तत्वविवेक - श्लोक १५ ते १७

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


चिदानंदमयब्रम्हाप्रतिबिंबसमन्विता ॥
तमोरज: सत्वगुणा प्रकृतिर्द्विविधा च सा ॥१५॥
सत्वशुद्धाविशुद्धिभ्यां मायाऽविद्ये च ते मते ॥
मायाबिंबोवशीकृत्य तां स्यात् सर्वज्ञ ईश्वर: ॥१६॥

चिदानंद ब्रम्हा जें त्याची ॥ प्रतिबिंबता साम्यरूपाची ॥
तेचि मूळप्रकृति साची ॥ द्विविधा असे ॥८६॥
सत्वगुणें जी का शुद्ध ॥ तीच माया नामें प्रसिद्ध ॥
तमोगुणें जी का विद्ध ॥ तीतें अविद्या म्हणती ॥८७॥
इया मायेमध्यें जो बिंबत ॥ चिदात्मा प्रतिफलित ॥
माया स्ववशीकृत ॥ करुनी असे ॥८८॥
तयातें ईश्वर म्हणती ॥ जो सर्वज्ञ गुणाचा अधिपती ॥
माया चक्रचालकवर्ती ॥ एकलाचि असे ॥८९॥

अविद्यावशगस्त्वन्यस्तद्वैचित्र्यादनेकधा ॥
सा कारणशरीरं स्यात् प्राज्ञस्तत्राऽभिमानवान् ॥१७॥

अविद्येमाजीं जो बिंबत ॥ तया जीव ऐसें बोलत ॥
तयाचे नाना भेद होत ॥ उपाधी योगें ॥९०॥
देव तिर्यगादि जाती ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ होती ॥
सर्वही पारतंत्र्य असती ॥ अविद्यायोगें ॥९१॥
ऐसा हा चिदानंदात्मा ॥ प्रतिबिंबित जीवनामा ॥
हौनी भोगी देहग्रामा ॥ त्रय प्रकारें ॥९२॥
स्थूळ सूक्ष्म आणि कारण ॥ त्रय शरीरें भोगी जाण ॥
घेउनी तत् तत् अभिमान ॥ अविद्यावशें ॥९३॥
स्थूळ सूक्ष्म जेथून उत्पन्न ॥ तयास म्हणती कारण ॥
तोचि धरूनी अभिमान ॥ प्राज्ञपणाचा ॥९४॥
अविद्या होंचि रूप माझें ॥ ऐसें घेउनी माथीं ओझें ॥
तमोगुणें फुंजें ॥ तोचि प्राज्ञ ॥९५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP