मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|वारांचा आरती संग्रह| जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा... वारांचा आरती संग्रह कर्हेच्या पाठारीं नांदे ... आधार चक्र नृत्य मांडिलें ... चिंतामणी परिपूर्ण देवाधि ... एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही... निर्गुण गुणवंत तूं विघ्नह... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा... पुजेच्या प्रांतीं अभ्यंग ... आरती शुक्रवारची - जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती. The poem composed in praise of God is Aarti. Tags : aratifridaymorya gosaviआरतीमोरया गोसावीशुक्रवार आरती शुक्रवारची Translation - भाषांतर जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥ अनुभव पंचारती ओवाळूं धीशा ॥जयदेव०॥धृ०॥ सज्जन मुनिजन योगी ध्याती निजचित्तीं ॥ चिंतातित होऊनी अनुभव भोगिती ॥ स्वानंद अनुलक्ष लक्षती सद्वृत्ती ॥ व्यक्ताव्यक्तरुपीं जय ब्रह्ममूर्तिं ॥जयदेव० ॥१॥ सृष्टी माजि लोक बोलती गौरीज ॥ पाहतां केवळ ब्रह्म अवतरलें सहज ॥ ह्मणऊनि सहचराचरी साधिती निज काज ॥ ऐसा परात्पर हा विघ्नराज ॥जयदेव० ॥२॥ सकळा देवामाजि तूं वक्रतुंड ॥ दोष छेदन कानीं होसी प्रचंड ॥ ध्यानीं अवलोकितां पूर्ण ब्रह्मांड ॥ शास्त्रादिक शोधितां निगमागम कांड ॥जयदेव० ॥३॥ सुखदासन मनमोहन फणि भूषण धारि ॥ हरनंदन सुरवंदन अघकंदनकारी ॥ मयुर वाहन पावन नयन त्रिधारी ॥ सादर वरद भक्तां होय विघ्नहारी ॥जयदेव० ॥४॥ गुरुवर कृपें योग दिसे अभेद ॥ पाहातां सर्वांठायीं हा मूळकंद ॥ पठण करितां योगीं निज चतुर्वेद ॥ विनवी चिंतामणी निजभावें वरद ॥जयदेव० ॥५॥ N/A References : N/A Last Updated : July 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP