मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


बुधो बालकवत् क्रीडेत् कुशलो जडवच्यरेत् ।

वदेदुन्मत्तवद्विद्वान् गोचर्यां नैगमश्चरेत् ॥२९॥

विवेकज्ञान शुद्ध आहे । परी बाळकाच्या परी पाहे ।

मानापमान सुखें साहे । सांडोनि सोये देहाभिमानाची ॥९८॥

निजनैष्कर्में अतिकुशल । परी कर्मजडाऐसा केवळ ।

कर्में आचरे तो सकळ । कोठेंही विकळ दिसों नेदी ॥९९॥

जाणे धर्माधर्मलक्षण । सर्वार्थीं अतिसज्ञान ।

परी न करी प्रश्नसमाधान । अप्रमाणिक जाण स्वयें बोले ॥२००॥

करितां प्रश्नसमाधान । लौकिकीं वाढेल सन्मान ।

यालागीं साक्षेपें जाण । उन्मत्त वचन स्वयें बोले ॥१॥

वेदतत्त्वार्थ विहित जाणे । तें लौकिकीं नाहीं मिरवणें ।

सकळिकीं मूर्खाचि म्हणणें । तैशीं `पशु' लक्षणें स्वयें दावी ॥२॥

यालागीं वेदवादसंवाद । न करी वाद अतिवाद ।

येचि अर्थीं अतिविशद । स्वयें गोविंद सांगत ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP