मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|शाक्तांस शिक्षा| ६१८१ ते ६१९० शाक्तांस शिक्षा ६१७४ ते ६१८० ६१८१ ते ६१९० ६१९१ ते ६२०० ६२०१ ते ६२१० ६२११ ते ६२२० शाक्तांस शिक्षा - ६१८१ ते ६१९० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत शाक्तांस शिक्षा - ६१८१ ते ६१९० Translation - भाषांतर ॥६१८१॥एक करी शक्तिपूजा । यंत्र वोजा अवर्ण ॥१॥काय त्याचें थोरपण । ठायीं अन्नपान तें ॥२॥मद्यपात्र मुखीं जाण । अपषोण बुडाले ॥३॥तुका सांडुनी आचार । अनाचारें वर्तती ॥४॥॥६१८२॥नेणे आपुलिया हित । नेणे शाक्त मांजर ॥१॥मद्य पितां माजे रेडा । तैशा पाडा दिसत ॥२॥देहभाव नाहीं शुद्धि । भली बुद्धि भ्रंशिली ॥३॥तुका ह्मणे भ्रांत वेडा । तैशा जाडा चाळवे ॥४॥॥६१८३॥अंगीं लावूनी विभूती । चौक शक्ति अर्चिली ॥१॥घट मांडियले यंत्रीं । माळा सुत्रीं लोंबती ॥२॥गंध धूप दीप फुलें । परीमल सुगंध ॥३॥दीपपरी चहुं कोनीं । गुरुध्यानीं बैसती ॥४॥शिष्या सांगे उपदेश । पुजेस तें दिव्यान्न ॥५॥पात्रमुखीं मागे पुजा । दिव्य वोजा आणवी ॥६॥तुका म्हणे गधडीचे । शाक्त वुचे वर्तती ॥७॥॥६१८४॥नाहीं वेदांची मर्यादा । वर्ते अनाचार सदा ॥१॥काय ह्मणावें तयासी । मूर्तीमंत पापराशी ॥२॥नाहीं द्यावया उपमा । दुजा पापी झाली सीमा ॥३॥तुका ह्मणे शाक्त । बेटा भोगी अध:पात ॥४॥॥६१८५॥जातां तयाचिया गांवा । गुण तयाऐसा व्हावा ॥१॥देखे शाक्ताचें जो कर्म । सांडी धर्म पडे भ्रम ॥२॥नेणे शुची स्नानसंध्या । वादी प्रवर्तक भेदा ॥३॥तुका ह्मणे संग । संगें नर्का जाणें लागे ॥४॥॥६१८६॥पर उपकारा साठीं । शक्ती वेंची बुडे सृष्टी ॥१॥सदा आठोदी पदरीं । पूजा आत्मा कृष्ण हरी ॥२॥पार नाहीं भाग्य ऐसें । पुण्यलाभ नाहीं ऐसे ॥३॥तुका ह्मणे सोपी । वाट अंतीं सुखरुपी ॥४॥॥६१८७॥दया तया नांव । दंभ क्रोध मारी जीव ॥१॥देवा पायीं सर्व शक्ति । दुणी वाढवावी प्रीति ॥२॥दाविलिया वाट । दिलें खाय जाय नीट ॥३॥दाता ऐशा नांव । तुका ह्मणे वेंची जीव ॥४॥॥६१८८॥जगा सुख करी । जाणे साधु तो श्रीहरी ॥१॥जगामाजि राहे सदा । करी विरहित धंदा ॥२॥जन्मले भूतळीं । दीप उजळीला कुळीं ॥३॥तुका ह्मणे दाता । भुक्ति मुक्तीचा जनिता ॥४॥॥६१८९॥सांगतों या लोकां रांडा पूजूं नका । वैकुंठनायका भजा वेगीं ॥१॥काय असे चंडी शक्तीचिये हातीं । अध:पाता नेती अंतकाळी ॥२॥म्हणोनीयां भाव धरा पांडुरंगीं । भवसिंधू वेगीं पार पावी ॥३॥तुका ह्मणे ज्याच्या नामें हे पतीत । पावले त्वरित वैकुंठासी ॥४॥॥६१९०॥टंवकारुनी दृष्टी लावूनियां रंग । दावी झगमग डोळ्यापुढें ॥१॥ह्मणती शिष्यासी लागली समाधि । लटकीचि उपाधी झकविती ॥२॥दीपाचिया ज्योति कोंडियेलें तेज । उपदेश सांज रात्री माजी ॥३॥रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण आसनीं मुद्रा दावी ॥५॥नैवेद्यासी ह्मणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥६॥झाला उपदेश कवळ घ्यारे मुखीं । आपोन शेखीं बुडविलें ॥७॥पाषांड करोनी मांडिले जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥८॥कायावाचा मनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥९॥शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥१०॥विधिचाही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥११॥योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥१२॥वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥१३॥तुका ह्मणे गेलें गुरत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नरकवासा ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP