मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|एकांकिका|मी आपला चाललोच आहे !| प्रवेश तिसरा मी आपला चाललोच आहे ! प्रवेश पहिला प्रवेश दुसरा प्रवेश तिसरा प्रवेश चौथा प्रवेश तिसरा नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी प्रवेश तिसरा Translation - भाषांतर [ स्थळ : एक लहानशी खोली आहे. खिडक्या बंद आहेत. मिणमिण करीत एक दिवा जळत आहे. कोपर्यात एक टेबल असून त्याच्या वर ठेवलेली शेक्सपिअर, ब्राउनिंग व शेली वगैरे कवितांची पुस्तके, जवळच अंथरुणावर निजलेल्या रोग्याकडे खिन्न मुद्रेने पहात आहेत. खोलीच्या मध्यभागी मळकट अथंरुणावर शंकरराव अंत:काळाच्या निद्रेत अर्धवट गुंगून पडले आहेत. श्रीधरपंत शंकररावाकडे एक स्नेही आहेत. ][ वेळ : दुसर्या प्रवेशानंतर लागलीच थोड्या वेळाने. ]शंकरराव : सुख आणि दु:ख ! आता काय करायचे आहे मला त्यांच्याशी ... एक - एक - एक - एक करता, गेले सगळे आयुष्य गेले ! चार क्षणांचाच काय तो आधार राहिलेला आहे. पण मला येथे कोणी व केव्हा आणून ठेवले ? का उगीच वाद करता ? मी कसा आहे, हे माझे मलाच अजून कळले नाही. तर तुम्हाला - जाऊ द्या ! - हो तर काय ! माझ्यामागे कोणी रडायला राहिलेले नाही ! फारच चांगले झाले ! स्मशानाकडे न्यायला म्हणून उचललेल्या प्रेताकरिता ती उचलताना... जे काही हंबरडे फुटतात.... नको ! ते ऐकणे नको !!श्रीधरपंत : ( आत येतात ) शंकरराव !शंकरराव : कोण आहे ?श्रीधरपंत : मी - श्रीधर. तुम्ही ज्यांना बोलावणे पाठविले होते, त्या आल्या आहेत. शंकरराव : काय, ती आली ? खरंच ? अहाहाहा !श्रीधरपंत : ह्या पहा आल्या. सारखा तुमचा....( एक स्त्री आत येते. )स्त्री : शंकरराव !शंकरराव : काय तू... तुम्ही आलात ? परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो....पण खरेच का तुम्ही आल्या आहात ? की...स्त्री : शंकरराव !शंकरराव : जे काही मी लिहिले, ते तुझ्या - तुमच्याकरिता म्हणून लिहिले ! तुम्ही वाचावे, त्याचे थोडेसे तरी कौतुक करावे म्हणूनच... निदान तुम्ही एक वेळ जरी त्याच्याकडे नुसते पाहिले असते तर मला किती आनंद ! मला दडपले ! ओक् कोण मला दडप...( अंधार ) N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP