प्रासंगिक कविता - डफगाणें

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


किती पृथ्वीचें वजन । किती अंगोळ्या गगन । सांग सिंधूचें जीवन । किती टांक ॥१॥
किती आकाशींचा वारा । किती पर्जन्याच्या धारा । तृण भूमीवरी चतुरा । संख्या सांग ॥२॥
वायुसरसें उडती । सांग अणुरेणू किती । लक्षचौर्‍याशींची उत्पत्ती । संख्या सांग ॥३॥
अठराभार वनस्पती । भूमंडळीं पाणी किती । पुष्पें फळें जाती किती । संख्या सांग ॥४॥
बीज वडीं आणि पिंपळीं । किती आहे भूमंडळीं । सर्व धान्याची मोकळी । संख्या सांग ॥५॥
सर्व सरितांची वाळू किती । सिंधुसागरीं वाळू किती । हरखू आहे किती । संख्या सांग ॥६॥
सांग माझें डफगाणें । कीं डफ ठेवीं शहाणपणें । देहबुद्धीचें लक्षण । सोडवीन ॥७॥
ऐक जें जें पुशिलें तुज । तें तें आतां सांगें मज । अनंत ब्रह्मांडें बेरीज । किती जाहली ॥८॥
राम-दासाचा विनोद । सांडी अहंतेचें बीज । मग स्वरूपीं आनंद । सुखी राहे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP