नाम सुधा - अध्याय २ - चरण ४

’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.


जेथेंचि श्रीपति अजामिळ तेथ नेला

ऐसे मुनींद्र नृपतिप्रति बोलियेला

भावार्थ कीं न वचनी जन त्या विभागीं

तो पावला गतिअजामिळ नामयोगी ॥१॥

श्री भूदुर्गा भाग हे तीन जेथें श्रीवैकुंठी पावती धन्य तेथें

ज्ञानी भक्त श्रीविभागास जाती तैशा स्थानालागि गेला द्विजाती ॥२॥

जय विजय गळाले ते न त्या श्रीविभागीं

गन - भव - तम - शेषे दैत्यशाषप्रसंगीं

गज जलचर पूर्वी दोघ अन्योन्य - शायें

गति परमहि जे कां ते न भक्तिप्रतापें ॥३॥

लव जरी असती हरिभक्तिते उभय बंधु धनार्थ न शापिसे

म्हणुनि त्याच मतें सनकादिकां कुवचनें बदले हरिसेवकां ॥४॥

कृष्णापर्णे करुनियां तप यज्ञ तीर्थे

पुण्यें अगण्य बहु जोडियलीं समर्थे

नेलें म्हणूनि हरिनें स्वपदासि दीना श्रीभाग लभ्य न तथापिहि भक्तिहीना ॥५॥

श्रीभद्भागवतीं गजेंद्र हरिनें जो सोडवीला स्वयें

इंद्रद्युग्न नृपाळ जो गतभवीं तो वेगळा निश्र्वयें

हें तों पद्मपुराणिंचे निज सखे भाऊ धनाकारणें

देती शाप परस्परें द्विजपणीं होनक्र तो वारणें ॥६॥

गजपति धरिला तो गंडकीमाजि नक्रें

स्तुति करि गज तेव्हां मारिला नक्र चक्रें

जय विजय असे ते दोघ वैकुंठवासी

असुरपण पुराणीं विप्रशापें तयांसी ॥७॥

द्विजवर हरिनामें शुद्ध अत्यंत झाला

परिहरुनि अविद्या आत्मतत्वीं निवाला

म्हणउनि हरिनें तो श्रीविभागास नेला

पुनरपि परतेना जो असा तेथ गेला ॥८॥

या कारणें श्रीशुक बोलियेला कींजे स्थळीं श्रीपति तेथ नेला

दुर्गापती भूपति जेथ तेथें गेला न भावार्थ असाच एथें ॥९॥

कोण्ही कैवल्य मोक्षाविण न गणितिते बोलती गोण मुक्ती

जे कां अव्यक्तमात्रीं सतत रत जया नावडे विष्णुभक्ती

क्लेशें कैवल्य त्यांला पुनरपि सगुणीं लाविलें अंतरंगा

होती सिंधूंत बिंदू हरिजन मिळती सागरीं जेविं गंगा ॥१०॥

घनाच्या मुखें सिंधुचा बिंदु जैसा मिळे सागरीं निर्गुणीं मोक्ष तैसा

सदा भेटते ऐक्य पावोनि गंगा समुद्रीं असी भक्ति हे अंतरंगा ॥११॥

फिकीमुक्ति भक्ती पुढें ज्ञानियाला स्वयें मुक्ति देती पहाती तयाला

मुमुक्षूसही कामना मोक्षकामीं न भक्तास जे देखती मुक्ति नामीं ॥१२॥

पडे देह तों त्याचि देहीं मुकुंदा पहाती जगीं टाकुनी लोकनिंदा

सरे कर्म त्याचें पडे देह जेव्हां हरी ने स्ववैकुंठ लोकासि तेव्हां ॥१३॥

मुमुक्षू जरी सेविती अंबुजाक्षा तरी मागती नित्य कैवल्यमोक्षा

स्वभक्तां जरी मुक्तिचारी उपेक्षा हरी मुक्ति भक्तीतरी दे स्वपक्षा ॥१४॥

स्वभक्तांसही देउनी दिव्य मुक्ती हरी देतसे मुक्तिही माजि भक्ती

जसें नित्यमुक्तां न देहत्व देहीं असे देहसारुप्य मोक्षादिकांहीं ॥१५॥

अमृत केवळ सेउनि राहती परिसुधामधुरत्व न पाहती

अमृत होउनिही रसनामिसें अमृत सेविति भाग्य पहा क्सें ॥१६॥

जनन मरण मेलें दुःख अज्ञान गेलें

हरि - मय वपु केलें विष्णुलोकासि नेलें

न जळति लव लोळें शेष - वक्राग्नि - जाळें

घडतिल विधिगोळे ते न होतील काळें ॥१७॥

विकुंठासुतें निर्मिलें पूर्ण - कामें हरीनेंचि वैकुंठ वैकुंठनामें

लयी तें नुरे मोक्ष हो नित्य कैसें बरें नेणतां बोलती एक ऐसें ॥१८॥

विकुंठेच्या पोटीं हरि मनुजरुपें अवतरे

तसी लोकाकारें तनु करुनि वैकुंठ पसरे

यथा - काळें जैसे अजित - अवतार प्रगटती

तसीं लोकाकारें सकळ हरिरुपें उमटती ॥१९॥

करी योगनिद्रा हरी शेषशायी लयीं नीजती मुक्त त्याचेच ठायीं

करी सृष्टि होऊनि जागा मुरारी तयीं ऊठती मुक्त ही याप्रकारीं ॥२०॥

जयीं निर्मिली सृष्टि होती न कांहीं विकुंठेस हो तेधवां ठाव नांहीं

तयीं दाविला लोक जो ब्रम्हयाला विकुंठात्मजें निर्मिलें केविं त्याला ॥२१॥

विकुंठेचिया जेविं पोटासि आला तसा लोकही तोचि वैकुंठ झाला

विकुंठेचिया तोचि गर्भात पूर्वी कसा जन्मला जो सदा सर्व उर्वी ॥२२॥

निजेही लयीं सृष्टि सर्वात जागे जगीं रामकृष्णादि होऊनि वागे

तरी तें अनादित्व तैसें न भागें न वैकुंठलोकासि सादित्व लागे ॥२३॥

वैकुंठावरि काळचक्र फिरतें कोणी असें बोलती

त्यांचे सर्वहि बोल फोल बरवें हें तत्व ते नेणती

नाहीं पङ्गुणईश्वरत्वहि जरी तो योगनिद्रा करी

काळाचें तरि चक्र हें फिरतसे माना तयाही वरी ॥२४॥

काळी ईशाहि सांपडे तरि - गती दे कोण बोला अरे

काळग्रस्त न काळपाश चुकवी ऐसें पहाना बरें

तो जेव्हां निजतो लयीं जन निजे वैकुंठिंचा तेधवां

त्या योगांतुनि सर्व युक्त उठती तो ऊठतो जेधवां ॥२५॥

द्रष्ट्रा सर्व गिळूनि जोंवरि असे वैकुंठही नोंवरी

योगीं निद्रित तो तई निजति हें कांहीं न त्या ऊपरे

द्रष्ट्यावांचुनि रज्जु सर्प न दिसे द्रष्टाचि होतां दिसे

माया - मात्रचि कंठरुप हरिचें तेथें अविद्या नसे ॥२६॥

नव्हे सर्प हा हार मायाच देहीं असी शुद्ध माया रमाकांत देहीं

असें शुद्ध मायाच वैकुंठधामीं तथा पावला विप्र तो धन्य नामीं ॥२७॥

वैकुंठासि अशा अजामिळ असा नामप्रतापें करी

गेला भागवतीगतीस न करी कैवल्य जीची सरी

नामाचा महिमा अतर्क्य निगमा तो एथ कांहीं मुनी

श्रीद्वैपायनपुत्र बोलत असे श्लोकद्वयें नेमुनी ॥२८॥

ज्याणें धर्म समस्तही बुडविले जो निंद्य दासीपती

जो नष्टव्रत ज्यास नेत असतां भोगावया दुर्गती

ऐशाही समयीं अजामिळ असा तत्काळ तो सूटला

नामें श्रीहरिच्या अनादि रचला तो बंधही तूटला ॥२९॥

नाहीं त्याहुनि कर्म - बंधन दृढ च्छेदावया आणिखी

मोक्षापेक्षक त्यास कीर्तन सदां तैसें हरीचें मुखीं

नामेंजें मन शुद्ध तें रजतमा टाकी तयावेगळें

तें कर्मी न मिळे पुन्हा हरिगुणीं सप्रे म जें आगळें ॥३०॥

शुक म्हणे भरतान्वयनंदना हरिल पातक कर्महि बंधना

अजितकीर्तन ऐकचि सर्वथा इतर जें तप तीर्थ कथा नृथा ॥३१॥

प्रायश्र्वित्त न अन्य नाम - सम हें श्रोत्यां जरीं बिंबलें

गंगा काय करील ये रिति मनीं गंगा बहू तुबलें

एथें तीर्थपदानु - कीर्तन अशा एका पदें श्रीशुकें

श्लोकीं सूचितसें सभे मुनिजना रायासही कौतुकें ॥३२॥

गंगारव्य तीर्थ चरणीं उपजे जयाचे

तो विष्णु तीर्थ - पद बोलति विप्र वाचे

तीर्थाघ्रि तो म्हणुनियां म्हणतांचि पायीं

गंगा दिसे अजित - नाम समस्त - देहीं ॥३३॥

नामें स्फुरे तनु समग्र मनांत जेव्हां

मंदाकिनी पदनरवांत दिसेल तेव्हां

व्यापूनि नाम असणार समस्त अंगा

त्याची कसी सरि करी चरणांबु - गंगा ॥३४॥

शदांगुष्ठींच गंगा त्रिभुवनपतिचें नाम हें अंग - अंगा

जे कां व्यापी विहंगासन - नख - शिख ते दाखवी अंतरंगा

गंगा ही पापभंगा परिहरुं नशके वासनेच्या कुसंगा

हस्तीही तत्तरंगा धुति विषयदिवा इष्टचित्ता - पतंगा ॥३५॥

गंगेंतही गज जसा धुतला तथापी

घाली शिरीं धुळि तसें जन चित्त पापीं

स्त्रानेंकरुनि जरि पावन देह झाला

पापीं प्रवृत्ति घडणार पुन्हा तयाला ॥३६॥

म्हणाल गंगा हरि पूर्व पापें शुद्धी अशा नामसुधाप्रतापें

दोहीं सही मागुति पापवृद्धी होणार नामीं तरि काय सिद्धी ॥३७॥

पूर्वीच हा निर्णय एथ झाला नामीं द्विधा शुद्धि असे जनाला

उच्चारमात्रेंचि हरुनि पापा दावीतसे त्याउपरि प्रतापा ॥३८॥

आजन्म गंगा स्त्रपनेंचि केलीं दुष्टें द्रियेंतीं विषयीं भुकेलीं

गंगा तटीं ही हरि कीर्तनानें संव्हारिला संग अजामिळानें ॥३९॥

करुनि तीर्थ जप व्रत मागती श्रवण कीर्तन केवळ सद्गती

म्हणुनियां हरिनामसुधा जसी न गति जान्हवि देउं शके तसी ॥४०॥

हरि जसें जळ अन्न तृषा क्षुधा हरि तसी जन - भूक - तृषा सुधा

परि सुधा अजरामरता करी न इतरें हरिनाम अशापरी ॥४१॥

जगीं नाना कामीं धरुनि रति नामींच तरले

विरक्तीच्या धामीं धरुनि रति नामींच उरले

सदा तीर्थग्रामीं तरि विषयभूमीं उतरले

मुखेंही स्वर्गामी विषय - विष - धामींच भरले ॥४२॥

याकारणें तीर्थपदानुकीर्तनें दुर्वासनेपासुनियां निवर्तनें

चित्तें असंगें हरिनामनर्तनें होतां नं होती विषयें प्रवर्तनें ॥४३॥

जरि म्हणाल अशा हरिकीर्तनीं विषयसंग न कां उपजेमनीं

तरि शुकोदित उत्तर अर्ध हा विशद अर्थ करुनि बरा पहा ॥४४॥

हरिगुणीं उपजे रति जेधवां रजतमीं न मिळे मन तेधवां

सतत गुंफिल जो गुणरत्न तो नकरि काचमणीप्रति यत्न तो ॥४५॥

अमृतसिंधुतरंग उठे मुखीं नमन आठवि आंविल ते मुखीं

हरिगुणीं मन घे जरि आवडी मग न दे विषयांत कधीं बुडी ॥४६॥

विषय राजस तामस इंद्रियें विमळसत्वचि मानस निश्र्वयें

अमळसत्वहि तुच्छ - सुख - स्पृहा रजतमाकरितां धरितें पहा ॥४७॥

असुखमिश्रित सर्वहिहीं सुखें सुखचि तें हरि कीर्तन जें मुखें

जरि मनासि असें सुख आढळे रजतमीं न कधीं मग तें मिळे ॥४८॥

विषय कर्म असंग न घे मनीं निरत जो हरिकीर्तननर्तनीं

म्हणुनि तीर्थ तपोव्रत त्याहुनी अधिक हें हरिनाम म्हणे मुनी ॥४९॥

हरियले जन संशय हो शुकें कथियलें हरि - कीर्तन कौतुकें

प्रकरण - श्रवण - स्मृति - वर्णनीं कथिल पद्य - युगें फळ - एथुनी ॥५०॥

जो हें असें नरकहारक गुह्य कर्णी

ऐकेल जो सदितिहास विलास वर्णी

तोही न जाय नरका न तयास डोळां

पाहों कदापिहि शके यम - दूत - मेळा ॥५१॥

पृ० छंद - न जाय नरकाप्रती नवल काय हें भूपती

अमंगळहि पूज्य तो मनुज विष्णुलोकीं अंती

असा सदितिहास हा श्रवण - वर्णनें सद्गती

करी जरि अनुष्ठवे फळ न बोलवे तें किती ॥५२॥

फळ इतरपुराणीं तीर्थ - यज्ञ - व्रतांचें

वदति रुचिनिमित्तें तेथ तें लभ्य कैंचें

नवदति फळ तैसें बोलणें तथ्य जेथें

कटुक रुचिनिमित्तें बोलती तीन एथें ॥५३॥

धैर्यः प्रोइझत कैतवोऽत्र म्हणुनी श्रीव्यास ऐसेपरी

षष्ठस्कंधमुखींच श्लोक दुसरा तेथें प्रतिज्ञा करी

ज्या धर्मी कपटार्थ लेशहि नसे तो ये स्थळीं बोलणें

हा वाक्यार्थ म्हणूनि एथ अवघें नाणें खरें तोलणें ॥५४॥

जो लाभ या श्रवणवर्णानिं बोलियेला

कीं तो अमंगळ तरी हरिलोक त्याला

श्रद्धे - करुनि हरिभक्ति करुनि जेव्हां

ऐकेल वर्णिल फळप्रद होय तेव्हां ॥५५॥

श्रोता श्रद्धायुक्त ऐकेल जेव्हां तो वैकुंठालागिं जाईल तेव्हां

जो भक्तीनें यासि वर्णील वक्ता श्लोकीं सांगे लोक हा त्याचि - भक्तां ॥५६॥

श्रद्धा आस्तिक - नाम - बुद्धि महिमा जो वर्णिती तो खरा

ऐसा निश्वय बाणतां स्वचरणें वैकुंठ येतें घरा

ऐसा ही इतिहास हा परिसती त्यांला नुपेक्षी हरी

त्यांचीं आचरणें अमंगळ जरी नासूनि तीं उद्धरी ॥५७॥

म्हणुनि शेवट पद्महि येरिती वदतसे शुक भूमिपतीप्रती

प्रकरण श्रवणीं हरि कीर्तनीं तरति विस्मय हा न गमे मनीं ॥५८॥

मरों टेंकला विप्र पुत्रोपचारें हरीचें वदे नाम लोकप्रचारें

असा पातकी विष्णुलोकासि गेला म्हणे भक्तिभावें उणें काय त्याला ॥५९॥

प्रकरणश्रवण स्मृतिवर्णनें धरुनि भाव मनीं हरिकीर्तनें

नवल काय जगीं जरि तो तरे श्रवणमात्र करुनिहि उद्धरे ॥६०॥

प्रकरणश्रवणेंचि तरे जई नवल काय अनुष्ठिल तीं तई

म्हणुनि भाव असा शुक बोलिला तदनु नामसुधेंत निरुपिला ॥६१॥

षष्ठस्कंधमुखीं अजामिळकथा अध्या हा दूसरा

श्रीमद्भागवतांत नाममहिमा - निर्धार जेथें खरा

टीका नामसुधा म्हणूनि रचिली हे वामनाच्या मुखें

श्रीकृष्णें सुरस प्रसन्नवदनीं कानीं मनीं दे सुखें ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP