भस्त्रिका प्राणायाम

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


भस्त्रिका म्हणजे भट्टीचा भाता. लोहाराच्या भात्यातल्यांप्रमाणे येथे हवा जोराने आत घेतली जाते व बाहेर फेकली जाते, त्यामुळे हे नाव पडले आहे. येथे पध्दती दोन टप्प्यांमध्ये दिली आहे.

पध्दती - टप्पा १
१. उज्जायीचे परिच्छेद क्र.१ व २ यांमधील पध्दती अनुसरा.
२. जलद, जोरकस श्वास घ्या आणि तितक्याच जोराने श्वास सोडा. एक पूरक व एक रेचक यांनी भस्त्रिकेचे एक आवर्तन पुरे होते. श्वासाचा आवाज भात्यातून बाहेर पडणार्‍या हवेसारखा होतो.
३. सलगपणे १० ते १२ आवर्तने करा. नंतर उज्जयीतल्याप्रमाणे संथपणे दीर्घ श्वास घ्या २ ते ३ सेकंद मूळबंधासह कुंभक करा. नंतर उज्जायीतल्याप्रमाणे संथ व दीर्घ रेचक करा.
४. उज्जायी पध्दतीच्या या श्वसनामुळे फुफ्फुसे व पडदा यांना विश्रांती मिळते, आणि पुन्हा नव्याने भस्त्रिकेची आवर्तने करण्याची त्यांची तयारी होते.
५. भस्त्रिकेची आवर्तनचक्रे तीन ते चार वेळा करा. दोन आवर्तनचक्रांमध्ये उज्जायीचे श्वसन करा.
६. हवेचा आवाज जर कमी झाला किंवा जोर कमी झाला तर आवर्तनचक्रांची संख्या कमी करा.
७. प्राणायाम पूर्ण झाल्यावर शवासनात पडून राहा. (चित्र क्र.५९२)

टप्पा २
१. उज्जायीच्या पध्दतीचे परिच्छेद १ व २ यांचे अनुसरण करा.
२. सूर्यभेदनाच्या पध्दतीत सांगितल्याप्रमाणे नाकपुडयांवर आंगठा व बोट यांचा योग्य दाब ठेवा.
३. डावी नाकपुडी पूर्णपणे बंद ठेवा, पण उजवी नाकपुडी अंशत: उघडी असू द्या.
४. वर टप्पा १ मध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त उजव्या नाकपुडीतून जोरकसपणे पूरक-रेचक करीत भस्त्रिकेची १० ते १२ आवर्तने करा.
५. उजवी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी अंशत: उघडा आणि आधीइतक्याच वेळा भस्त्रिका करा.
६. नाकपुडयांवरुन बोटे उचला.
७. उज्जायीतल्याप्रमाणे काही वेळा दीर्घ श्वसन करा.
८. दोन्ही बाजूंनी तीन किंवा चार वेळा आवर्तने करा. प्रत्येक चक्रामध्ये उज्जायी करा.
९. प्राणायाम पूर्ण झाल्यावर शवासनात पडून राहा. (चित्र क्र. ५९२)

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP