मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|भाग्योदय| ओवी क्र. ११ ते २८ भाग्योदय ओवी महत्व गणेश स्तवन आणि शिवभजन ओवी क्र. १ ते ३ ओवी क्र. ४ ते १० ओवी क्र. ११ ते २८ ओवी क्र. २९,३० ओवी क्र. ३१ ते ४० ओवी क्र. ४१ ते ५० ओवी क्र. ५१ ते ५५ ओवी क्र. ५६ ते ५८ ओवी क्र. ५९ ओवी क्र. ६० ओवी क्र. ६१ ते ६७ ओवी क्र. ६८ ते ७१ ओवी क्र. ७२ ते ८० ओवी क्र. ८१ ते ८५ ओवी क्र. ८६,८७ ओवी क्र. ८८ ओवी क्र. ८९,९० ओवी क्र. ९१,९२ ॥ देवाचिये द्वारी ॥ ॥ एक उपयुक्त संकलन ॥ कामधेनूस वंदन ॥ स्वधर्म कामधेनू ॥ अग्निमुखि हवन यज्ञ तत्व, रास, ज्ञान स्वधर्माची कार्यपध्दती जीवनसूत्र आणि विवेक उपसंहार पसायदान ओवी क्र. ११ ते २८ प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो. Tags : bhagyodaymarathiभाग्योदयमराठी क्रियायोग विवेचन. यात क्र. २३ येथे स्वधर्माचा अप्रत्यक्ष उल्लेख Translation - भाषांतर तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान, । या क्रियायोगाविण ।कैसे येईल आत्मभान । सांग बाळा ॥११॥तप म्हणजे सहन करणे । स्मितहास्यात वावरणे ।खंत, द्वेष, ईर्षा टाकणे । जाण बाळा ॥१२॥तप म्हणजे प्रेम करणे । तप म्हणजे प्रेम वाढविणे ।तप म्हणजे क्षमा करणे । जाण बाळा ॥१३॥तप म्हणजे कष्ट करणे । चारही पुरुषार्थ बळकट करणे ।यशापयश विसरणे । जाण बाळा ॥१४॥तप म्हणजे टाळणे दोष दर्शन । तप म्हणजे टाळणे क्षोभ होण ।तप म्हणजे टाकणे चडफडणं । जाण बाळा ॥१५॥तप म्हणजे तन-बळ वाढविण । मनबळही वाढविण ।तप म्हणजे धैर्य वाढविणं । जाण बाळा ॥१६॥स्वाध्याय म्हणजे बघणे तन । स्वाध्याय म्हणजे बघणे मन ।निरखणे अंत:करण । जाण बाळा ॥१७॥प्रपंचात नेटकेपण । हे ही स्वाध्याय लक्षण ।सहज सुंदर आचरण । जाण बाळा ॥१८॥ज्या राज्यात आपले राहणे । तेथीचा कायदा जाणणे ।कायद्याने व्यवहार करणे । जाण बाळा ॥ १९ ॥ (राज्य म्हणजे राज्य, देश, कार्यक्षेत्र इ.)पुरुषाचे यशात । पत्नीचा वाटा बहुत ।जाणणे तिचेही मत । स्वाध्यायच ॥२०॥पत्नीस समजणे अडाणी । गाणे स्वत:चीच गाणी ।तप-स्वाध्याय विरोधी करणी । जाण बाळा ॥२१॥परोपकार, सेवा, तर्पण । यशाशक्य करणे दान ।परि विसरावे कर्तेपण । जाण बाळा ॥२२॥ज्या राशी तत्वात देह-जन्म । त्याचे जाणून मर्म ।पाळावे सर्व विश्व नियम । प्रेमाने बाळा ॥२३॥ऐसा हा समग्र स्वाध्याय । बहु स्वहिताय ।साधण्या मनोलय । सहजपणे ॥२४॥तप आणि स्वाध्याय । इतकेचि हाती जाण ।यश, अपयश वा अन्य । ईश्वराधीन ॥२५॥प्रेमाने घेणे नाम । करताना सर्व काम ।इच्छेचे नामोनिशाण । नसावे चित्ती ॥ २६॥हेच ईश्वरप्रणिधान । ईश्वरनिष्ठ होणे जाण ।ईश अस्तित्वाचे भान । ठेवणे सदोदित ॥२७॥संतजनांचे दर्शन घेणं । यशाशक्य सत्संग करणं ।हे ही ईश्वरप्रणिधान । जाण सतशिष्या ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : May 14, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP