मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|उत्सवाची मागणी| आमुच्या मनासम होय उत्सवाची मागणी विषय उत्सवाची मागणी बलसमृद्धि व दु:संगनाशाची मागणी आमुच्या मनासम होय बालभावाची मागणी विघ्ननाशाची मागणी करुणदेवास विनंति आनुकूल्य मागणी उत्सवाची मागणी - आमुच्या मनासम होय श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन आमुच्या मनासम होय Translation - भाषांतर शुक्रवार ता. १३-१२-१९२९उत्सव तुझा जवळी आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥म्हणुनि आम्ही शरण चरणां । घालितसो लोटांगणा ॥२॥आमुच्या मनासम होय । आम्हांसाठी दत्तात्रेय ॥३॥आमुची वृत्ति जेण खुले । ऐसे रुप धरी भले ॥४॥ज्या ज्या वेळी कल्पना जी । तैसे रुप तेव्हां योजी ॥५॥जैसी इच्छा तैसा मूर्त । होवोनि राहे भगवंत ॥६॥भक्त-काम-कल्पद्रुम । सार्थ करी तव नाम ॥७॥बाल युवा जरठ बन । खेळगडी येई होवोन ॥८॥तुझ्यासंगे आम्ही खेळूं । तुजपाशी काढूं वेळूं ॥९॥सोंगडी तूं होवोनियां । येथे येई द्त्तात्रेया ॥१०॥विनायक चरणी शरण । वरद होय नारायण ॥११॥==शनिवार १४-१२-१९२९उत्सव तुझा जवळी आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥उत्सव तुझा कार्य तुझे । तेथे आहे काय माझे ॥२॥होवो माझी पाप धूणी । प्रेम उपजो अंत:करणी ॥३॥मन माझे तेथे भुले । वृत्ती माझी तेथे खुले ॥४॥बुद्धि माझी विकसीत । रंगी रंग भरुनि जात ॥५॥आनंदाचा भाव येतो । दुजेपण विसरतो ॥६॥समरस होतो जीव । काय सांगुं ते वैभव ॥७॥विकल्प सारे मावळती । पसरते मग शांति ॥८॥शांतिचीये छायेखाली । जीवा झोप लागे भली ॥९॥बिश्रांतीते जीव घेतो । जीवपण विसरतो ॥१०॥आत्मस्वरुपांत लीन । रहातसे मग होऊन ॥११॥म्हणुनि उत्सवाचा रंग । करि येथे सर्व दंग ॥१२॥विनायक विनवीतो । कार्य-सिद्धीते मागतो ॥१३॥==रविवार ता. १५-१२-१९२९उत्सव तुझा उदईक । प्राप्त झाला विश्वपालक ॥१॥आमुचा तो महासण । आनंदले अंत:करण ॥२॥उजाडले कधी होय । पाहिन कधी दत्तात्रेय ॥३॥उतावीळ झालो देवा । हेतु माझा पूर्ण व्हावा ॥४॥प्रेमे तूज मी पूजीन । उपचार समर्पिन ॥५॥तुझे यश मी गाईन । तुजपुढे मी नाचेन ॥६॥सर्वदिन करिन सेवा । आवडीने मी केशवा ॥७॥केला ऐसा संकल्प मी । धरीला असे मनी स्वामी ॥८॥सांडोनिया सर्व लाज । गाईन मी देवा तुज ॥९॥कोणासही न भीईन । निंदास्तुति अवगणीन ॥१०॥सकळांत तूंच श्रेष्ठ । तूंच मज एक श्रेष्ठ ॥११॥मग कोणासी कां भ्यावे । कोणासी कां म्यां लाजावे ॥१२॥कोणाचे मी काय खातो । काय कोणा लुबाडीतो ॥१३॥भजने दु:ख कोणा देतो । स्वार्थ कोणाचा हरितो ॥१४॥कोणाचे मी काय करितो । आवडीने तुज गातो ॥१५॥विनायकाचा अभिमान । तुज असो दयाघन ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP