पितृपंधरवडा श्राद्ध

पार्वण श्राद्ध पितृ पंधरवड्यात करतात.यात मागील तीन पितृ देवतांचा समावेश होतो.


श्राद्ध - संक्षिप्त विधी

दक्षिणायनाचे सहा महिने म्हणजे पितरांचा दिवस तसेच दक्षिणायनाचा आरंभ व समाप्ती या गोष्टी लक्षात घेतल्या तर पक्ष पंधरवडा (भाद्रपद वद्यपक्ष) पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत, मृत व्यक्तीच्या मृत तिथिसच श्राद्ध करावे. तारखेस नव्हे.

दुपारी बारानंतर एक ते दीड तासापर्यंत श्राद्ध करावे.

श्राद्धाला लागणारी तयारी

पांढरे चंदन उगाळून, पांढरी सुवासिक फुले, तुळस, स्वच्छ काळे तीळ, यव (धान्य), सुपारी, तीनचार ताम्हणे, तांबे ३, पळ्या ३, पाट दोन, गोपीचंदन, सुटे पैसे, पत्रावळी, केळीची पाने.

शिधा साहित्य - गव्हाचे पीठ (अर्धा किलो), तांदूळ (पावकिलो), हरबरा डाळ (पाव किलो), तुरडाळ (पाव किलो), गुळ (पाव किलो), तुप (१०० ग्रॅम), लाल भोपळा साधारण (१०० ग्रॅम), २ बटाटे, ५-६ मिरच्या, दक्षिणा. या शिध्यावर तुळशीपत्र ठेवून ब्राह्मणाला द्यावयाचा आहे.

श्राद्धाचा विधी

आचमन - डोळ्याला पाणी लावणे (तीन वेळा पाणी पिणे, चौथ्या वेळी सोडणे)

ओम केशवाय नमः । नारायणाय नमः । माधवाय नमः । गोविंदाय नमः । विष्णवे नमः । मधुसुदनाय नमः । त्रिविक्रमाय नमः । वामनाय नमः । श्रीधराय नमः । ह्रषीकेशाय नमः । पद्मनाभाय नमः । दामोदराय नमः । संकर्षणाय नमः । वासुदेवाय नमः । प्रद्युम्नाय नमः । अनिरुद्धाय नमः । पुरुषोत्तमाय नमः । अधोक्षजाय नमः । नारसिंहाय नमः । अच्युताय नमः । जनार्दनाय नमः । उपेंद्राय नमः । हरये नमः । श्रीकृष्णाय नमः ।

हातात दर्भाचे पवित्रक घालणे.

धार्योऽनामिकया दर्भो ज्येष्ठनामिकयाऽपि वा ।

उभाभ्यामनामिकाभ्यां तु धार्यं दर्भपवित्रकम् ।

ज्येष्ठा म्हणजे मधले बोट व शेवटून दुसरे म्हणजे अनामिका या दोन्ही हातांच्या बोटात पवित्रक घालावे.

प्रथमं लंघयेत्पर्व द्वितीयं तु न लंघयेत् ।

द्वयोस्तु पर्वणोर्मध्ये पवित्रं धारयेत् बुधः ॥

जाणकार बोटाच्या पहिल्या पेराच्या पुढे आणि दुसर्‍या पेराच्या मध्ये पवित्रक धारण करतात.

अपवित्र पवित्रोवा सर्वाव सांगतो पिवा

यस्मरेत् पुंडरीकाक्षो सबाह्य भ्यंतर शुचि ॥

गायत्री मंत्र म्हणावा. प्राणायाम करावा.

ॐ भुर्भुव स्वः ॐ तत्सवितुरवर्णेयम् भर्गोदेवस्य धीमही धियोयोनः प्रचोदयात् ।

मातृ पितृ देवताभ्यो नमः ।

संकल्प -

श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अथ ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम चरणे अमुक देशे अमुक नदीतीरे अमुक नाम संवत्सरे, अमुकअयने अमुक मासे, अमुक पक्षे, अमुक वासरे, अमुक तिथौ अमुक दिवस नक्षत्रे, अमुक चंद्रे, अमुक सूर्ये, अमुकराशो देवगुरौ यथा राशीस्थाना स्थितेषु एवंगुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम पितृ पितामह, प्रपितामहांना (वडिलांचे श्राद्ध असल्यास)

मातृ पितामही प्रपितामहींना (आईचे श्राद्ध असल्यास)

(या ठिकाणी आई किंवा वडील, आजोबा, पणजोबा यांची नावे घ्यावीत.)

गोत्राणां वसुरुद्र आदित्य स्वरूपाणाम् ।

मम पितृणाम् सांवत्सरिक श्राद्धम् सदेवम् करिष्ये ।

तिलोदकम् यवोदकम् करिष्ये

स्वतःभोवती प्रदक्षिणा करणे.

ब्राह्मणांचे पाय धुणे, त्यांचे हाताची पूजा करणे. (गंध, तीळ, तांदूळ, फुल, तुळशी वाहून)

कपाळाला गंध अक्षदा लावणे.

खालील मंत्र म्हणून ब्राह्मणाला शिधा देणे.

मंत्र - धान्यम् करोशी दातारम् इहलोकी परत्रच, तस्मात् फलप्रदानेन सफलास्य मनोरथाः ॥

मम पितृस्मरणार्थम् ब्राह्मणाय भोजन प्रित्यर्थम् शिधा दानम् करिष्ये ॥

खालील मंत्र म्हणून तिळाचे दाणे ईशान्य कोपर्‍यात टाकावे

मंत्र - अयोध्या मथुरा माया काशीकांची, अवंतिका, पुरी द्वारावती चैव सपौताम् मोक्षदायकम्, मममातृपितृमुक्ती हेतवे ॥

तर्पण करणे - (जानवे असल्यास अपसव्य करावे)

उजव्या खांद्यावरून डाव्या हाताला जानवे घालणे

तर्पण - मम मातृ पितामही, प्रपितामही

ममपितृ पितामह प्रपितामह इदं जलम् तर्पयामी

अंगठ्याने पाणी सोडणे.

(पितृ, पितामह, प्रपितामह या ठिकाणी पितरांचे नाव घ्यावे.)

पाठीवरून मागे तीळ, तांदूळ टाकणे,

पितरांच्या फोटोला हार

कावळ्याचा घांस घराच्या छपरावर ठेवावा.

गाईला घास द्यावा.

नदीला घास अर्पण करावा.

मम मातृपितृ श्राद्धम् कृष्णार्पणमस्तु ॥

नंतर घरातील मंडळींनी भोजन करावे.

N/A

References :
श्री. भैरवनाथ पारखी गुरुजी
Last Updated : February 08, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP