मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध| संप्रदाय बालबोध आदिखंड मध्यखंड उत्तर खंड अनुक्रमणिका संप्रदाय बालबोध - संप्रदाय सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी संप्रदाय Translation - भाषांतर सत्यं सत्यं पुन: सत्य वेत्ताहं नान्य पृच्छया । संप्रदायं ब्रूहि तात यदि चास्ति कृपा मयि ॥१॥असा शिष्यु निवाला । प्रेमपुटें चोखाळला । पुनरपी बोलता झाला । कांहि येक ॥१॥जी बाणली माझी श्रध्दा । पृछा न करी आत्मसीधा । निवालों जालों शुधा । आत्मरुपु ॥२॥आतां न पुसे ह्मणौनि । लोळि घातली चरणी । निवांत ठेला तो मनि । ठेतु उठली ॥३॥तो प्रपंचाभिमानें रहीतु । शंकायेमान कांपतु । सवेंचि जाकळतु । गुरुचें भीडा ॥४॥यावरी श्रीगुरु बोलत । कां गा राहिलासी निवांत । ग्रंथ संपला गुझें आर्त्त । हरिलें आह्मिं ॥५॥तरि कां निवांत प्रबुधा । तुझा देही कोण श्रध्दा । तेहि पुस गा बाधा । धरुं नोको ॥६॥तवं बोले शीष्यरावो । गुरु बोलि दीजे ठावो । यास्तव समुळ संप्रदावों । सांगा मज ॥७॥जी हा ग्रंथु गुह्यसागरु । कल्पिला अर्थी कल्पतरु । नां हा ये भूमि ज्ञानभास्करु । उदो जाला ॥८॥वेद शास्त्रें पुराणें । आलिं शाव्दिकें प्रमाणें । परी महां गुह्यें गहनें । ये कोठोनि प्राप्तें ॥९॥यावरी श्रीगुरु बोलिले । तुवां आर्ते हें पुसीलें । तेंही सांगो भलें । चित्त देई गा ॥१०॥आह्मां प्रसन्न भवानि । पुढारले शूळपाणि । हें तों कथनिचा कथनि । कळलें तुज ॥११॥तरी जन्म कर्मानुसारें । मज प्राप्त जाले बा रें । ते हें तुज आदरें । कथन करु ॥१२॥पाहे वरदवाणि वाचुन । सुलाळित न ये वचन । महद्रुह्याचे प्रमाण । कैचें तेथें ॥१३॥हा राउतु हा वारु । जेथ नाहि निर्धारु । तेथ भला ज्ञातारु । रिझे काई ॥१४॥शास्त्रें संदेहकारकें । तें नव्हती भवछेदकें । मां ज्ञानसुखदायकें । कैसी होती ॥१५॥तैसा नव्हे बाळबोधु । हा प्रत्यक्ष ज्ञानसींधु । जो अवलोकितां चि शुधु । होये प्राणि ॥१६॥हे ज्ञानाची धेंडावळी । तु लाधलासी पानि जळीं । वरी संतोषलासी मूळि । स्वसुखाचियें ॥१७॥त्या ज्ञानावरी वोडवो । तुज देवों संप्रदावो । आतां विस्तारुन घॆवों । हें चि कथन ॥१८॥तें सचित आईक आतां । आह्मां शून्यें आमचा पीता । तो प्रत्यक्ष ब्रह्मज्ञाता । शांत मूर्ति ॥१९॥तो कृष्णदेवाचा सुतु । नावें भैरवु विख्यातु । भला ब्राह्मण साक्षांतु । यजुवेंदि ॥२०॥शाखा माध्यांजनि पवित्र । शुध्द सांतल्य गोत्र । वंशवृधीस्तव पुत्र । इछिले तेणें ॥२१॥तो राजयोगी ब्रह्मनिष्टु । लोकसंग्रहि कर्मिष्टु । सभाग्यसंपनु श्रेष्टु । देविं धर्मि ॥२२॥तो वंशवृधी विचारी । जाउनि तुळजापुरी । अनुष्टानें सर्वेश्वरीं । प्रसन्न केलि ॥२३॥ते रात्रीं प्रत्यक्ष आली । तो येरा घुमिं दाटली । यामाजि फळें तिनि वोपीलीं । त्याचां करी ॥२४॥प्रथम फळ देतां करी । लिळा बोले सर्वेस्व्हरी । विद्या ज्ञान या भीतरी । भाग्य असे ॥२५॥दुसरें फळ उचलिलें । तैं भैरवांकरी वोपीलें । ते समयीं काय बोलिले । जगन्माता ॥२६॥हे फळ शुधांशु । याचा मानि तुं विश्वासु । शोभा पावैल वंसु । येणें फळें ॥२७॥पुत्रु जालेया केवळ । करीं देखसी त्रीशूळ । ते ज्ञानगर्भ महाफळ । माझें वरद ॥२८॥यावरि मौन्य धरुनि । तिजें फळ वोपीलें पाणि । पुनरपी प्रसन्नवदनी । अंबा बोले ॥२९॥तिहिं फळां येक रसु । मधील तो माझा अंशु । याचा गर्भि प्रकाशु । योगनिधीचा ॥३०॥असे जालेया वरदान । एरें उघडीलें नयन । तवं ते माया निर्गुण । स्वरुपें जालि ॥३१॥असो तो अलियां स्वस्थानि । पुत्रु लाधला तिनि । नृसींहु त्रिंबकु आणि । कौडन्य नामें ॥३२॥आतां असो हें विप्तत्ति । आइक आमची उप्तत्ति । गर्भु संभवलियां प्रसूती । आरंभलि मातें ॥३३॥तवं पीतयाचां श्रवणी । अकस्मांत पडली ध्वनी । स्वरुप नेदखे नयेनी । आईके शब्दु ॥३४॥जें पूर्विं वरद दीधलें । तें मधील फळ हें जन्मलें । करी त्रीशूळ हे आईकीलें । वचन तेणें ॥३५॥जन्म पावलेया बाळा । पिता तों चि काळिं ये जवळा । दीउ घेउनि पाणितळा । पाहातां जाला ॥३६॥जो तों पाहे करतळें । तो तिन्हि रेखा विसाळें । असें देखीलें त्रीशूळें । दोहिं करु ॥३७॥भवानि शंकर उभये । वरद त्रीशूळ होये । खुण दाविली निश्चयें। जगन्माता ॥३८॥यावरी शीष्यु संशये पुसे । जी जी त्रीशूळ तें कैसें । हें आह्मां बहुतां विश्वासें । केवि मानें ॥३९॥हो कां ह्मणौनि तये वेळां । शिष्य हो पा करतळां । तें प्रत्यक्ष देखोंचि सकळां । विश्वासु होये ॥४०॥पाहातां मनुष्याचा हांतिं । असया संगमरेखा नसती । गुणत्रयाचि विप्तति । तेथें दीसें ॥४१॥असो हा कोण्हाचा अवतारु । आह्मां नकळे निर्धारु । ह्मणौनि करि नमस्कारु । के काळी पीता ॥४२॥ऐसें मानुन साचार । मज न बोले दुरोत्तर । ना न संगे धुळाक्षर । विद्या कैंचि ॥४३॥असो हे कथा पुढारी । व्रतबंधु जालयावरी । विव्हायाचें भरी । न पडे ची पीता ॥४४॥यावरी दीवसां बहुतां । भैरवांसी बोले आमुची मातां । लग्र विद्या उभयेता । कां न करा बाळा ॥४५॥पाठीं अश्वपात आणौनि डॊळां । आमचा पीता तये वेळां । सांगता जाला तो मिं जवळा । सहज होतों ॥४६॥भारव्दाज गोत्रजाता । ते अंबावती आमची माता । तयेसी जाला सांगता । भैरवदेवो । ॥४७॥तो ह्मणे आईक सुंदरे । आह्मी तीर्थें केली अपारे । पाठीं गृहधर्मु आदरे । विस्तारिला ॥४८॥जाउनि तुळजापुर क्षेत्रीं । अनुष्ठान केलें मूळमंत्री । तो अंबा नवमिये रात्रीं । प्रत्यक्ष जाली ॥४९॥असी ते सर्व समुळ कथा । सविस्तर सांगे पिता । योगी जन्मला हें ही सांगता । सर्व जाला ॥५०॥प्रसुदि जालियावरी । खुन पाहिली बरवेपरी । त्रीशूळ दोही करी । आकारु देखे ॥५१॥तेव्हां आनंदें देह दाठलें । सवें चि दु:खानें भरीतें आलें । कां जे योगी जाला तरी गेलें । असते निधान ॥५२॥असें मागी सर्व सांगीतलें वचनी । यावरी माझी जननी । मज समीप पाचारुनी । पाहे हात ॥५३॥सांगितली खुण तेसनी । करीं देखे जननी । गहीवरुनी दोघीजनी । विचारु केला ॥५४॥वर्दकाळिं सर्वेश्वरीं । ह्मणें जें योगी जन्मैल उदरीं । तरी हा न धरैल गृहाचारीं । ह्मणति दोघे ॥५५॥पाहे शीष्याते आरुश कैसी । मोहो झळंबला मानसीं । योगी ह्मणीझे कोणासी । हा स्मरु नाहिं ॥५६॥जीवा ईश्वरा संयोगु । व्दैतभेदाचा त्यागु । यासी बोलिजे राजयोगु । हा स्मरु त्या नाहिं ॥५७॥असो हें म्या ची माझें आदरें । कांहिं केलीं अक्षरें । पीता संप्रदायीकें उत्तरें । न संगे चि मज ॥५८॥प्रारब्धुभोगु न टळे । हें ही त्यासी न कळें । असो हे पीता स्वस्तकाळें । पावला मृत्यु ॥५९॥पाठी आह्मीं चि आपुला । गृहस्तधर्मुइ विस्तारला । दुख हें जें वंचला । पीतु ज्ञाना ॥६०॥तेणें ज्ञानें प्रबुधु । नृसींहु माझा ज्येष्ट बंधु । त्याचा उपदेशी प्रबोधु । काही जाले ॥६१॥सवें चि नाना गुरु ज्ञानी । मिं जालों देहाभिमानी । यावरी भेटला ज्ञानी । कमळाकरु ॥६२॥तो आणि नृसींहु ह्मणें । काये काज अन्य ज्ञानें । अजन्म सुख पूर्णपणे । पावीजे तें चि घेई ॥६३॥असा याचा उपदेशु । मज मानला विश्वासु । आतां ये वस्तुचा प्रकाशु । होये ते करुं ॥६४॥संतोषे नृसिंह कमळगर्भु । तो चि मि पाहे लाभु । परि हा नोहे सुलभु । कोन्हें हि व्दारें ॥६५॥दरुशनें आश्रम अनेक । ज्ञाति वर्ण शुध लोक । म्यां सेविलें सकलैक । पण श्रधा न बाने ॥६६॥पाठिं विचारीलें ये योगी साक्षांत । फलद चंडी देवत । जे प्रसन्न होउनी पूरवीत । आर्त सर्वांचे ॥६७॥एवं शक्ति शंकराचे चिंतन । यें चिते प्रर्वतलें मन । रात्रिदीसु आन । नलगे चित्तिं ॥६८॥निद्रे वोथारु जागनां खेदु । अशनपान नेदि स्वादु । शोडश रात्रें वेधु । संचरला असा ॥६९॥तवं ध्यान विस्मृति यावरी । वरुशां पांचाची कुमारी । मिरवली सर्वे श्रृंगारीं । भासली डॊळां ॥७०॥ते प्रसन्नवदन दक्षिणभागीं । उभी राहोन बोले वेगीं । तुझें फल आहे सत्पश्रुंगीं । लाहासी तेथें ॥७१॥हेतु जालेयावरी । आनंदु मनामाझारी । मग निगालों झडकरी । सप्तश्रुंगा ॥७२॥तेथ माहामायेचा रहिवासु । ह्मणौन नांदे श्रीसीधेशु । यणें व्दारें सर्वसु । उधरे जगु ॥७३॥तें जालयां प्राप्त स्थान । नेमस्त ठालों धरुनि ध्यान । तवं त्रुतीयेचि रात्री प्रसन्न । जालि अंबा ॥७४॥पूर्वि ची वरु होता कांही । येथ संदेहो न पडे चि पांहि । ते महीशमर्द्दिनी हि । प्रसन्न जाली ॥७५॥ते कृपावछळ भवानि । करें स्पर्शलें वदनि । मति उठलि तेथुनि । अकस्मात ॥७६॥माग ह्मणौनि देवी बोले । तो ब्रह्मज्ञान स्मरले । तत्समई ते चि मागीतलें । जगन्माते ॥७७॥पाठिं ब्रह्म शुचिकें स्थळे । अंबे निरीपीलीं सकळे । आणिक ही तयेवेळे । आश्चर्य जालें ॥७८॥जो ब्रह्ममूर्ति आकारु । तोहि प्रसन्न जाला सिधेश्वरु । मस्तकिं ठेविला करु । व्दिजवेषें ॥७९॥तेणेदेवें त्रीलोचनें । मज उपदेशीली पांच वचनें । जेवि जेवि विस्तरली गहनें । ये ग्रंथभूमिके ॥८०॥माहागुह्यें निर्मळें । तेहिं केलीं प्रांजळे । येरेंही ज्ञानें सकळें । सांधीतली देवें ॥८१॥पाठीं प्रकाशु करुनि । कांहिं येक दाविलें लोचनी । जें भरलें दीसे आझुनी । दृष्टी श्रृष्टी ॥८२॥मन सहित इंद्रियें सकळें । जालिं सुखपात्रें निर्मळें । याचा वेचु कोण्हे काळें । नाहि तया ॥८३॥या वरीचिल संतोषु । तो बोलैल कोण पुरुषु । जेथ प्रसन्न जगदिशु । आत्मा हरु ॥८४॥प्रसन्न करीता भवानी । अयाचित जोडले शूळपाणि । फीटली सर्व सीराणि । अप्रयासें ॥८५॥श्रध्दा अपेक्षित होति । जे प्रसन्न होवा भगवति । वरद करुं पशुपति । ऐसें कैचें ॥८६॥जें आरुती भूतें प्रेतें । ते चि कोणां हातु देतें । देवाहि निच देवतें । अभीमुखें नोहती ॥८७॥तेथ प्रसन्न होये चंडिका । कैचें विश्वासु ईतुका । परी रंक निघॆ इंद्रलोका । तैसें म्या केलें ॥८८॥टीविटीवि उपसी अंबुनिधी । तैवी मज संचरली बुधी । उदीम मांडिला तो सीधी । स्वभावें जाली ॥८९॥पुढारली चंडी वीरा । तेथ कृपा कासी शंकरा । कोण भाग्याचा उभारा । पुढां आला ॥९०॥जेवी साधकु पाहे अंजनी । तो तो घॆउनि भेटे चिंतामणी । तेवि शंकरेसहित भवानी । पुढारली आह्मा ॥९१॥नाना वेवसा ऊँ करीतां । परीसु भेटॆ अवचितां । कीं सेव्यें तरु ढांडोलितां । संतानु लाभे ॥९२॥तेवी पाहातां सर्वेश्वरी । अवचटां लाभु त्रिपुरारी । जेवी सेवितां सुवारी । अमृत मिळे ॥९३॥असो हा दुजा अभिमानो । घडला काकताळि न्यावो । तेवी न पातां पातला दे ऊँ । सामर्थेसी ॥९४॥नातरी घृणांक्षरिचें परी पाहतां । आलें रेखन न करितां । तेवी पुढारला जगत्पिता । वृषभध्वजु ॥९५॥तो जाला प्रसन्न । तो उन्मळले अंतर लोचन । मूळिं माजले मन । नडनाचु करी ॥९६॥जयाचेंनि कृपाजळें । जीउ अनादि चोखाळे । ब्रह्मसुखाचे सोहळे । आंगा येति ॥९७॥असो यापुढील विनोदु । प्रगटला ब्रह्मानंदु । पूर्ण समाधि सन्मंधु । जेथें असे ॥९८॥परि उन्मनिचें अवतरण । सुखागणितें कवण । अवस्ता होती लीन । येरी जेथें ॥९९॥महासुखाचा संचारु । निंरसला स्वप्रसंसारु । सचेत जालियांही थोरु । उव्दोध दाटॆ ॥१००॥त्रैलोकीं नेक वरुशें । राजे कीजे उल्हासें । तेही न तुळे ब्रह्मसंतोषे । निमिषाचेनि ॥१॥हें सुख आहे जेसनें । ते तो अनुभवी चि जाणें । परि गा बोलतां वचनें । मिठि पडे ॥२॥जर्हिं मि घे ईकडील स्वादु । तर्हिं न वचे ब्रह्मानंदु । सर्व इंद्रियां संवादु । तो चि थारे ॥३॥फुल फळपणें सरे । आमोदु सन्मंधी उरे । तेवि आजन्म पर्यंत बा रे । सुख चि सर्व ॥४॥पूर्विं ब्रह्मप्रकाशु करीतां । आले तुझया चि चित्ता । ते मिं काय सांगो आतां । पुढां आइका ॥५॥जो जगदात्मा जगजीवनु । जगव्दंधु जगमरण । तो मज उपदेश देउनु । काये करी ॥६॥जो दिसत होता साकारु । तो चि जाला निराकारु । तर्हिं पूर्ण श्रीशंकरु । हारपे कैसा ॥७॥यावरी चिदांबिका बोले । ह्मणें जें तुज ज्ञान जालें । तें तुं विस्तारिं आपुलें । ये क्षितिमंडळि ॥८॥आतां जे जें तु बोलसी । तें उपेगीत होये सर्वासी । हा संप्रदावो सीधेसी । येथुनी पुढां ॥९॥हा संप्रदावो सद्य स्फळद । हें सत्य माझें वरद । तुझें वचन सुविद । सेवीति सर्व ॥१०॥ऐसी आज्ञा अंबा केली । तेही तेथें चि सामावली । किं ये शरीरी संचारली । गमे मज ॥११॥मध्यखंडी प्रथम कथन । तुज केलें निरुपण । आतां विस्तारां कारण । नसे काहि ॥१२॥ऐसी हे प्रसन्नता जाली । सर्व हि श्रध्दा बाणली । स्वस्थाना आलो भेटी घॆतली । समर्थाची ॥१३॥त्यासी जो कांहीं बोले । तो तें चि प्रेमें दाटले । महासुखें सुखावलें । उभयतातें ॥१४॥नृसींह कमळा संतोषे । आत्मा नमस्कारितां हरुषे । फळ जालें विशेषें । आनंदला मि ॥१५॥तुमचा आदरु देखोनि । पाठिं येहिं दोघीं जनी । आज्ञा केली म्हणौनि । रचिला ग्रंथु ॥१६॥स्वयं गुरु विश्वपिता । पुढारली जगन्माता । कमळा नृसींहु उभयेता । संवाद स्वामि ॥१७॥एवं येकें येक विचारें । या ज्ञानावरी ज्ञान भरे । त्रींबकु ह्मणे ते उत्तरें । विस्तारली ये ॥१८॥असा तो ग्रंथु सीध जाला । तो कोन्ह येकु संन्यासीप्रीति संचरला । तेणें तस्करहेतु तो नेला । बालबोधु ॥१९॥पुनरपी वरद जगन्माता । ग्रंथु रचिला मागुता । यास्तव नयेल साम्यता । दोही प्रतीसी ॥२०॥नाना शास्त्राचें दुहन । वेचुन घेतलें कारण । तें केलें निरुपण । शीष्याप्रती ॥२१॥प्रकाशेविण बोलनें । तें जळो लाजिरवानें । जें र्पत्यक्ष आंगी बानें । तें चि घ्यावें ॥२२॥जें ज्ञानेंविण उत्तर । तें नोहे शुध्द सार । जैसें जळेविण सरोवर । निरर्थक ॥२३॥जैसी निर्फळें उद्यानें । कां पुष्पें गंधहीनें । ना तरी अंह्दाचें बोलणें । तैसी पदें ॥२४॥जैसी दरेसीचि रयेनी । कीम गुणनग्र कामिनी। कीं कर्मभ्रष्ट प्राणि । विप्रकुळीचा ॥२५॥तेवि परमार्थेंविण । बोल सर्व अकारण । जैसें सरस पक्व इंद्रवन । असेव्य होये ॥२६॥नातरी पर्वताफ़्च्या गारा । दिसती तेजें सुंदरा । तेवि बाहिजां उतरां । देखती ज्ञाते ॥२७॥प्रमाणें रहित जे बोल । ते काये निर्बोल । जेवि विषाचें सलील । सेउं नये ॥२८॥न कळतां दोषाचें लक्षण । वेदा न ये साचपण । तेवि आत्महितेविण । कवि कविता ॥२९॥जेवि अंजनेविन साधकु । किं दसेविण नायेकु । किं कळेविण भयंकु । उपेगा न ये ॥३०॥किं वर्तारें विण ज्योतिशी । नियमेंविण्ण तापसी । किं निग्रहें संन्यासी । शोभा नेदी ॥३१॥किं धर्मशास्त्रें विण मंत्री । किं क्षत्र वृत्तिविण क्षत्री । किं अंतर्निष्ठेविण श्रोत्रि । रुपा नये ॥३२॥हे आत्महिता वाचुन । ते सर्व असेव्य जलपन । राग स्वरा विहिन । गायेन तैसे ॥३३॥जें बोल ज्ञानगर्भा वाचुनि । ते उगयांची आईकावें श्रवणि । पण अर्थ विशईं सुजानि । घेउ नयेति ॥३४॥तैसीं नव्हति ये उत्तरें । यें ज्ञान अंगेंचि पाझरें । जेणें उचंबळतें भरति विवरें । श्रवणधरेंचि ॥३५॥ये शब्दघन दारा अक्षरें । सुखंदाकिनी व्दारें । श्रवण सिंधुसी निर्धारें । संगमा येति ॥३६॥पूर्व प्रणित वैरागरें । वाचा वेचिले शब्दहिरे । हे श्रवणश्रीमंता साजीरे । अळंकार होती ॥३७॥हें ब्रह्मवृष्टी शब्दधारा । एति सुविद श्रवणसरोवरा । परि मोघगिरिच्या पाठारा । झरोनि जाती ॥३८॥हरवदर उदोत्कार । ते हें प्रगटलें शब्दाकार । ग्रंथभूमि सविस्तर । प्रकाशले कीरु ॥३९॥चांमुडेचें स्नेहपान्हा । हा आणिला ग्रंथु भरणा । विशेषें श्रोतश्रवणपाना । योग्य आहे ॥४०॥असो हे केली ग्रंथवोवनी । परि जो वोविला शब्द मनि । तो नाहि आला परतोनि माळीके ये ॥४१॥देशीक्ज वचनाचा वेचीवां । तो हा जाला रासींवा । संस्कृताचा गोडिवां । येथें आहे ॥४२॥ज्या बाळां नाहिं जननी । त्यासी सर्वेही सीराणि । सब्दुधी सांडवला प्राणि । तो यापरी ॥४३॥यास्तव सगर्भवानी । पूर्वशुचके सुजानी । ते बोलावि बोलनी । आत्मरहितें ॥४४॥तो हा शिष्यकुळा हितार्थु । मिं बोलिलों परमार्थु । परि संत हो जी तुम्हा समर्थु । नव्हे हा ग्रंथु ॥४५॥जे ज्योति तिचि महिमा । मार्जिल ते सन्यासाचि तमां । वांचुनिहिं भानुचि सीमां । उलंघवे काई ॥४६॥मृत्याचाअ मृत्य हरी । परि अमरा अमर न करी । तर्हिं स्वादार्थु सुरवरी । अमृत सेवनें ॥४७॥दिनाचें दरीद्र हरि । ईश्वरा उपकारु न करी । तर्हिं शोभनार्थ व्दारीं । चिंतामणी स्थापिला ॥४८॥आर्त्तिकासी कल्पदृमु । परि तो हरिना हरीचा श्रमु । तर्हिं लावनि केला उत्तमु । श्रृंगारवटिके ॥४९॥तेवी हां शीष्या निर्धारु । तुह्मां न करील उपकारु । तर्हि हा माझा आदरु । भूषणार्थ घेणें ॥५०॥हा अबुधाचें अर्थ हरी । प्रबुधा उजळ्णी करी । ज्ञानावरी ज्ञान भरी । बाळबबोधु हा ॥५१॥अविदाचि अविद्या नाशी । सुविदां सद प्रकाशी । परमार्थु परमार्थासी । गुफनि करी ॥५२॥बुधि बुधीचे नेहटी । बैसे घालुनि मांड कुटी । प्रेम प्रेमां दळवटी । चालनें होये ॥५३॥ब्रह्मीष्टु ब्रह्मे गाजे । योगी चि यौगें माजे । प्रकाशु प्रकाशांचि बीजे । घॆउनि उठे ॥५४॥गुरु डोले गुरुपणें । बोलु बोलातें जिणें । आनंदासी पाहुणें । आनंद होती ॥५५॥असी यें समर्थें उत्तरें । सगर्भ घेणें चातुरें । येथीचे ज्ञान निर्धारें । सुखी होणें ॥५६॥असंशये ब्रह्मज्ञानि । त्याहिं भली हे वाणि । जे धन्यकुळा निधानि । विशेषु मानि ॥५७॥हे पवित्र विद्या भली घ्यावी । आत्मपल्लवी ग्रंथी द्यावी । हृदयें मांदुस करावी । सांटवणें यासी ॥५८॥ हें अज्ञानतमां निरसी । ज्ञान प्रकाशुही प्रकाशी । तें हे समर्थ सुदेशी । सर्वज्ञपणें ॥५९॥वेदशास्त्र दुर्मवल्ली । तेथीचि पुष्पें यें गुंफीली । जें अमोदगुणें आथीली । मकरंदबोधें ॥६०॥जें आनंदरंग बहलें । शोभती अभेद पददळें । वेचोनि टाकिली अरळे । संशयाची ॥६१॥हे कुशुमाक्षर वोवणी । वोवि पूर्ण आत्मगुणी । गुरुगुह्य घोलुनि । मेळवाणि केलि ॥६२॥ ते हे पास चिर माळा । घातालि शिष्यांचा गळा । ते शोभे अमळा । नाना पदार्थे ॥६३॥हें प्रेमदाइक लेणें । कंठि धरील अतिमानें । तो श्रोत्रयासी साजणें । न करी कैसा ॥६४॥श्रोता वक्ता समंधी । तुटे संशये भवव्याधी । विशेषें आनंद माहनिधि । प्राप्त होये ॥६५॥यास्तव हा ग्रंथु बरवा । समूळ सुजाणि घ्यावा । जरी विश्वासु होईल जीवा । तरी च निका ॥६६॥संसारमूळ छेदकें । तें चि शास्त्रें अलोलिकें । तें घेईजति कौतुके । हीतार्थलागी ॥६७॥यास्तव श्रोतां जनी । आदि मध्य अवसानी । बोल घ्यावे विचारुनि । सुधवट ते ॥६८॥जरि येईल हीतार्था । नाशैल संशय जन्म वेथा । आत्मा प्रकाशैल तरि चि या ग्रंथा । वंदुनि घेणे ॥६९॥परमार्थविषीं जे पाहीजे । ते जरी येथें लाहीजें । तरी चि आदरें घेईजे । बाळबोधु हा ॥७०॥असो हे ईश्वरज्ञाना आधारु । ग्रंथ संपविला सविस्तरु । तै चैत्रशुध प्रतिपदा संवत्सरु । बहुधान्य नामे ॥७१॥अंक नव सात सा च्यारी ४६७९ । यें वरुषें कळि कर्मली माघारी । तैं शाळिवाहान शकु पंधराशीरीं । दोनी पूर्णें ॥७२॥असी सुदिनि कौतुकें । ग्रंथ संपविला त्रिंबकें । पदें जाली सुरसीकें । शंकर वरदे ॥७३॥चांमुडेचा स्नेह तारु । तेणे उतरलो ग्रंथसागरु । ह्मणे राजयौगी कुमरु । श्रीभैरवाचा ॥७४॥इतिश्री चिददित्यप्रकाशे श्रीमव्दालबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडें विवरणे संप्रदाव नाम पंचदशं कथन मिति ॥१५॥इति श्रीमद्भैरवात्मज श्रीत्रिबकविराचिते । श्री बालबोध संपूर्ण ॥बाळबोध आरंभ शकें चौदासे चौरानौ । गत कळी वरुशें च्यारि सहस्र सा शतें तीरात्रि अंगिरा संवछारु फालगुनशुध पंचमी । ग्रंथु संपला तो दीवसु । गतकळि च्यारि सहस्र षटुशतें एकुनासी शकें पंधराशतें बहुधान्य संवत्सरु चैत्र शुध्द प्रतिपदा ॥ऽऽ॥समाप्त शके १५७५ विजय संवत्सरे साघ शुध १ सोमे धरणिधरग्रामे पुस्तकमिदं लिखित ॥ शुभंभवतु ॥ बोलबोध उत्तरखंड ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 09, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP