एकनाथी भागवत - श्लोक १० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


भूतसूक्ष्मात्मनि मयि तन्मात्रं धारयेन्मनः ।

अणिमानमवाप्नोति तन्मात्रोपासको मम ॥१०॥

अष्ट महासिद्धी स्वाभाविका । माझ्या ठायीं असती देखा ।

या असाध्य साधावया आवांका । करित्या साधका साधन सांगे ॥६७॥

मी अणुरेणूचाही अणुरेण । जीवाचाही हृदयस्थ जाण ।

तेथ अणुतन्मात्र करूनि मन । माझ्या ठायीं जाण जो राखे ॥६८॥

अणुतन्मात्र ध्यान सदा राहे । त्याचा अणुमात्रचि देह होये ।

कीटकीभृंगीच्या ऐसें पाहें । अणिमेची लाहे तो सिद्धी ॥६९॥

तो अच्छिद्रीं निघोनि जाये । जगाच्या डोळ्यामाजीं समाये ।

कोठेंही खपेना पाहें । हे अणिमेची लाहे महासिद्धी ॥७०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP