राहू पूजन

आकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश्वर्य आणि शांती प्राप्त होते.


राहु पूजन

राहूला छाया ग्रह मानतात. सूर्य मालिकेत राहूचे स्थान वायव्य दिशेला आहे. हा तर्क वृत्ति असणारा ग्रह आहे. याचे स्थान जन्मकुंडलीत उच्च स्थानावर असेल तर जातक हा कुशल राजनीतितज्ञ बनवतो. परंतु राहू जर अशुभ स्थानात असेल तर जातकाला सतत चिंताग्रस्त ठेवतो. पीडित राहु हा अनिद्रा आणि चिडचिडेपणा प्रदान करणारा आहे. राहूच्या वक्री असण्याने कुप्रभावापासून मुक्ती मिळते. तसेच राजकारणातील आपत्तींपासून बचाव करण्यासाठी राहूची आराधना उपयुक्त ठरते. राहू पूजन शनिवारी रात्री केल्यास लाभदायक होते.

आवाहन मंत्र

काळ्या अक्षता आणि काळी फुले हातात घेऊन खालील मंत्र म्हणून राहूला आवाहन करावे.

अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनम्‍ ।

सिंहिकागर्भ संभूतं राहुं आवाहयाम्यहम्‍ ।

स्थापना मंत्र

नंतर खालील मंत्र म्हणून राहूची स्थापना करावी.

ॐ भूर्भुवः स्वः राहु देवता इहागच्छ इहतिष्ठ ।

ॐ राहवे नमः ।

हा मंत्र म्हटल्यावर काळी फुले आणि काळ्या अक्षता नवग्रह मंडळात राहूच्या स्थानावर सोडून द्यावे.

ध्यान मंत्र

खालील मंत्र म्हणून राहूचे ध्यान करावे.

ॐ काअनश्‍चित्र आ भुवदूती सदावृधः ।

सखा कया सचिष्ठया वृता ॥

ॐ महाशिरा महावक्त्रो दीर्घ दृष्टो महाबलः ।

अतनुश्‍चोर्ध्वकेशश्‍च पीडां हरतु ते नमः ॥

राहू मंत्र

खाली राहू मंत्र दिलेला आहे. त्याची जपसंख्या १८००० इतकी असते.

ॐ रां राहवे नमः ।

ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः ।

राहू यंत्र

१३

१५

१४

१२

१०

१६

११

राहू यंत्राची बेरीज कुठूनही केल्यास त्याची बेरीज ३६ इतकीच येते. हे यंत्र कोणत्याही महिन्यातील शुक्लपक्षात येणार्‍या पहिल्या शनिवारी रात्रीच्या पहिल्या प्रहरात डाळिंबाची काडी अष्टगंधाच्या शाईत बुडवून लिहावे. नंतर त्या यंत्राला धूप, दीप आणि काळी फुले वाहून

ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः ।

या मंत्राचा जप करावा आणि लोखंडाच्या ताईतामध्ये किंवा काळ्या किंवा निळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये ठेवून श्रद्धा आणि विश्वासपूर्वक धारण करावे.

राहु दान

राहु दानाचे साहित्य - काळे तिळ, काळे वस्त्र, उडीद, तेल, शिसे, चाकू, काळी घोंगडी इ. हे दान शनिवारी दक्षिणे सहित कोणत्याही अपंग व्यक्तीलाच द्यावे.

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP