मग न घडै नाकीं ॥
कमलजहरिहरपादातें ।
विमुख तरि न मिळ सवृत्तातें ॥७३॥
==
श्येनी ; -
( श्येनिका रजौ रलौ गुरुर्यदा ) : - श्येनिका रजारला ग या गणीं
राहसी जरी घरांत तूजला ।
हा उपाय भोगणार्थ पाहिला ॥
श्येनसा रमापती उडोनि ये ।
श्येनिका समान तूं दडोन ये ॥७४॥
रान साजरें बरेंच वाटतें ।
वृक्ष फार वेल तेंहि दाटतें ॥
श्वापदादि संघही अचाट ते ।
श्योनिभीमुळें न पक्षि थाटते ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP