TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

प्रासंगिक कविता - डफगाणें

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


चांफळामध्यें रामाचें देवालय बांधून उत्सव सुरू केला, तें वर्णन
भोंवतो डोंगराचा फेर । मध्यें देवाचें शिखर । पुढें मंडप सुंदर । नवखणांचा ॥१॥
चहुं खांबांची रचना । वरत्या चोवीस कमाना । कम कटाव नयना । समाधान ॥२॥
नाना तरु आंबे बनें । दोहींकडे वृंदावनेम । वृंदावनें जगज्जीवनें । वस्ती केली ॥३॥
पुढें उभा कपिवर । पूर्वेकडे लंबोदर । खालीं दाटले दरबार । ठायीं ठायीं ॥४॥
दमामे चौघडे वाजती । धडाके भांडयांचे होती । फौजा भक्तांच्या साजती । ठायीं ठायीं ॥५॥
माहीमरातबे निशाणें । मेघडंबेरें सूर्यपानें । पताका छत्र्या सुखासनें । दिंडया विंझणे कुंचे ॥६॥
काहळें कर्णे बुरुंग बांकें । नानाघ्वनीं गगन झाके । बहू वाद्यांचे धबके । परोपरी ॥७॥
टाळ मृदंग उपांग । ब्रह्मविणे चुटक्या चंग । तानमानें माजे रंग । हरिकथेसी ॥८॥
घंटा घंटा शंख भेरी । डफडीं पांये वाजंतरीं । भाट गर्जती नागरी । परोपरी ॥९॥
उदंड यात्रेकरू आले । रंगीं हरिदास मिळाले । श्रोते वक्ते कथा चाले । भगवंताची ॥१०॥
नाना पुष्पमाळा तुरे । पाहों जातां भडगे रंगपुरे । स्वर्गींचा उतरे । ठायीं ठायीं ॥११॥
गंध सुगंध केशरें । उदंड उधळिती धूसरें । जगदांतरें हरिहरें । वस्ती केली ॥१२॥
दिवटया हिलाल चंद्रज्योति । नळे अरडत ऊठती । बाण हवाया झरकती । गगनामध्यें ॥१३॥
उदंड मनुष्यांचे थाटे । दिसताती लखलखाटे । एकमेकांसी बोभाटें । बोलविती ॥१४॥
उदंड उजळिल्या दीपिका । नामघोष करताळिका । कित्येक म्हणती ऐका ऐका । ऐसे शब्द होती ॥१५॥
खिरापतीची वांटणी । तेथें जाहलीसे दाटणी । पैस नाहीं राजांगणीं । दाटी जाहली ॥१६॥
रंगमाळा निरांजनें । तेथें वस्ती केली मनें । दिवस उबावला सुमनें । कोमाइली ॥१७॥
रथ देवाचा ओढिला । यात्रेकरां निरोप झाला । पुढें जावयाचा गलबला । ठायीं ठायीं ॥१८॥
भक्तजन म्हणती देवा । आतां लोभ असूं द्यावा । धन्य सुकृताचा टेवा । भक्ति तुझी ॥१९॥
दास डोगरीं राहतो । यात्रा देवाची पाहतो । देव भक्तासवें जातो । व्यानरूपेम ॥२०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-01T05:58:50.8430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हाव

  • स्त्री. गप्प ; वदंता . [ अर हबा ] 
  • स्त्री. १ तीव्र इच्छा ; औत्सुक्य ; बळकट आशा . ( क्रि० भरणें ; लागणें ; धरणें ). २ हिंमत ; धमक ; धाडस ; दम . हजार रुपये खर्चीन अशी त्याची हांव आहे . ३ तेज ; प्रभा . - शर . ४ हव्यास ; लोभ . [ अर . हवा = आयुष्य , वारा ] 
  • पु. १ कामोद्दीपक चेष्टा ; नखरा ; नट्टापट्टा . २ ( अव . ) शृंगारचेष्टा ; प्रेमकला . ३ ( अव . ) हावभाव . [ सं . ] 
  • ०घालणें ( काव्य ) आशा धरणें . मार्जारें देखिला लोणियाचा गोळा । लावूनिया डोळा हाव घाली । हाव करणें - मिळविण्यासाठीं धडपडणें ; घाबरे होणें . हावेस , हावेनें , हावें भरणें - १ उत्सुकतेनें पत्करणें ( असामान्य , विक्षिप्त योजना ). २ मन घालून पाठपुरावा करणें ; चिकाटी धरणें . ३ फार महत्त्वाकांक्षी बनणें , होणें . ४ हट्टास पेटणें . तों त्यावरि उठे भरले दोघेहि संगरीं हांव । - मोकर्ण ४५ . ३४ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

विवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site