गदिमा - उभा पाठिशी सदैव माझ्या, त...

ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.


उभा पाठिशी सदैव माझ्या, तेजोमय इतिहास

उभे पाठिशी प्रताप, शिवबा, उभे शौर्य विश्‍वास,

उभे पाठिशी भगतसिंगजी, उभे गुरु गोविंद

उभा पाठिशी सुभाष योद्‌धा, गर्जतसे जयहिंद

या देशाचा मी संरक्षक

भारत माझे गाव...सैनिक माझे नाव

मी न मराठी, राजस्थानी, धर्म जाति मम हिंदुस्तानी

मायभूमिचा मी अभिमानी, या अभिमानी धर्मव्रतांचा

अवघ्या अंतर्भाव...सैनिक माझे नाव

जननी माझी भारतमाता, या भूमीतच पिके वीरता

जन्म-मृत्युची मला न चिंता, देह विनाशी, हा तर केवळ

आत्म्याचा पेहेराव...सैनिक माझे नाव

जितेन आणी जगेन लोकी, रण क्रीडांगण माझ्या लेखी

खड्‌ग पडो की मुकुट मस्तकी, देशकार्य ते देवकार्य मज

अढळ अंतरी भाव...सैनिक माझे नाव

उरि निर्भयता, नयनी अग्नी, उन्नत मस्तक करी शतघ्नी

उभा इथे मी असा निशिदिनी, बघू कोणता शत्रू करतो

कुठूनि धीट उठाव...सैनिक माझे नाव

N/A

References : N/A
Last Updated : July 28, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP