मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|वेणुसुधा| वेणुसुधा - प्रसंग ३ वेणुसुधा वेणुसुधा - प्रसंग १ वेणुसुधा - प्रसंग २ वेणुसुधा - प्रसंग ३ वामन पंडित - वेणुसुधा - प्रसंग ३ कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख. Tags : vaman panditvenusudhaवामन पंडितवेणुसुधा प्रसंग ३ Translation - भाषांतर N/Aनवविधा असि भक्ति घना घडे भ्रमकवाडहि जी स्तव ऊघडे भजति आणिक गौळणि बायका म्हणति अद्भुत हें तुह्मि आयका ॥१॥स्थळीं स्थळीं गौळणि या रितीच्या कथा करीती कमळापतीच्या कोणी यशोदेस समीप होत्या निरोपिती तीप्रतिही अहो त्या ॥२॥ यशोदे तुझा पुत्र वंशस्व रानीं सुधा ओष्ठिंची वर्षतो या स्वरानीं तंई भोंवते मोहती देवजाती जयांचीं मनें उन्मनत्वास जाती ॥३॥ कमल - संभव आणि शंकर त्रिदशनाथसवें सुर किंकर ह्नणति सर्वहि त्यास नमो हरी करुनि मोहित जो मन मोहरी ॥४॥ कीं ताळकीं मंद असें कळेना राग स्वराचें घर आकळेना रसाच मध्यें अवघे बुडाले विचार ज्यांच्या मतिचे उडाले ॥५॥ भरें रसाच्या अति नम्र माना मूर्ती अशा सर्वहि वर्त्तमाना सभोंवते येरिति देवजाती नादा मृता माजि बुडोनिजाती ॥६॥ टाकूनि लज्जा स्थिति लोकरीती वार्त्ता यशोदेप्रति त्या करीती निर्लज्जतेनें व्रजगोपदारा आणीकही वर्णिति त्या उदारा ॥७॥ पशु खुरीं बहु खिन्न वसुंधरा सुत तुझा अवलोकुनि ते धरा अधरिं वेणु धरी श्रम तो हरी वरुषतो रस तो तिस तो हरी ॥८॥ सुत तुझा क्षितिचें कुशल क्षणें करि पदें ध्वज - अकुंशल क्षणें चरण लावुनि वो जलजा तसे गजगती जगतीवरि जातसे ॥९॥ मुखीं वेणु ऐसा वनामाजि वागे गमे सौख्य देतो क्षितीच्या जिवा गे यशोदे असे लावितां तीस पाय स्मरें आमुचा थोर केला अपाय ॥१०॥ जो असे रिति वनांत हरी तो भूमीचा श्रम अशेष हरीतो वाजवी मुरलि दैत्यजनारी त्या रसेंचि भुलल्या व्रजनारी ॥११॥ अशामाजि वो चालिलों काननातें विलासें पहाया मृगांकाऽननातें यशोदे दुरुनीच तूझ्या कुमारें मनें मोहिली व्यापिली जै कुमारें ॥१२॥ तरु स्तब्ध नेणे जशा लोक रीती तशा गोपिका भाव तेव्हां करीती शिरीं मोकळे केश वस्त्रें गळालीं मनें मोहिली येरिती वेगळालीं ॥१३॥ दुरुनि हो व्रजनाथ निरीक्षणीं गलित होउनि जाय निरीक्षणीं मन मुरे पवनीं चळतां सरे शिथिल होउनि अंबर तीसरे ॥१४॥ ऐशाच आणीकहि गोपदारा लीला हरीच्या वदती उदारा कीं मोजितो नंद - कुमार गाई आश्चर्य तेव्हां करि वो अगाई ॥१५॥ देव ज्यास ह्नणताति नमो जी तो वनांत हरि गोधन मोजी कंधरीं तुळशि - हार करीतो घेउनी गणित कृष्ण करी तो ॥१६॥ प्रिय अनुचर गौळी धन्य खांदा तयांचा तदुपरि भुज वो या मुक्तिच्या दातयाचा धरुनि तुळसिमाळा दुसरा बाहु भारी व्रज पशु गण नेला कैठ भारी उभारी ॥१७॥ असा गोधनें मोजितो आणि गातो करीतो सुखी वेणु - नादें जगा तो अशाही विलासांत आश्चर्य दावी मृगी मोहिल्या गोष्टि तेही वदावी ॥१८॥ व्रजव धूसम हो हरिणी हरी करि मनें मुरली ध्वनि जो हरी वसति त्या धरुनी प्रभु - संगती पति सुतादि सुखांत न रंगती ॥१९॥ वाटे न ज्यांला मृग - कृष्ण - नाथ स्व - स्वामि हा मानिनि कृष्णनाथ या कृष्णजीच्या गृहणी - गणाया लेखा स्वसाम्यें हरिणी गणाया ॥२०॥ व्रज युवति गृहाऽशेपासुनी नित्य मुक्ता फिरति धरुनि चित्तीं जेविं या नित्य मुक्ता रुचि तशि न मृगीला या मृगाकाननाची तनु नयनिं पहाती श्रीमृगांकाननाची ॥२१॥ हरि समीपचि केवळ राहती परिसती मुरली मुख पाहती व्रजव धूसम पावलि या गती मग तसे अधरामृत मागती ॥२२॥ यशोदेपुढें आणिखी गोपदारा अशा वर्णिती कृष्ण लीला उदारा ह्नणे निर्मिले दिव्यजे दाम कुंदीं यशोदे बहू शोभती ते मुकुंदीं ॥२३॥ हार शोभति गळां व्रजपाळा भोंवतां पशुपगोव्रजपाळा वेणु गोड अधरीं स्वकरी तो कौतुकेंच यमुनेंत करीतो ॥२४॥ ह्नणति गौळणि वत्स तुझा हरी व्रजवधूजनचित्त अवो हरी मुरलि माजि विनोद कळा करी ह्नणतसे सुख देइन लौकरी ॥२५॥भिउं नका ह्नणतो तुह्मिं कामिनी दिवस जाउनि पातलि यामिनी करित जें अति इष्ट तुह्मां असे करि विनोदहि वेणु मधें असे ॥२६॥ असा उभा हो यमुनात टाकीं विनोद वाणी मुरलींत टाकी समीर तेव्हां मलयाद्रिवासी हळूहळू सेविति माधवासी ॥२७॥ उभें भोवतें वृंद वृंदारकांचें गळां हार वो कुंद मंदारकांचे असे वेष्टुनी पूजिती सर्व देव दिसे हा स्वयें त्यांत देवाऽधिदेव ॥२८॥ असा गोधनाच्या श्रमातें हरी तो कराया सुखी आमुतेंही हरी तो करी जों नमस्कार तों वृद्ध वाटे तयां देखतां दुःख आह्मांस वाटे ॥२९॥ गोविती जरठ नंदनंदना टोणपे पडति आड वंदना शीघ्र सोडिति तयासि वाटते गोष्टि हे विषसमान वाटते ॥३०॥ त्वरा यावयाची तुझ्या नंदनातें न मानीच हा इष्ट त्या वंदनातें यशोदे असें वर्म त्यांला कळेना मनोभाव वृद्धां तयां आकळेना ॥३१॥ वनीं सेविती वृद्ध पद्मासना दी व्रजीं चालतां वंदिती तो अनादी असा लागतां वेळ येतां उदारा व्रजीं अगुळ्या मोडिती गोपदारा ॥३२॥ अशा संकटें पावतां गोकुळातें सुखें दे समूहा वियोगा कुळातें तयावीण जो रोग नेत्रीं हरी तो स्वसंदर्शनाच्या सुधेनें हरीतो ॥३३॥ खुरांचा धुळोरा मुखीं आणि हारीं व्रजीं येतसे कृष्ण ऐशा विहारी दिनांतीं असा धेनु वृंदांत वाटे शशी देवकी गर्भ संभून वाटे ॥३४॥ मदवि धूर्णित वो नयनांऽचळ व्रज वधू वरिते करि चंचळ शशिचकोरकुळीं सुख देतसे विविध मान वधू प्रति दे तसे ॥३५॥ कुंडलें जडित दीप्ति फांकली दाविती दिनमणीस वांकुली धूळि धूषित हि गडमंडळीं स्वप्रभा मिरवली सुकुंडलीं ॥३६॥ यदुपति दिवसांती येरिती पातलागे गजपति गति येतां गोड चित्तांत लागे मुदित वदन साजे ये जसा चंद्रमागे सुखकरपण ज्याला व्योमिचा चंद्र मागे ॥३७॥ स्व गोधनें लक्षित ये हरी तो दुःखें दिगंतींहुनिही हरीतो गाई सुखी येरितिनें करीतो देणार आह्मां सुख लौकरीतो ॥३८॥ प्रतिदिनीं दिवसा व्रजनायका स्मरति येरितिनें व्रजनायका रमति त्याचसवे प्रतियामिनीं हरिविणा क्षण नेणती कामिनी ॥३९॥ निशा कृष्ण ध्यानीं प्रियविषयनिष्ठा दिवस तो निजे रात्रीं जागा जडजन दिनीं त्यान वसतो हरीचे जे दास क्रमिति हरि गाऊनि दिस ते तिये रात्रीं ध्यानी तरि असिच गोपींत दिसते ॥४०॥ व्रजांत जो जागृत लोक सारा जों या कथा वर्णिति लोक सारा कृष्णांग संगार्थ निघोनि जाया या सिद्ध तों ते डुलती निजाया ॥४१॥ अहा भाग्यवंता महा गोपदारा अशा गातिया कृष्णलीला उदारा असा बोलिला श्रीशुक्राचार्य राया कथा या त्रिलोकांस ही उद्धराया ॥४२॥ वामनानन मिषें वसुधेंतें धन्य कृष्ण करि वेणु - सुधतें वर्णनीय गुण वर्णुनि लोकीं तो कृतार्थ रस जो अवलोकीं ॥४३॥ करी धन्य गोपाळजी वामनातें कथा - छंद लाऊनि त्याच्या मनातें महा भाग्य हें अन्यथा काव्य रीती वृथा ज्या कवी लोकवार्त्ता करीती ॥४४॥ हरिगुणामृत जीत पदोपदी अशिहि वेणुसुधा हरिच्या पदीं रचुनि वंदुनि अर्पुनि वामनें धरियला हरि नित्य नवा मने ॥४५॥ N/A References : N/A Last Updated : July 04, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP