मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|वारांचा आरती संग्रह| चिंतामणी परिपूर्ण देवाधि ... वारांचा आरती संग्रह कर्हेच्या पाठारीं नांदे ... आधार चक्र नृत्य मांडिलें ... चिंतामणी परिपूर्ण देवाधि ... एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही... निर्गुण गुणवंत तूं विघ्नह... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा... पुजेच्या प्रांतीं अभ्यंग ... आरती मंगळवारची - चिंतामणी परिपूर्ण देवाधि ... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती. The poem composed in praise of God is Aarti. Tags : aratimangalwarmorya gosaviआरतीमंगळवारमोरया गोसावी आरती मंगळवारची Translation - भाषांतर चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ॥ ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व ॥ प्रपंच सुख दुःख तुझें वैभव ॥ अखिल जन नेणति हा गुह्य भाव ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥ पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांति ॥जयदेव ॥धृ०॥ निगमादिक वर्णिंतां नकळेचि पारु ॥ भक्त जन कृपाळु हा मोरेश्वरु ॥ साघुपरिपालना धरिला अवतारु ॥ निर्विकल्प सेवा हा कल्पतरु ॥जयदेव० ॥२॥ शंकर जन ऐसीं पुराणें गाती ॥ परि सकळांचा जनिता हा मंगलमूर्ति ॥ अगाध याचा महिमा नकळे कल्पांतीं ॥ थोर पुण्य प्राप्ती सेवा ही मूर्तिं ॥जयदेव० ॥३॥ निजभावें पुजन आरतियुक्त ॥ क्षीराब्धी नाना फळें आणिति भक्त ॥ एक आरति पहाति पूजन नित्य ॥ निंदः कपटी बुद्धि ठकले बहुत ॥जयदेव० ॥४॥ मोरयागोसावी भक्त किंकर ॥ थोर भाग्य माझें हा मोरेश्वर ॥ निंदः कपटी बुद्धि नेणति हा पार ॥ गोसावी न ह्मणावा हा मोरेश्वर ॥जयदेव० ॥५॥ विरक्त साधूशील नेणति कुसरी ॥ महानुभावामध्यें अगाध ही थोरी ॥ सर्वांभूतीं भजन समानवैखरी ॥ पाहाति हीं पाउलें धन्य संसारीं ॥जयदेव० ॥६॥ भक्तराम ह्मणें मोरेश्वरमूर्ति ॥ नित्यानंद शरण कल्याण कीर्तिं ॥ तोडिसी मायाजाळ संसार भ्रांति ॥ अंत किती पाहसी नागाननव्यक्ति ॥जयदेव० ॥७॥ N/A References : N/A Last Updated : July 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP