मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १| अभंग ५६ ते ६० भक्तवत्सलता १ भक्तवत्सलता २ अभंग १ अभंग २ अभंग ३ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते १०८ भक्तवत्सलता - अभंग ५६ ते ६० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ५६ ते ६० Translation - भाषांतर ५६.पांडुरंगा नमूं परात्परा नमूं । सगुणासी नमूं साक्षिभूता ॥१॥समस्त संबंध साधियेले हरी । रावणादि वैरी उद्धरिले ॥२॥नामरूपातीता नाहीं भेटाभेट । म्हटलें आहे नीट नामा ह्मणे ॥३॥५७.सगुण समान भजती अंतरीं । सर्व भूतांतरीं असे एक ॥१॥पहा कोळियाची काय सांगों कीर्ति । विद्या अभ्यासिती मूर्तिं पुढें ॥२॥द्रौपदीचे घरीं होते उपवासी । देंठहि लावीसी अक-स्मात ॥३॥नामा ह्मणे जाण प्रारब्ध कारण । पांडुरंगाविण यतिं नाहीं ॥४॥५८.सहस्रनामाची घालितां लाखोली । तरला हा कोळी वाल्मिक तो ॥१॥पुराणप्रसिद्ध गोष्टी ह्या ऐकाव्या । प्रत्यक्ष देखा-व्या कोणे ठायीं ॥२॥अंगअनुभवा आपण आणाव्या । तरीच वाणाव्या संतांपुढें ॥३॥नाहीं तरी मज वाटे कांनकोडें । सुधा ह्मणे तोंड चवी नेणें ॥४॥नामा ह्मणे असे पोटामध्यें भूक । तृप्तीचें ते सुख बोलों कैसें ॥५॥५९.प्रर्हाद रक्षिलें पांडवां प्रतिपाळिलें । तया उभें केलें पुंडलिकें ॥१॥बिभिषणा स्थापिलें ध्रुवासी अढळ केलें । तया उभें केलें पुंडलीकें ॥२॥चौद्यादि मर्दिले सुरवर तारीले । तया उभें केलें पुंडलीकें ॥३॥अहिल्ये उद्धरिलें गजेंद्रा उद्धरिलें । तया उभें केलें पुंडलीकें ॥४॥गयासुरा वधिलें बळिस पाताळीं घातलें । तया उभें केलें पुंडलीकें ॥५॥नामा म्हणे केशवा भक्तांचें ठेवणें । घेऊनि केंवि जाणें घडे तुज ॥६॥६०.एक अंजनीं उत्पन्न । एका खांबीं अवतरण ॥१॥ते पावले दोघे जण । नरसिंह हनुमंत आपण ॥२॥एक सिंहनाद करी । एक भुभु:कार करी ॥३॥एक सीताशुद्धी करी । एक प्रर्हादा कैवारी ॥४॥एक बाळब्रह्मचारी । एक अर्धांगीं सुंदरी ॥५॥एक रुद्रचा अवतारु । दुसरा नामया दातारू ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP