तत्वविवेक - श्लोक १० ते ११

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


इत्थं सच्चित्परानंद आत्मा युक्त्या तथाविधम् ॥
परं ब्रम्हा तयोश्चैक्यं श्रुत्यंतेषूपदिश्यते ॥१०॥

येणें प्रकारें झालें सिद्ध ॥ आत्मा हा सच्चिदानंद ॥
परि हा युक्तिबोध ॥ श्रोत्या न मानवे ॥६७॥
श्रोते करिती प्रश्न ॥ तुम्ही केलें युक्तिसमाधान ॥
उपनिषद भागा न्यून ॥ आणूनियां ॥६८॥
वक्ता बोले वचन ॥ वेदीं जें कां प्रतिपादन ॥
तेंचि आम्हीं केलें जाण ॥ युक्तिबोधें ॥६९॥
उपनिषदांचे अंतीं ॥ हाचि उपदेश करी श्रुति ॥
कीं अखंडैकरस आत्मा निश्चिती ॥ तोचि परब्रम्हा ॥७०॥
त्वंपद ततपद ऐक्य ॥ बोलियेलें महावाक्य ॥
तेंचि आम्हीं सम्यक ॥ प्रतिपादिलें ॥७१॥
एवं तूंची आत्मा जाण ॥ परब्रम्हा परिपूर्ण ॥
ऐशी वेदें दावियली खूण ॥ उपनिषदीं ॥७२॥
परम प्रेमास्पद ॥ आत्मा असे नित्यानंद ॥
तेंचि झालें सिद्ध ॥ आमुचिये बोलीं ॥७३॥

अभाने न परं प्रेम भाने न विषयस्पृहा ॥
अतो भानेप्यभाताऽसौ परमानंदताऽऽत्मन: ॥११॥

शंका - निरतीशय प्रेम भानें ॥ किंवा असतें अभानें ॥
दोन्हीही प्रमाणें ॥ असिद्धचि ॥७४॥
अभानें तरि मुळींच नाहीं ॥ हें सिद्धचि असे पाहीं ॥
मानें म्हणूं तरी स्पृही ॥ अन्य विषया ॥७५॥
निरतीशय आनंद लाभे ॥ वृत्ती सुखेच्छा विषयीं क्षोभे ॥
हें विरुद्ध कैसें शोभे ॥ एके ठाईं ॥७६॥
समाधान - भान अभान दोन्हीं पक्षीं ॥ आत्मा परानंद साक्षी ॥
याच विषयीं लक्षी ॥ पुढलीये पदें ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP