मालाविचार:

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


अथ श्रीसूक्तानुष्ठाने परिगणनमन्यथा सिद्धं भवति तथापि सर्वत्र सामान्यत: मंत्रानुष्ठाने जपविधौ परिगणनार्थं मालाग्रहणस्यापेक्षितत्वात्‌ तद्विपये किंचिदुच्यते । पूर्वोक्तं जपस्थानं विनिश्चित्य संमार्जनादिना संस्कृत्य तत्र - ‘हरिणव्याघ्रयोश्चर्म कुशवेत्रकटं भवम्‌ । कर्पाअसपट्टोर्णवस्त्रमच्छिद्रास्फुटितं भवेत ॥ त्रयं वा द्वयमेकं वा भिन्नजातीयकं स्मृतम्‌ ॥’ एषामन्यतमं चैकं द्वे त्रीणि वऽऽसमानि प्रसार्य - तत्र ‘आसनं जपमध्ये तु न विमुंचेत्‌ कदाचन’ इति नियमात्‌ स्वस्तिकासनपद्मासनादि सुखसाध्यमासनं बद्‌ध्वा जाचमनादि
पूर्वांगं विधाय जपकाले मलाग्नहणं कुर्यात्‌ । सा च माला त्रिधोक्ता सौभाग्यकल्पद्रुमे - ‘वर्णमाला बीजमाला करमालेति सा त्रिधा । अकारादिक्षकारान्तं पंचाशद्विंदुसंयुतम्‌ । मेरुं कृत्वा क्षकारं वै चानुलोमविलोमत: । शतसंख्या भवेदेवं यावदिष्टयपं चरेत्‌ ॥’
इति । मंत्रोच्चारादौ अंते वा एकमेकमक्षरमुच्चार्य परिगणनं कुर्यात्‌ ।
अंते क्षकारं केवलमुच्चारयेत्‌ । मेरुरूपत्वात्‌ तस्य । इति वर्णमाला ॥

अर्थ :--- देशकालप्रकरणामध्यें सांगितल्याप्रमाणें जपस्थान निश्चित करून संमार्जनादि संस्कारानें शुचिर्भूत पवित्र अशा स्थानी बसण्याकरतां मृगचर्म, व्याघ्रचर्म, दर्भासन, वेत्रासन, कार्पासवस्त्र, रेशमी अगर  लोंकरीचें आसन असावें. हीं आसनें जपोपयोगीं असल्यानें यांपैकीं १-२-३ एक दोन तीन यथासंभव आसन घालावें. त्यावर स्वस्तिकारान, पद्मासन, बद्धपक्षासन इत्यादि जे आसना आपणांला सुकसाध्य असेल तें घालून बसावें. कारण जपामध्यें आसनत्याग करूं नये, उठूं नये असा नियम आहे. आअमनादि पूर्वांगविधि झाल्यावर जपाचे वेळीं संख्यागणनेकरतां माला ग्रहण करणें आवश्यक आहे. श्रीसूक्तावृत्तिगणन हें जरी अन्य तर्‍हेनें करणें शक्य असलें, तथापि कामनेकरितां श्रीसूक्तांतीलच एकाद्या ऋचेचा जप करणें असेल अथवा कोणत्याहि मंत्राचा जप करणें असेल तर संख्येकरितां मालेची अपेक्षा आहे. याकरितां मालास्वरूप सांगतों.
वर्णमाला, बीजमाला, करमाला असे मालेचे तीन प्रकार सौ भाग्यकल्यद्रुमांत सांगितले आहेत. प्रथम वर्णमालेचें स्वरूप सांगतों.

वर्ण म्हणजे अक्षरें; त्यांची माळ. एक, दोन इत्यादि जपसंख्या अकारादिअक्षरानें करावयाची असल्यानें ही वर्णमाला होय. गणनापद्धति अशी :--- मंत्रादौ. मंत्राते वा एकैकं वर्णमुच्चार्य अंते केवलं क्षकारोच्चारणं कार्यम्‌  । मंत्राच्या आरंभीं किंवा शेवटीं वर्णमालेंतील क्रमानुसार एकेक वर्ण सानुस्वार म्हणजे अं, आं, इं, ईं, उं, ऊं ऋं, ऋं, असा उच्चारून गणना करावी. क्षकार हा मेरु समजून त्याचा उच्चार करावा, पण गणना करूं नये, स्वर १६ व व्यंजनें तीस अपासून हकारापर्य़ंत एकूण संख्या ५० पन्नास होते. पुन: उलट हं, सं, षं, शं, या क्रमानें जपसंख्या गणावी. याप्रमाणें अनुलोम, विलोम, अशा एका आवृत्तीनें शतसंख्या पूर्ण होते. एकशेंआठ ही संख्या मोजावयाची असेल तर (‘अष्टोत्तरशतपक्षे तु’) मोजण्याची पद्धति अशी :--- पूर्ववत्‌ वर्णावृत्ति पूर्ण झाल्यावर अकार व कादिसप्तवर्ग म्हणजे अं, कं, चं, टं, पं, यं, शं हें वर्गाद्याक्षर घ्यावें म्हणजें १०८ संख्या पूर्ण होते. या वर्णमालेलाच मनोमाला, अक्षरमाला, अशीं नावें अन्य ग्रंथांतून येतात. या वर्णामालेनें जपसंख्या मोजणें फार त्रासाचें आहे. दक्षता व अभ्यास
यानेंच साध्य होणें शक्य आहे.

इति वर्णमाला ।


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP