उपनयन विधी ४

सर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो.


दीक्षाप्रदानम् - मम व्रत इत्यस्य प्रजापतिर्बृहस्पतिस्त्रिष्टुभ् । बटोर्‍ह्रदये ऊर्ध्वांगुलिपाणिनिधाने विनियोगः ।

ॐ मम व्रते ह्रदयं ते दधामि मम चित्तमनुचित्तं ते अस्तु ।

मम वाचमेकव्रतो जुषस्व बृहस्पतिष्ट्‌वा नियुनक्तु मह्यम् ॥२४॥

(इति स्वपाणिमूर्ध्वागुलिं बटुह्रदये निधाय। )

दीक्षाप्रदान -

ॐ मम व्रते०

(२४) या मंत्राचा प्रजापति ऋषि, बृहस्पति देवता, त्रिष्टुभ् छंद, बटूच्या ह्रदयावर बोटे पसरून हात ठेवण्याकडे विनियोग.

'ॐ मम व्रते०'

हा मंत्र म्हणून स्वतःची बोटे पसरलेला हात ठेवावा.

मेखलाप्रबन्धनम् - (तस्य रक्षार्थं शुद्ध्यर्थं च मेखलामाबध्नीयात् । इयं दुरुक्तादिति द्वयोर्वामदेवो मेखला त्रिष्टुभ् । मेखलाबंधने विनियोगः ।

ॐ इयं दुरुक्तात्परिबाधमानाच्छर्म वरूथं पुनती न आगात् ।

प्राणापानाभ्यां बलमाभरन्ती प्रिया देवानां सुभगा मेखलेयम् ॥

ऋतस्य गोप्त्री तपसः परस्पी घ्नती रक्षः सहमाना अरातीः ।

सा नः समंतपनु परेहि भद्रया भर्तारस्ते मेखले मा रिषाम ॥२५॥

( इति मंत्र वाचयित्वा मेखलां त्रिरावर्त्य नाभिप्रदेशे ग्रंथित्रयं कुर्यात् । तदा बटुः सरहस्यांगसहितवेदत्रयेणावृतोऽहमिति मन्येत)

मेखलाबंधन - ब्रह्मचार्‍याच्या रक्षणाकरता आणि पवित्रतेकरता मेखला बांधावी.

'ॐ इयं दुरुक्ता०' आणि 'ऋतस्य गोप्त्री (२५)

या दोन मंत्राचा वामदेव ऋषि, मेखला देवता, त्रिष्टुभ् छंद, मेखलाबंधनाकडे उपयोग.

२३. जो सूर्य आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो त्याच्या श्रेष्ठ व पापनाशक तेजाचे आम्ही ध्यान करितो.

हे दोनही मंत्र बटुकडून म्हणवून बटूच्या कंबरेला मेखलेल्चे तीन वेढे द्यावे, व नाभीजवळ दोनही टोकांच्या तीन गाठी द्याव्या; त्यावेळी आरण्यके, उपनिषदे यासहित शिक्षा आदिकरून षडंगयुक्त तीनही वेदांनी मी वेष्टित झाले आहे असे बटूने मानावे.

दण्डप्रदानम् -

आचार्यः-स्वस्ति न इत्यस्य स्वस्त्यात्रेयो विश्वेदेवास्त्रिष्टुप् । दण्डदाने विनियोगः ।

ॐ स्वस्ति नो मिमीतामश्विना भगः स्वस्ति देव्यदतिरनर्णवः ।

स्वस्ति पूषा असुरो दधातु नः स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना ॥२६॥

(इति मंत्रेण दण्डं दद्यात् ।)

दण्डप्रदान -

आचार्य - ' स्वस्ति नो' ह्या मंत्राचा अत्रिगोत्रोत्पन्न स्वस्ति हा ऋषि, विश्वेदेव देवता, त्रिष्टुभ् छंद, बटूस दंड देण्याकडे उपयोग.

स्वस्ति नो०

(२६) हा मंत्र म्हणून बटूला दंड द्यावा.

बटु - (दण्डग्रहणमंत्र)

अदान्तं दमयित्वा मां मार्गे संस्थापयन् स्वयम ।

दण्डः करे स्थितो यस्मात्तस्माद्रक्ष यतो भयम् ॥

उपदेशः - ब्रह्मचार्यसि । (१) अपोशान (आचमनं कुरु । मूत्रपुरीषादौ शुद्ध्यर्थमित्यर्थः )

(२) कर्म कुरु (संध्योपासनादीत्यर्थः )

(३) दिवा मा स्वाप्सीः ।

(४) आचार्याधीनो वेदमधीष्व ।

(५) सायंप्रातर्भिक्षेथाः ।

(६) सायं प्रातः समिधमाधेहि

(७) द्वादशवर्षाणि वेदग्रहणान्तं वा ब्रह्मचर्यं चर ।

(८) अप्रत्याख्यायिनमग्रे भिक्षेथाः । अप्रत्याख्यायिनीं वा ।

(ततः स्थालीपाकतंत्रेण स्विष्टकृतादि वा वैश्वदेवतंत्रेण अग्निपूजनादि वा कुर्यात्)

बटु - उद्धत असलेल्या मला दमन करून सन्मार्गाला लावणारा हा दण्ड मी हातात धरला आहे. हे दण्डा, जिकडून मला भय प्राप्त असेल तिकडून माझे रक्षण कर. हा मंत्र बटूकडून म्हणवावा.

उपदेश -

कुमाराला तू ब्रह्मचारी आहेस तेव्हा

(१) मूत्र, शौच, भोजन वगैरेनंतर हातपाय धूत जा.

(२) संध्या, उपासना वगैरे कर्मे करीत जा.

(३) दिवसा झोप घेत जाऊ नकोस.

(४) आचार्यांच्या स्वाधीन राहून वेद व ज्ञान संपादन कर.

(५) संध्याकाळी व सकाळी भिक्षा मागत जा.

(६) सायंकाळी व सकाळी अग्नीवर समिध देत जा.

(७) बारा वर्षे किंवा शिक्षण संपेपर्यंत ब्रह्मचर्य पाळ.

(८) जो पुरुष अथवा जी स्त्री तुला काही तरी भिक्षा दिल्याखेरीज परत जाऊ देणार नाही, त्याजकडे भिक्षा मागण्यास जात जा.

२६. अश्‍विदेव आमचे कल्याण करोत. तसेच भग, देवी अदिति, बल देणारा पूषादेव आमचे कल्याण करो. तसेच द्यावापृथ्वीही आमचे कल्याण करोत. (ऋ. ५. ५१. ११)

यानंतर स्थालीपाक पद्धतीने किंवा वैश्वदेवपद्धतीने अग्निकार्य करावे.

अथ अनुप्रवचनीयहोमः

(सायंसंध्योत्तरं कृतोपनयनहोमाग्नेः पश्‍चिमतो ब्रह्मचारिना सहोपविश्य, आचम्य, प्राणानायम्य, देशकालौ संकिर्त्य)

संकल्प - उपनयनाङगभूतं अनुप्रवचनीयहोमं करिष्ये ।

(स्थालीपाकतंत्रेण वैश्वदेवतंत्रेण वाग्निकार्यं कृत्वा)

प्रधानहोमः (अवदानधर्मेण चरुमवदाय) सदसस्पतिमित्यस्य काण्वो मेधातिथिः सदसस्पतिर्गायत्री । अनुप्रवचनीयप्रधान होमे विनियोगः ।

ॐ सदसस्पतिमद्‌भुतं प्रियमिन्द्रस्य काम्यम् ।

स निं मेधामया सिषं स्वाहा ॥२७॥

सदसस्पतय इदं न मम ।

तत्सवितुरित्यस्य गाथिनो विश्वामित्रः सविता गायत्री । अनुप्रवचनीयहोमे विनियोगः ।

ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।

धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा (२३)

सवित्र इदं न मम । ॐ ऋषिभ्यः स्वाहा । ऋषिभ्य इदं न मम ॥

(स्थालीपाकतंत्रेण स्विष्टकृतादि वैश्वदेवतंत्रेण वाग्निपूजनादि कुर्यात्)

अनुप्रवचनीय होमाचा अर्थ

आचार्याने सायंसंध्यादि आटोपून, उपनयनाग्नीच्या पश्चिमेस बसून बटूसह आचमन, पवित्रकधारण, प्राणायाम केल्यावर-

संकल्प -

उपनयनाङ्गभूत अनुप्रवचनीय होम करतो, असा संकल्प सोडावा. नंतर स्थालीपाकतंत्र, वैश्वदेविकतंत्र यापैकी ज्या तंत्राने कर्म करवयाचे असेल त्याप्रमाणे करून, नंतर अवदानधर्माने चरु घेऊन वरीलप्रमाणे आहुति द्याव्यात. आहुति दिल्यानंतर होमकृत्य संपवावे. हविःशेष ब्राह्मणास द्यावा.

अथमेधाजननप्रयोगः ।

आचार्यः - (आचम्य पवित्रपाणिः प्राणानायम्य देशकालौ संकीर्त्य)

संकल्प - ममास्य कुमारस्य उपनयनव्रतसमाप्तिवेदग्रहणसामर्थ्यलक्षणमेधासिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं मेधाजननाख्यं कर्म करिष्ये ।

तत्रादौ मेधापरनामकसावित्रीपूजनं करिष्ये ।

(वेद्यां पलाशशाखां प्रतिष्ठाप्य तत्र तां पूजयेत्)

मेधायै नमः । आवाहनं, आसनं, पाद्यं, अर्ध्यं, आचमनीयं, स्नानं, वस्त्रं, अलंकारान्, चंदनं, हरिद्राकुंकुमं, परिमलद्रव्यं, पुष्पं, धूपं, दीपं, नैवेद्यं, मंत्रपुष्पं, प्रार्थनापूर्वकं नमस्कारं च समर्पयामि ।

(नैवेद्यसमये यावकसक्तुमिश्रमन्नं मोदकांश्च निवेद्य पुनः पूर्ववत्पूजयेत् ) मेधां ब्रह्मचारिणा प्रणमय्य शुद्धजलपात्रोदकेन सेचनं कुर्वता बटुना त्रिः प्रदक्षिणं कारयन् मंत्रं वाचयेत् )

मेधाजननप्रयोगाचा अर्थ

आचार्याने (आचमन, पवित्रधारण, प्राणायाम व देशकालाचा उच्चार करून)

संकल्प - ह्या माझ्या कुमाराच्या उपनयनव्रताची संपूर्णता आणि वेद धारण करण्याची सामर्थ्यरूप बुद्धि उत्पन्न होऊन, श्रीपरमेश्वराच्या तुष्टीसाठी मेधाजनन नामक कर्म करतो असा संकल्प करावा.

मेधा हे जिचे दुसरे नाव आहे, अशा सावित्रीचे पूजन करतो, असा पुनः संकल्प सोडावा, व एक मातीचा ओटा करून त्यात पळसाची फांदी रोवावी. मग त्या फांदीवर

'मेधायै नमः'

या नाममंत्राने आवाहनादि उपचारांनी पूजा करावी. भाताचा व मोदकांचा नैवेद्य समर्पण करावा. पुनः पूर्वीप्रमाणे पूजन करून ब्रह्मचार्‍याकडून नमस्कार करवावा.

बटुः - ॐ सुश्रवः सुश्रवा असि यथा त्वम् ।

सुश्रवः सुश्रवा अस्येवं सां सुश्रवः सौश्रवसं कुरु ।

यथा त्वं देवानां यज्ञस्य निधिपोऽस्येवमहं ।

मनुष्याणां वेदस्य निधिपो भूयासम् ॥२८॥

(प्रतिदक्षिणं मंत्रावृत्तिं प्रणामं च कारयेत् । तत्तो ब्रह्मचारी स्नात्वा नवान् यज्ञोपवीताजिनमेखलादण्डान् उपनयनवत् समंत्रकं धृत्वा पुराणानि पलाशसन्निधौ विसृज्य पूर्वधृतवाससी गुरवे दत्वा मेधां मह्यमिति सूक्तं विप्रः पाठयित्वा अस्य कर्मणः पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तिवति स्वस्तिवाचनं क्रुयात् )

ॐ मेधां मह्यमंगिरसो मेधां सप्तर्षयो ददुः ।

मेधामिन्द्रश्चाग्निश्च मेधां धाता ददातु मे ॥

मेधां मे वरुणो राजा मेधां देवी सरस्वती ।

मेधां मे अश्विनौ देवावाधत्तां पुष्करस्रजा ॥

या मेधा अपसरस्सुं गन्धर्वेषु च यन्मन ।

दैवी या मानुषी मेधा सा मामाविशतादिमाम् ॥

यन्मे नोक्तं तद्रमतां शकेयं यदनुब्रुवे ।

निशाम तन्निशामहे मयि व्रतं सह व्रतेषु ॥

भूयासं ब्रह्मणाम संगमेमहि ।

शरीरं मे विचक्षणं वाङमे मधुमद्रुहा ।

अवृद्धमहमसौ सूर्यो ब्रह्मणानीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः ॥

मेधां देवी मनसा रेजमानां गन्धर्वजुष्टां प्रति नो जुषस्व ।

मह्यं मेधां वद मह्यं श्रियं वद मेधावी भूयासमजरा जरिष्णू ॥

सदसस्पतिमद्‍भुतं प्रियामिन्द्रस्त्य काम्यम् ।

सनि मेधामयासिषं स्वाहा ॥

यां मेधा देवगणाः पितरश्चोपासते

तया मा मेधया मे मेधाविनं कुरु ॥

मेधाव्य१हं सुमनाः सुप्रतीकः श्रद्धात्मनाः सत्यमतिः सुशेवः ।

महायशा धारयिष्णुः प्रवक्ता भूयासमस्ये स्वधयाप्रयोगे ॥२९॥

नंतर भांड्याने पाण्याची धार धरीत त्या शाखेत बटूकडून

'ॐ सुश्रवः सुश्रवा' (२८)

हा मंत्र म्हणवीत तीन वेळा प्रदक्षिणा करवावी. दर प्रदक्षिणेस सबंध मंत्र म्हणून शेवटी नमस्कार करवावा. नंतर ब्रह्मचार्‍याने स्नान करून नवीन जानवे, अजिन, मेखला व दण्ड उपनयन प्रयोगात सांगितल्याप्रमाणे त्या त्या मंत्रांनी धारण केल्यावर जुनी यज्ञोपवीतादि पळसाजवळ टाकावी व पूर्वीची धारण केलेली वस्त्रे गुरूला देऊन, ब्राह्मणांकडून 'मेधा मह्यं (२९) हे सूक्त म्हणवावे. मग ह्या कर्मास हा पुण्य दिवस आहे असे तुम्ही म्हणावे, असे स्वस्तिवाचन करावे.

॥इतिउपनयनप्रयोगः॥

N/A

References : N/A
Last Updated : December 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP