एकनाथी भागवत - श्लोक २३ व २४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


द्वारकां हरिणा त्यक्ता, समुद्रोऽप्लावयत्क्षणात् ।

वर्जयित्वा महाराज, श्रीमद्भगवदालयम् ॥२३॥

नित्यं सन्निहितस्तत्र भगवान् मधुसूदनः ।

स्मृत्याऽशेषाशुभहरं, सर्वमङगलमङगलम् ॥२४॥

द्वारका सांडूनि गेला श्रीकृष्ण । तेथें समुद्र येऊनि आपण ।

बुडविली न लागतां क्षण । पळाले जन हाहाभूत ॥८९॥

द्वारका बुडविली संपूर्ण । राखिलें भगवंताचें स्थान ।

जो आला पाताळींहून । कुशनिर्दळण करावया ॥२९०॥

तें भगवंताचें स्थान । समुद्र न करीचि निमग्न ।

तेथें हरीचें सन्निधान । नित्य जाण स्फुरद्रूप ॥९१॥

ज्याचें करितांचि स्मरण । महापातकां निर्दळण ।

सकळ मंगळाचें आयतन । तें हरीचें स्थान उरलें असे ॥९२॥

ते द्वारकेमाजीं नित्यपूजा । अद्यापि होतसे गरुडध्वजा ।

ऐक परीक्षिती महाराजा । तें अधोक्षजाचें स्थान ॥९३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP