एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तत्र स्म त्वरिता जग्मुः कृष्णविश्लेषविह्वलाः ।

व्यसवाः शेरते यत्र, ज्ञातयोऽघ्नन्त आननम् ॥१७॥

स्त्रिया पुरुष सुहृज्जन । मिळोनि स्वगोत्रस्वजन ।

शीघ्र प्रभासा गमन । करीत रुदन निघाले ॥२२०॥

हाकाबोबांचे बंबाळ । स्त्रिया करिती कोल्हाळ ।

कृष्णवियोगें सकळ । दुःखविव्हळ निघालीं ॥२१॥

रणीं पडिले यादव । प्राणरहित निर्जीव ।

तेथ पावलीं ते सर्व । बोंबारव खंती करिती ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP