मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १| अभंग २६ ते ३० भक्तवत्सलता १ भक्तवत्सलता २ अभंग १ अभंग २ अभंग ३ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते १०८ भक्तवत्सलता - अभंग २६ ते ३० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग २६ ते ३० Translation - भाषांतर २६.केशिराजा आदि सकळा अनादी । तूंचि कृपानिधि नारायणा ॥१॥अव्यक्ता अक्षरा सर्व अविनाशा । अगा पंढरीशा पांडुरंगा ॥२॥तूंचि ब्रह्मचारी गोपिकांचे घरीं । सर्वस्वें उद्धरी सर्व जीवां ॥३॥लटिकें दाविसी गोकुळाभीतरीं । नामा ह्मणे शिरीं भार वाही ॥४॥२७.अनंत हे कळा अनंत हे लीळ । अनंत जयाला वेद गाती ॥१॥तोचि पांडुरंग पंढरीचा राजा । धणी झाला वोजा भावबळें ॥२॥अनंत जयाच्या सेवा वोजावणी । नामरूप गुणीं नामातीत ॥३॥नामा ह्मणे अंत असेना जो कांहीं । सांपडतो पाहीं पंढरीये ॥४॥२८.देव दाखवी असा नाहीं गुरु । जेथें जाय तेथें दगड शेंदुरु ॥१॥देव दगडाचा बोलेल कैंचा । कोणे काळीं त्यास फुटेल वाचा ॥२॥देव देव करितां शिणलें माझें मन । जेथें जाय तेथें पूजा पाषाण ॥३॥नांमा तोचि देव ह्लदयीम पाहे । नामा केशवाचे न सोडी पाय ॥४॥२९.वाळवंटीं उभा करें कुरवाळिल । जीवींचें पुसेल जड-भारी ॥१॥हरुषें लोळणी घालूं महाद्वारीं । येईल समोरी केशिराज ॥२॥शोभतसे पायीं भक्त ब्रिदावळी । जीवासी सांभाळी दीनानाथ ॥३॥माझा अभिमान धरून मानसीं । नामा ह्मणे होसी भक्तां साह्य ॥४॥३०.करुणा बहुत तुझ्या चरणापाशीं । धांवोनि ह्लषिकेशी आलों सर्व ॥१॥वाळुवंटीं उभे पताकांचे भार । पाहोनि शंकर वेडावला ॥२॥सूर्य चंद्रादिक घालिती लोटांगण । करी प्रदक्षिणा स्वयें गंगा ॥३॥नामा ह्मणे ऐसें सांगतां बहुत । वेदशास्त्र ग्रंथ ठकावले ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP