श्रीदुर्गासप्तशती - त्रयोदशोऽध्याय:

श्रीदुर्गासप्तशती - त्रयोदशोऽध्याय:


त्रयोदशोऽध्याय:
ध्यानम्
ॐ बालार्कण्डलाभासां चतुर्बाहुं त्रिलोचनाम् ।
पाशाङ्‌कुशवराभीतीर्धारयन्तीं शिवां भजे ।
'ॐ' ऋषिरुवाच ॥१॥
एतत्ते कथितं भूप देवीमाहात्म्यमुत्तमम् ।
एवंप्रभावा सा देवी ययेदं धार्यते जगत् ॥२॥
विद्या तथैव क्रियते भगवद्विष्णुमायया ।
तया त्वमेष वैश्‍यश्‍च तथैवान्ये विवेकिन:॥३॥
मोह्यन्ते मोहिताश्‍चैव मोहमेष्यन्ति चापरे ।
तामुपैहि महाराज शरणं परमेश्‍वरीम् ॥४॥
आराधिता सैव नृणां भोगस्वर्गापवर्गदा ॥५॥
मार्कण्डेय उवाच ॥६॥
इति तस्य वच: श्रुत्वा सुरथ: स नराधिप: ॥७॥
प्रणिपत्य महाभागं तमृषिं शंसितव्रतम् ।
निर्विण्णोऽतिममत्वेन राज्यापहरणेन च ॥८॥
जगाम सद्यस्तपसे स च वैश्यो महामुने ।
संदर्शनार्थमम्बाया नदीपुलिनसंस्थित: ॥९॥
स च वैश्यस्तपस्तेपे देवीसूक्तं परं जपन् ।
तौ तस्मिन पुलिने देव्या: कृत्वा मूर्तिं महीमयीम् ॥१०॥
अर्हणां चक्रतुस्तस्या: पुष्पधूपाग्नितर्पणै: ।
निराहारो यताहारो तन्मनस्कौ समहितौ ॥१२॥
ददतुस्तौ बलिं चैव निजगात्रासृगुक्षितम् ।
एवं समाराधयतोस्त्रिभिर्वर्षैर्यतात्मनो: ॥१२॥
परितुष्टा जगद्धात्री प्रत्यक्षं प्राह चण्डिका ॥१३॥
देव्युवाच ॥१४॥
यत्प्रार्थ्यते त्वया भूप त्वया च कुलनन्दन
मत्तस्तत्प्राप्यतां सर्वं परितुष्टा ददामि तत् ॥१५॥
मार्कण्डेय उवाच ॥१६॥
ततो वव्रे नृपो राज्यमविभ्रंश्‍यन्यजन्मनि ।
अत्रैव च निजं राज्यं हतशत्रुबलं बलात् ॥१७॥
सोऽपि वैश्‍यस्ततो ज्ञानं वव्रे निर्विण्णमानस: ।
ममेत्यहमिति प्राज्ञ: सङ्‌गविच्युतिकारकम् ॥१८॥
देव्युवाच ॥१९॥
स्वल्पैरहोभिर्नृपते स्वं राज्यं प्राप्स्यते भवान् ॥२०॥
हत्वा रिपूनस्खलितं तव तत्र भविष्यति ॥२१॥
मृतश्‍च भूय: सम्प्राप्य जन्म देवाद्विवस्वत: ॥२२॥
सावर्णिको नाम मनुर्भवान् भुवि भविष्यति ॥२३॥
वैश्‍यवर्य त्वया यश्‍च वरोऽस्मत्तोऽभिवाञ्छित: ॥२४॥
तं प्रयच्छामि संसिद्ध्यै तव ज्ञानं भविष्यति ॥२५॥
मार्कण्डेय उवाच ॥२६॥
इति दत्त्वा तयोर्देवी यथाभिलषितं वरम् ॥२७॥
बभुवान्तर्हिता सद्यो भक्त्या ताभ्यामभिष्टुता ।
एवं देव्या वरं लब्द्ध्वा सुरथ: क्षत्रियर्षभ: ॥२८॥
सूर्याज्जन्म समासाद्य सावर्णि भविता मनु: ॥क्लीं ॐ॥॥२९॥
एवं देव्या वरं लब्धवा सुरथ: क्षत्रियर्षभ:
सूर्याज्जन्म समासाद्य सावर्णि भविता मनु: ॥क्लीं ॐ॥
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे
देवीमाहात्मये सुरथवैश्ययोर्वरप्रदानं नाम
त्रयोदशोऽध्याय: ॥१३॥
श्री भक्तवरदायिनी विजयते -
उवाच ६, अर्धश्लोका: ११, श्लोका: १२,
एवम्  २९,
एवमादित: ७०० ॥ समस्ता उवाचमन्त्रा: ५७,
अर्धश्लोका: ४२, श्लोका: ५३५,
अवदानानि ६६॥
-श्री दुर्गामाता विजयते -
- श्री गौरी प्रार्थना -
अरुणकमल संस्था तद्रज: पुन्जवर्षा
करकमल धृतेष्टा भीतियुग्माम्बुजाता ।
मणिमुकुट विचित्रालड्‌कृति: पद्‌ममाला
भवतु भुवनमाता सततं श्री: श्रियै न: ॥१॥


ध्यान:- उषेप्रमाणे कोमलकांति अरुणिमप्रभा, चार हात, तीन डोळे, हाती पाश, अंकुश वर अभयदायिनी असलेल्या शिवा मंगला देवीचे आम्ही ध्यान -पूजन करतो.
ऋषी म्हणाले, "हे राजा सुरथा ! या प्रमाणे देवीमाहात्म्याची अत्युत्तम कथा मी तुला सांगितली. त्याच देवीच्या शक्तिप्रभावाने या देवीने जगाला धारण केले आहे. (टिकवून ठेवलेले आहे.) ॥१॥२॥
ही देवी विद्यादायिनी सरस्वती आहे आणि भगवान् विष्णूची मायास्वरूप आहे. ही कथा ऎकून हे राजा, तू, हा वैश्‍य मित्र समाधी, तसेच अनेक आतुरलेले विचारवंत आज मोहित झाला आहात. पुढेही आवडीने स्तुतिपाठ कराल, ऎकाल. ॥३॥
आज आवडलेली ही देवी-शौर्य-गाथा निरंतर भक्तांच्या लक्षात राहील, तिची रुची वाढेल म्हणून हे पुण्यवंतांनो तुम्ही या अम्बिकेला शरण जा. तिचे ध्यान करा, जप, भजन, पूजन करा. ॥४॥
देवीची भक्ती व श्रद्धापूर्वक आराधना केल्यानंतर ती मानवांना, भक्तांना मोक्षदायिनी होते. देवीची भक्तीच भक्तांना मोक्ष-द्वार उघडून देते. ॥५॥
मार्कंडेय म्हणाले, "ऋषींचे हे वचन ऎकून तो राजा सुरथ उठला. ॥६॥७॥
आणि त्याने पुण्यवंत सुमेधा. ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. आजपर्यंत राजा राज्य गेल्याने व आपल्या कुटुंबियांच्या प्रेमाने खिन्न झाला होता. ॥८॥
तो आता घरचे सारे विसरून नदी-काठावरील वाळवंटात तपश्‍चर्येसाठी, देवीच्या तप व पूजनासाठी गेला. आपल्याबरोबर त्याने आपला मित्र व समदु:खी बंधू समाधी वाणी याला घेऊन तप व पूजनास सुरुवात केली. ॥९॥
समाधी वाण्यानेसुद्धा देवीसूक्ताच्या पठणाने तपश्‍चर्येला सुरुवात केली व वाळवंटी त्याने देवीची मातीची मूर्ती तयार करून भजन-पूजन-ध्यान-साधनेस आरंभ केला. ॥१०॥
आपला आहार नियमित करीत करीत शेवटी निराहार उपोषण केले व फुले, धूप, दीप, निरांजन, स्तोत्र, मंत्रादी उपचारांनी मनोपूर्वक देवी महामायेच्या चिंतनास आरंभ केला. ॥११॥
याप्रमाणे विरक्ती येऊन दोघांनी ही तपश्‍चर्या तीन वर्षांपर्यंत समाराधना केली व निराहार उपवासांनी आपले रक्त, ध्यान व कायेची कांती बली-स्वरूपाने देवीला अत्यंत भक्तिभावाने अर्पण केली. ॥१२॥
या दोघांच्या साधनेने देवी परमेश्वरी दुर्गा प्रत्यक्ष अवतीर्ण झाली. व राजा सुरथ आणि समाधी वाण्यास म्हणाली. ॥१३॥
देवी म्हणाली, "हे राजा, उत्तम कुलातील वत्सा व वाणीपुत्रा तुम्ही दोघांनी केलेली श्रद्धापूर्वक व निष्ठेने केलेली तपश्‍चर्या माझेपर्यंत पोहोचली. मी तुमच्यावर संतुष्ट असून तुम्हाला जे काय पाहिजे ते वररूपाने मागा." ॥१४।॥१५॥
मार्कंडेय म्हणाले, "सुरथ राजाने आपले राज्य जन्माजन्मांतरी नष्ट व्हावे व या जन्मी शत्रुसैन्याचा नाश होऊन आपल्या राज्यावर पुनर्स्थापना करविण्याची इच्छा व्यक्त केली.॥१६।१७॥
वाणी महाराज मात्र संसाराला, घरादाराला विरक्त झाले होते. त्यामुळे व बुद्धिमान असल्याने त्यांनी ममता, आसक्ती, मोह, माया यांचा लोप होऊन मिळणार्‍या संपूर्ण ज्ञानाची मागणी केली. ॥१८॥
देवी म्हणाली, "हे राजा, तू अत्यंत अल्प काळात आपल्या शत्रूंचा नाश करून आपले स्वत:चे राज्य मिळवशील. ॥२०॥
तुझे शत्रू पराभूत होऊन तेथून पळून जातील व राज्य तुला विजयपूर्वक मिळेल. ॥२१॥
अंतकालानंतर तू भगवान सूर्याचा अंश घेऊन सूर्यकूलात जन्मून या पृथ्वीवर सावर्णिक मनु या नावाने विख्यात होशील. ॥२२॥
असा हा सावर्णिक मनु या पृथ्वीवर युगपुरुष व पुण्यवान बनून प्रजेचे रक्षण करशील. ॥२३॥
हे वाणीपुत्रा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालेले असून, तुझ्या इच्छॆप्रमाणे मी तुला वर देत आहे. ॥२४॥
वैराग्य प्राप्तिनंतरचे मोह ममता रहित ज्ञान तुला लाभेल व हे वत्सा तुला स्वर्गद्वार मोकळे होईल. ॥२५॥
मार्कंडेय म्हणाले, "असे मंगलमय वर राजा सुरथ आणि समाधी वाणी यांना देऊन प्रत्यक्ष दर्शन व आशीर्वाद देऊन देवी अंतर्धान पावली. ॥२६।२७॥
याप्रमाणे भक्तांची इच्छा पूर्ण झाल्याने त्या दोघांचेही कल्याण झाले व राजा पुढील जन्मात सूर्यकुलात- ॥२८॥
जन्म घेऊन सावर्णिमनु या नावाने प्रसिद्धी पावला व सुरथ राजाची इच्छा देवीने पूर्ण केली. ॥२९॥
असा हा मार्कंडेयपुराणातील सावर्णिक मन्वंतरकाली घडलेल्या देवीमाहात्म्य-कथेचा सुरथ-वैश्‍यांना वरदान नावाचा कथाभाग आहे.
एकूण ७०० श्लोकांपैकी उवाच मंत्र ५७, अर्धश्लोका ४२ पूर्ण श्लोका ५३५ व अवदानानि ६६ असे श्लोक आहेत.
 -श्री दुर्गामाता विजयते -

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP