एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तस्माद्देहमिमं लब्ध्वा ज्ञानविज्ञानसम्भवम् ॥३३॥

गुणसङगं विनिर्धूय मां भजन्तु विचक्षणाः ।

ज्या नरदेहाकारणें । अमर उत्कंठित मनें ।

त्या देहाचे जाहलेपणें । ज्ञान पावणें निष्टंक ॥१७॥

नरदेह पावल्या जाण । आपणचि नव्हे ब्रह्मज्ञान ।

तेथें करावें माझें भजन । देहाभिमान सांडूनी ॥१८॥

करितां माझें अनन्य भजन । सहजें वाढे सत्त्वगुण ।

सत्वगुणास्तव जाण । उपजे ज्ञान सविवेक ॥१९॥

विवेकज्ञानाचिये वृत्ती । रज तम दोनी झडती ।

शोधितसत्वाचिये स्थिती । अभेद भक्ती उल्हासे ॥४२०॥

करितां माझें अभेद भजन । होय स्वानंदाचें स्वादन ।

त्या नांव बोलिजे विज्ञान । तेथ तिनी गुण मिथ्यात्वें ॥२१॥

नरदेह जोडलिया हातीं । प्राण्यासी एवढी प्राप्ती ।

यालागीं मनुष्यदेहीं भक्ती । अवश्य समस्तीं करावी ॥२२॥

हें भागवतींचें अतिगुह्य ज्ञान । मुख्यत्वेंसी भक्तिप्राधान्य ।

भावें करितां माझें भजन । स्त्रिया शूद्रजन उद्धरती ॥२३॥

नरदेह जोडल्या जाण । माझी भक्ति करिती विचक्षण ।

भजनें जिणोनि गुणागुण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥२४॥

पूर्ण ब्रह्माचिया प्राप्ती । निरपेक्ष माझी भक्ती ।

तोचि भजनभाव श्रीपती । पुनः पुनः श्लोकार्थीं दृढ दावी ॥२५॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP