संकल्पविचार:

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


सर्वकर्मसु संकल्पस्यावश्यकत्वमाह विष्णु :-- संकल्प्य च यथा कुर्यात्‌ स्नानदानव्रतादिकम्‌  ।
अन्यथा पुण्यकर्माणि निष्फलानि भवन्ति वै ॥
यद्यपि संकल्पो नाम मानसं कर्म, “संकल्प: कर्म
मानस; मिति कोशात्‌, तथापि वाचिकोऽपि कार्य: ।
बौधायनेन
उभयो: समुच्चय उक्त :-- “मनसा त्रि: संकल्पयते त्रिरुच्चैरिति” ॥
चं. दीपिकायां ऋषिभट्टीयवचनं यथा - “संकल्प: स्यान्मनसि
मननं, प्रोक्तरीत्याथ वाचा, व्याहर्तव्यं तदनु च करेणाम्बुसेकस्त्रिधेति ॥
वाङगात्रेण त्वरितकरणे केचिदिच्छन्ति चाम्बुक्षेपस्थानेऽञ्जलिमुपदिशं त्वन्य एष्विष्ट आद्य: ॥”

अर्थ :--- संकल्पविचार सांगतों. स्नानदानव्रतादि कोणतेंहि धर्मकृल्पपूर्वक करावें. अन्यथा पुण्यकर्म निष्फल होतें. म्हणून कर्मारंभीं संकल्प अवश्य करावा. असें आचाररत्नांत विष्णुवचन आहे. संकल्प म्ह. मानसिक कर्म, ‘संकल्प: कर्म मानसमिति’ असा जरी कोशानुसार अर्थ होतो, तथापि मानसिक कर्म मनानें व वाणीनें तीन वेळां उच्चारावें, असा संकल्प शब्दाचा अर्थ आहे, असें बौधायन म्हणतो. चं. दीपिकेमध्यें दिलेल्या ऋषिभट्टीय वचनाचा अर्थ असा :--- संकल्पाचें स्वरूप त्रिविध आहे. प्रथम इष्टकर्माविषयींचा मानसिक निश्चय, नंतर वाणीनें उच्चार करून साक्षात्‌ हस्तानें उदक सोडणें, हा संकल्प शब्दाचा खरा अर्थ आहे. कोणी, ‘वाङमात्रेण’ म्ह. केवळ वाणीनें उच्चार करून अंजलिपूर्वक प्रार्थना करावी असें म्हणतात. पण आम्हांला उदक सोडणें हा आद्यपक्षच इष्ट वाट्तो. या वचनानें संकल्याचे वेळीं मानसिक कर्माचा वाणीनें उच्चार करून उदकच कां सोडावें ? कोठें सांगितलें आहे ? ही शंका आपोआपच दूर होईल. अर्थशास्त्रांतील लौकिक व्यवहारही असाच आहे.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP