तत्रादौ दिग्विचारः

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


तत्रादौ दिग्विचार :--- सामान्यकर्मपरिभाषया सर्वकर्मसु प्राच्येव प्रशस्तोक्त वैशंपायनेन - ‘यत्र दिङिनयमॊ नास्ति तत्र प्राची स्थिता नृप ।
तदभावे मतोदीची विशषोक्तौ परा: स्मृता: ॥
प्राचीलक्षणं
आचारमयूखे तिथितत्त्वे तंत्रांतरे च - यत्रैव भानुस्तु वियत्युदेति प्राचीति तां वेदविदो वदंति ।
ततोऽपरां पूजकपूज्ययोश्च सदाऽऽगमज्ञा: प्रवदन्ति तां तु ॥
इत्युक्तलक्षणवती प्राची द्विविधा - सूर्योदयोपलक्षिता पूज्यपूजकयोर्मध्यश्च ।
तत्र स्नानदानजपहोमसंध्यादिश्रौतस्मार्तकर्मसु प्रथामा सूर्योदयोपलक्षिता, तांत्रिकपूजायां द्वितीया तंत्रपरिभाषायामुक्तत्वादिति व्रतराज: ।
यत्त्वाहु: तांत्रिका :--- सूर्योदयस्था या प्राची स्नानसंध्यादि कर्मसु ।
पूज्यपूजकर्यार्मध्य: प्राची प्रोक्ता सुरार्चने ॥
इति ॥
तत्रापि सुरार्चने इति आगमविध्युक्तपूजायामेव - द्वितीया, वैदिकपूजायां तुलोकसिद्धैव प्राची ग्राहयेति विशेष: चलप्रतिमासु प्रथमा, स्थिरप्रतिमासु द्वितीयेत्यन्ये ।
आवरणदेवतावाहनपूजनप्रसंगे लोकपालपूजायां तदायुधपूजायां चलोकसिद्धैव प्राचीति निर्विवादम्‌ ।
प्राच्यनुरोधेनान्या दिश: ॥ इति दिग्विचार: ॥

अर्थ :--- प्राय: श्रौतस्मार्तादिकर्म दिशेचा विशेष उल्लेख नसेल तर तें पूर्वाभिमुख होऊन करावें. तदसंभव असेल तर उत्तराभिमुख कर्म करावें. सूर्य उगवतो ती पूर्व दिशा व तंत्रशास्त्रामध्यें पूज्य व पूजक यांचा मध्य म्हणजे अंतराल प्रदेश ही पूर्व. याप्रमाणें पूर्वदिशा दोन प्रकारची आहे. त्यांत श्रौतस्मार्त कर्माला प्रसिद्ध प्राची घ्यावी. तांत्रिकविध्युक्तदेवतापूजनाकरतां तंत्रोक्त पूज्य - पूजक्मध्य ही प्राची घ्यावी असें व्रतराजांत स्पष्ट आहे. ‘सुरार्चने’ याचा अर्थही तांत्रिक देवतापूजन असाच समजावा. कोणी चलप्रतिमापूजनाचे वेळीं प्रसिद्ध प्राची व स्थिरप्रतिमापूजनाचे वेळीं तांत्रिक प्राची घ्यावी असें म्हणतात. आवरणदेवतांचे आवाहन - पूजनप्रसंगीं लोकपाल व तदायुधपूजा या वेळीं प्रसिद्ध पूर्वच घ्यावी, याप्रमाणे दिग्विचार संपला.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP