गोष्ट चोपन्नावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.

गोष्ट चोपन्नावी

मोठेपणाचे सोंग घातक ठरते, जरा पाऊल घसरल्यास मरण ओढवते.

एका गावी 'शुद्धपट' नावाचा एक कंजूष व लुच्चा परीट राहात होता. तो दिवसा आपल्या गाढवाकडून भरपूर काम करून घेई, पण त्याला चारापाणी घालताना मात्र हात आखडता घेई. अखेर त्याने एका वाघाचे कातडे मिळविले. ते कातडे तो त्या गाढवाच्या अंगावर चपखलपणे बसवी आणि रात्रीच्या वेळी त्याला दुसर्‍याच्या शेतात सोडून देई. त्यामुळे त्या नकली वाघाला खरे समजून शेतातील झोपड्यांमध्ये राहणारे, पिकांचे पहारेकरी घाबरून आपापल्या झोपड्यांची दारे बंद करून घेऊन आत बसत. असे होऊ लागल्याने त्या गाढवाला रात्रभर शेतातले धान्याचे रोप भरपूर खायला मिळे. पहाट होताच तो परीट त्याला घरी घेऊन जाई व त्याच्या अंगावरचे कातडे काढून ठेवी.

त्या नकली वाघाची अशा तर्‍हेने बरेच दिवस चंगळ झाली आणि त्याची प्रकृतीही सुधारू लागली. पण एके रात्री तो नित्याप्रमाणे शेतात चरत असता, त्याला कुठूनतरी गाढविणीचे ओरडणे ऐकू आले. त्याबरोबर तिच्या सादेला प्रतिसाद देण्यासाठी, वाघाच्या कातड्यातले ते गाढवही आपल्या भसाड्या आवाजात 'आँऽ आँऽ आँऽ' असे ओरडू लागले. त्यामुळे त्याचे खरे रूप उघडे झाले आणि शेताच्या रखवालदारांनी काठ्यांचा बेदम मार देऊन त्याला ठार केले.'

ही गोष्ट सांगून तो ताम्रमुख वानर त्या मगराला म्हणाला, 'घेतलेले सोंग केव्हातरी उघडकीस येतेच येते. माझा एक परममित्र म्हणून तू घेतलेले सोंगही आता असेच उघडे पडले असल्याने यापुढे तू माझ्याकडे चुकूनही येऊ नकोस. एवढे सांगूनही जर तू आलास, तर त्या शामलक नावाच्या कोडग्या जावयाला जसे त्याच्या सासर्‍याने हाकलून दिले, तसेच मलाही तुझ्या बाबतीत करावे लागेल.' यावर 'ते कसे?' अशी पृच्छा त्या मगराने केली असता ताम्रमुख म्हणाला, 'ऐक-

गोष्ट - चोपन्नावी

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP