तत्वविवेक - श्लोक ६१ ते ६४

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


अमुना वासनाजाले नि:शेषं प्रविलापिते ॥
समूलोन्मूलिते पुण्यपापाख्ये कर्मसंचये ॥६१॥

आणिक ही येणें साधे ॥ अहंकर्तृत्वाभिमान न बाधे ॥
ज्ञाना ज्ञानादि द्वंद्वें ॥ जाती लया ॥१९०॥
पुण्य पाप कर्में उन्मळूनी ॥ मूळाविद्यासहित नाश होऊनी ॥
आपण राहे सहजासनी ॥ सहजी सहज ॥१९१॥

वाक्यमप्रतिबद्धं सत्प्राकपरोक्षावभासिते ॥
करामलकवद्बोधमपरोक्षं प्रसूयते ॥६२॥

महावाक्यें जागा झाला ॥ तेथ कैचा स्वप्न घोंटाळा ॥
वाझ पुत्राचा सोहळा ॥ जगा मानी ॥१९२॥
आपण आमुक ऐसी सय ॥ हाचि मायेचा प्रत्यय ॥
हेही झाले जेथें लय ॥ आपेआप ॥१९३॥
तयाचें करावया वर्णन ॥ वेद झाला असे निर्माण ॥
नेती नेती शब्दें करून ॥ भांबावला ॥१९४॥

परोक्षं ब्रम्हा विज्ञानं शाब्दं देशिकपूर्वकम् ॥
बुद्धीपूर्वकृतं पापं कृत्स्नं दहति वन्हिवत् ॥६३॥
अपरोक्षात्मविज्ञानं शाब्दं देशिकपूर्वकम् ॥
संसारकारणाज्ञानतमसश्वंडभास्कर: ॥६४॥

ऐसें श्री सद्नुरुवाक्यासरसें ॥ जयाचें अंत:करण विलसे ॥
तया स्मरतांचि निरासे ॥ सकल पाप ॥१९५॥
पाप म्हणजे पतन ॥ स्वात्मरूपाचें विस्मरण ॥
कर्पूर अग्रीवत दहन ॥ दग्धझालें ॥१९६॥
तमरूपीं जो संसार ॥ तया लागीं हा चंडभास्कर ॥
ऐसा बोध प्रखर ॥ झाला जया ॥१९७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP