एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


विष्णौ त्र्यधीश्वरे चित्तं धारयेत्कालविग्रहे ।

स ईशित्वमवाप्नोति क्षेत्रक्षेत्रज्ञचोदनाम् ॥१५॥

मायादित्रिगुणनियंता । जो कळिकाळातें आकळिता ।

उत्पत्तिस्थितिप्रळयकर्ता । जाण तत्त्वतां अंतर्यामी ॥८७॥

त्या मज विष्णूचें ध्यान । निरंतर जो करी जाण ।

त्यासी अदृष्टद्रष्टेपण । शक्तिप्रेरण ईशित्वें ये ॥८८॥

मिथ्या बुद्धिबळाच्या खेळाप्रती । स्वारीची जाणे गती निगुती ।

तेवीं मिथ्या संसारप्रतीती । भूतांची आगती निर्गती स्वयें जाणे ॥८९॥

तो जीवादि शरीरप्रेरण । स्वयें करूं शके आपण ।

करितां अंतर्याम्याचे ध्यान । एवढी सिद्धी जाण उपतिष्ठे ॥९०॥

तो आपुलेनि प्रतापस्वभावीं । मशकाहातीं मेरू विभांडवी ।

नीचहस्तें सृष्टि विध्वंसूनि मांडवी । कां इंद्रातें मारवी उंदिराहातीं ॥९१॥

यापरी एकातें मारवी । जीवें गेलिया जीववी ।

अचेतनातें पालेजवी । ये सिद्धीची पदवी ईशित्व ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP