*

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।

नमुं शारदा मूळ चत्वार वाचा ।

गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥

*

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।

जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावें ।

जनी वंद्य ते सर्व भावे करावें ॥

*

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।

पुढे वैखरी राम आधी वदावा ।

सदाचार हा थोर सांडू नये तो ।

जनी तोचि तो मानवी धन्य होतो ॥

*

सदा सर्वदा योग तुझा घडावा ।

तुझे कारणीं देह माझा पडावा ।

उपेक्षू नको गुणवंता अनंता ।

रघुनायका मागणे हेचि आता ॥

*

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP