मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|एकांकिका|मी आपला चाललोच आहे !| प्रवेश दुसरा मी आपला चाललोच आहे ! प्रवेश पहिला प्रवेश दुसरा प्रवेश तिसरा प्रवेश चौथा प्रवेश दुसरा नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी प्रवेश दुसरा Translation - भाषांतर [ स्थळ : मोठा रस्ता. नगरखाना, तासे, बेंडबाजा वगैरे वाजत आहेत. किटसनचे दिवे व नळे चंद्रज्योती यांच्या उजेडात मोठ्या थाटाने वरात चालली आहे. पालखीमध्ये शंकरराव व त्यांची पत्नी बसलेली आहेत. बरोबर पुष्कळ मंडळीही चालली आहेत. ][ वेळ : पहिल्या प्रवेशानंतर लागलीच थोड्या वेळाने. ]शंकरराव : नाही, पडायचा नाही ! मी नीट धरुन बसलो आहे. पण का हो गणपतराव, आसपासच्या माड्यांच्या खिडक्या तर सगळ्या बंद दिसत आहेत ! आपली वरात उशीरा तर नाही निघाली ?गणपतराव : नाही, काही फारसा उशीर झाला नाही. आणि न का पाहिनात लोक ! आपण काय मोठी त्यांच्यासाठी वरात काढली आहे ही हो !शंकरराव : नाही ते तर आहेच.... काय ताशेवाजंत्र्याचा कडकडाट हा ! अंतरपाट धरला त्यावेळेलासुध्दा असेच. बाकी आसपासची मंडळी जेव्हा ओरडायला लागली, तेव्हा कसा अगदी थरकाप होऊन गेला होता नाही ? काय बरे असे ? हो, तिला सुध्दा अगदी दरदरुन घाम आला होता ! नुसती शरीरेच जुळली - देहांचीच लग्ने लागली .... म्हणजे हे असेच व्हायचे ! बिचारे कोवळे जीव ! पण किती कोंडमारा !! भिक्षुकांचा आरडाओरडा, ताशेवाजंत्र्यांचा कडकडाट व हा दिव्यांचा लखलखाट बिचारांना दिपवून टाकून मारे त्यांना झोडझोडपून पार कोणीकडच्या कोणीकडे पिटाळून लावतात !नारायणराव : हं जावईबोवा ! नीट सावरुन बसा.शंकरराव : नाही, नीट धरुन बसलो आहे. पण एकाएकी आकाश काय हे ढगांनी भरुन गेले आहे ! सारख्या विजांवर विजा ...काही माणसे : चला ! लवकर चला !शंकरराव : आहो ! काय सुंदर झाड उडत आहे हे ! एक क्षणाचा का होईना.... पण किती तेज.... किती गंमत !काही माणसे : अरे चला लवकर ! पाऊस पडायला लागला ! चला लवकर !शंकरराव : एकाएकी काय मुसळधार पाऊस पडायला लागला हा ! - आणि हे काय ?इतर माणसे : अरे घोडा उधळला ! घोडा उधळला ! बाजूला व्हा, पळा ! पळा ! पळा ! ( माणसे सैरावैरा पळू लागतात. )शंकरराव : अरे एक - दोन - किती ! किती तरी घोडे उधळले आहेत हे ! आणि माणसेही किती धावायला लागली आहेत ही !शंकररावांची पत्नी : मामा ! अहो काका ! आई ! कसले लग्न हे ! मेले ! अहो मी मेले ! धावा !शंकरराव : काय आरडाओरडा आणि किंकाळ्या ह्या ! नको रडूस....शंकररावांची पत्नी : देवा ! कसले रे हे लग्न ? मेले !शंकरराव : जिकडे तिकडे अंधार आणि पाऊस !शंकररावांची पत्नी : अहो !!शंकरराव : कोठे आहेस तू ? तुझे नाव काय ? काय ?शंकररावांची पत्नी : अहो वीज ! वीज कोसळली बाजूला व्हा !शंकरराव : अग तू बाजूला हो ! दूर हो ! ओ हो हो हो ! काय विजेचा लोळ हा ! मेलो ! मी - N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP